Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sita Navami 2026: अशोकवाटिकेतील भेट ते शेंदूर प्रसंग, हनुमानाच्या भक्तीची अद्भुत कथा जाणून घ्या

राम, सीता आणि हनुमान यांचे नाते भक्ती, समर्पण आणि आदर्श नातेसंबंधांचा सर्वोच्च मानला जातो. आज सीता नवमीच्या निमित्ताने रामायणातील काही प्रसंगाचे स्मरण करूयात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 25, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • सीता नवमीच्या निमित्ताने रामायणातील प्रसंग
  • अशोकवाटिकेतील भेट ते शेंदूर प्रसंग
  • हनुमानाच्या भक्तीची अद्भुत कथा
 

 

रामायणातील सीता आणि हनुमान यांचा प्रसंग हा भारतीय संस्कृतीतील भक्ती, समर्पण आणि आदर्श नातेसंबंध यांचा सर्वोच्च नमुना मानला जातो. रामायण या महाकाव्यातील हा प्रसंग केवळ ऐतिहासिक किंवा पौराणिक नाही, तर तो जीवनमूल्यांचे गहन तत्त्वज्ञान उलगडून दाखवणारा आहे.

सीता हुनुमान प्रसंग: भक्ती आणि समर्पणाचा आदर्श

रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेतील अशोकवाटिकेत कैद करून ठेवले होते. त्यावेळी सीता अत्यंत दुःखी अवस्थेत, पण अद्याप अढळ श्रद्धेने रामाचे स्मरण करत होती. प्रभु राम यांच्या आदेशाने हनुमान समुद्र ओलांडून लंकेत पोहोचले. अनेक अडथळे पार करून त्यांनी अशोकवाटिकेत सीतेचा शोध लावला.

Grahan yog: 25 एप्रिलला तयार होण्यास ग्रहण योग, या राशींच्या लोकांचा वाढू शकतो ताण

रामाची अंगठी देऊन सीतेचा विश्वास जिंकला

सीता आणि हनुमान यांची भेट हा अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आहे. हनुमानजी हे पटकन सीते समोर गेले नाहीत. कारण सीतेला वाटेल पुन्हा रावण वेगळे रूप घेऊन आला म्हणून त्यांनी इश्वाकुळाचे स्मरण केले, श्रीरामाची आठवण काढली. सीतामाईचे लक्ष जाताच हनुमान नम्रतेने रामाची अंगठी सीतेसमोर ठेवतात. त्या अंगठीमुळे सीतेला खात्री पटते की हा खरोखरच रामाचा दूत आहे. त्या क्षणी तिच्या मनात आशेचा किरण पुन्हा प्रज्वलित होतो. हनुमान तिला धीर देतात आणि राम लवकरच तिला मुक्त करतील, असा विश्वास देतात. ही भेट भक्त आणि भगवंताच्या नात्याचे सजीव प्रतीक आहे.

याच पार्श्वभूमीवर हनुमानाशी जोडलेले एक प्रसिद्ध वाक्य आहे.

“जिस माला में राम नहीं, वो माला किस काम की”

या वाक्यामागे एक भावपूर्ण कथा सांगितली जाते. एकदा सीतेने हनुमानाला मोत्यांची माळ भेट दिली. हनुमान त्या माळेतील प्रत्येक मणी तोडून पाहू लागले. उपस्थित लोकांनी विचारले, “हे काय करत आहात?” त्यावर हनुमान म्हणाले की ते प्रत्येक मण्यात राम आहेत का, हे पाहत आहेत. जेव्हा त्यांना राम दिसले नाहीत, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
“ज्या माळेत राम नाहीत, त्या माळेचा माझ्यासाठी काहीच उपयोग नाही.” या प्रसंगातून हनुमानाची अखंड, निष्काम आणि निरपेक्ष भक्ती स्पष्ट होते. त्यांच्यासाठी जगातील कोणतीही वस्तू, संपत्ती किंवा अलंकार यांना किंमत नाही, जर त्यात रामाचे स्मरण नसेल.

Astro Tips: शनिची साडेसाती आणि महादशा यातील फरक तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

शिंदूर प्रसंग: रामासाठी पूर्ण समर्पण

याच भक्तीचे आणखी एक अत्यंत प्रभावी उदाहरण म्हणजे “शिंदूर प्रसंग”. एकदा हनुमानाने पाहिले की सीता आपल्या कपाळावर शिंदूर लावत आहे. त्यांनी विचारले की हे का लावले जाते. सीतेने सांगितले की, “हे माझ्या पती रामाच्या दीर्घायुष्यासाठी आहे.” हे ऐकताच हनुमानाने विचार केला. जर थोडासा शिंदूर लावल्याने रामाचे आयुष्य वाढत असेल, तर मी संपूर्ण शरीरावर शिंदूर लावतो, म्हणजे रामाचे आयुष्य अधिक वाढेल! आणि त्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावर शिंदूर लावला. हा प्रसंग हनुमानाच्या अतुलनीय भक्तीचा आणि निरागस भावनेचा अत्यंत सुंदर नमुना आहे. म्हणूनच आजही हनुमान यांना शेंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे.

या सर्व घटनांमधून एक गहन संदेश मिळतो. खरी भक्ती ही दिखाव्याची नसते, ती अंतःकरणातून येते. हनुमानासाठी राम हेच सर्वस्व होते. त्यांचे प्रत्येक कृत्य, प्रत्येक विचार आणि प्रत्येक श्वास रामासाठीच होता. सीता आणि हनुमान यांचा प्रसंग आपल्याला शिकवतो की संकटात श्रद्धा सोडू नये आणि भक्ती करताना पूर्ण समर्पण असावे. “जिस माला में राम नहीं, वो माला किस काम की” हे वाक्य आपल्याला जीवनातील मूल्यांची जाणीव करून देते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सीतानवमीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी सीता मातेला पूजल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. स्त्रिया विशेषतः सौभाग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी व्रत करतात.

  • Que: अशोकवाटिकेतील सीता-हनुमान भेट का महत्त्वाची आहे?

    Ans: अशोकवाटिकेत हनुमान यांनी सीतेचा शोध लावून तिला राम यांचा संदेश दिला. ही भेट श्रद्धा, आशा आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते.

  • Que: जिस माला में राम नहीं…” या कथेमागचा संदेश काय?

    Ans: या कथेत हनुमान यांची निष्काम भक्ती दिसून येते. त्यांच्या दृष्टीने रामाशिवाय इतर कोणतीही गोष्ट महत्त्वाची नव्हती.

Web Title: Sita navami 2026 amazing story of devotion to hanuman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
1

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
2

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
3

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
4

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.