Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sita Navami 2026: सीता नवमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, देवी सीतेची तुमच्यावर राहील विशेष कृपा

आज सीता नवमी, भगवान रामाची पत्नी, राजा जनकाची कन्या, सीतेचा जन्म आयोजनीय मानला जातो. तसेच वसुंधरा कन्या, पृथ्वी कन्या म्हणून संबोधले जाते. सीतेचा जन्मदिवस कसा साजरा करावा. कशी पूजा करावी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 25, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सीता नवमी कधी आहे
  • सीता नवमीच्या दिवशी करा हे उपाय
  • सीता नवमीची कथा
 

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला सीता नवमी किंवा जानकी नवमी म्हणतात. यावर्षी हा सण शनिवार, 25 एप्रिल रोजी आहे. सीता नवमीच्या दिवशी कोणती कामे करावी जाणून घ्या.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला सीता नवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी सीता नवमी शनिवार, 25 एप्रिल रोजी आहे. या दिवशी भक्त देवी सीता आणि राम यांची विशेष पूजा करतात. असे मानले जाते की, या दिवशी देवी सीता पृथ्वीवर प्रकट झाली होती. देवी सीतेला आदर्श पत्नी, धैर्य आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केले गेलेले दान आणि व्रत खूप फायदेशीर मानले जाते. विशेषतः पृथ्वीशी संबंधित गोष्टींचे दान केले जाते. म्हणजे अन्नधान्य, मातीच्या भांडी, पाणी इत्यादी दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेले दान खूप जास्त फायदेशीर असते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते.

सीता जन्माची कथा

वाल्मिकी रामायणानुसार, मिथिलाचे राजाला अपत्यप्राप्ती नव्हती. ते संतानप्राप्तीसाठी धार्मिक विधी आणि यज्ञ करत होते. एक दिवस त्यांनी यज्ञासाठी जमीन तयार करण्याचा निर्णय घेतला. वैशाख शुक्ल नवमीच्या दिवशी राजा जनक ज्यावेळी शेतात कुऱ्हाड चालवत होता. तेव्हा त्याचा एक घाव जमिनीमध्ये अडकला गेला. ज्यावेळी तिथे खोदकाम केले त्यावेळी तिथे एक कन्या रत्न प्राप्त झाली. जी मातीच्या भांड्यामध्ये सुरक्षित होती.

Ketu-Chandra Yuti: 26 एप्रिलला केतू आणि चंद्राची होणार युती, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

कारण की ही कन्या पृथ्वीवर प्राप्त झाली होती. यामुळे तिला सीता नाव दिले गेले. संस्कृतमध्ये याला सीता म्हटले जाते. पुढे जाऊन देवी सीता भगवान राम यांची पत्नी बनली आणि रामायणाच्या कथेची महत्त्वपूर्ण भाग बनली.

सीता नवमीची पूजा पद्धत

सीता नवमीच्या दिवशी भक्ताने सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. यानंतर व्रत आणि पूजा करावी.

सर्वात पहिले देवघर स्वच्छ करून घ्यावे.

एका व्यासपीठावर भगवान राम आणि सीतेच्या मूर्तीची स्थापना करावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रामदरबार उभे करू शकता. राम दरबारामधे राम सीतेसोबत लक्ष्मण आणि हनुमानाच्या चित्राची स्थापना करू शकता.

पूजेमध्ये धूप, दिवा, फूल, फळ आणि नैवेद्य अर्पण केले जाते. रामरक्षा स्तोत्राचे  आणि श्रीरामचरितमानसाचे पठण करणे शुभ मानले जाते. काही लोक या दिवशी भजन किर्तन करतात. काही ठिकाणी राजा जनक आणि सुनयनाची देखील पूजा केली जाते. यासोबतच पृथ्वीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे. कारण माता सीतेचा संबंध पृथ्वीशी मानले जाते.

Mandhardevi: कोण आहे मांढर देवी, जाणून घ्या या देवीचा महिमा आणि पौराणिक कथा

व्रत आणि दानाचे महत्त्व

सीता नवमीच्या दिवशी व्रत पाळण्याला विशेष महत्त्व आहे. हे व्रत पाळणारे भक्त दिवसभर उपवास करून फळाचे सेवन करतात किंवा निर्जळ उपवास देखील केला जातो. संध्याकाळी उपवास सोडला जातो. या दिवशी काही लोक मातीच्या भांड्यामध्ये तांदूळ, धान्य आणि पाणी भरून गरजूवंतांना दान करतात.

देवी सीतेच्या जीवनात नेहमी संयम, धैर्य आणि खरेपणाचा संदेश दिला जातो. यावरून आपल्याला शिकवण मिळते की कठीण परिस्थितीमध्ये धैर्य आणि मर्यादा सोडू नये.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सीता नवमी म्हणजे काय?

    Ans: सीता नवमी हा देवी सीता यांच्या जन्माचा पवित्र दिवस मानला जातो. हा सण वैशाख शुक्ल नवमीला साजरा केला जातो.

  • Que: सीता नवमीच्या दिवशी कोणती पूजा करावी?

    Ans: या दिवशी देवी सीता आणि भगवान राम यांची पूजा केली जाते. रामदरबाराची स्थापना करून धूप, दीप, फुले आणि नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते.

  • Que: सीता नवमीला कोणते दान करणे शुभ असते?

    Ans: अन्नधान्य, मातीची भांडी, पाणी आणि वस्त्र दान करणे विशेष लाभदायक मानले जाते.

Web Title: Sita navami 2026 upay may goddess sita special grace be upon you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.