फोटो सौजन्य- chatgpt
सातारा जिल्ह्यातील वाईजवळ वसलेलं मांढर देवी हे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मांढर देवी म्हणजेच काळूबाई. मांढर देवीचं हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगररांगेत 4650 फूट उंचीवर आहे. हे मंदिर 400 वर्षांहून अधित जुन आणि स्वयंभू आहे. हे मंदिर खूप जुनं असून शेकडोवर्षांपासून पूजा सुरू आहे. पूर्वी लोक पायवाटेनेच दर्शनासाठी जात असतं. पण कालांतराने येथे पायऱ्या, रस्ता आणि इतर सुविधा निर्माण करण्यात आले. आज हे मंदिर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपिठांपैकी एक मानलं जातं. हे मंदिर ज्या गडावर आहे त्याचं नाव आहे मांढर गड. असे म्हटले जाते की, मांढर ऋषीनी येथे तपश्चर्या केली होती म्हणून या गडाला मांढर गड असं नाव पडलं म्हणूनच या देवीला देखील मांढर देवी असं नाव पडलं. येथील अनेक लोककथामध्ये मांढर देवी आणि काळुबाईचा उल्लेख आढळतो. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते.
पूर्वी या भागात राक्षसाचा त्रास वाढला होता. लोक भयभीत झाले होते तेव्हा देवीने काळूबाईचे रुप धारण करून त्या राक्षसाचा नाश केला आणि भक्तांचे रक्षण केलं. या घटनेनंतर भक्तांनी या ठिकाणी देवीचे मंदिर बांधलं आणि तिची पूजा सुरू केली. शाकंभरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते आणि यात्रेनिमित्त येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. पूर्वी येथे प्राण्यांची बळी देण्याची प्रथा होती. पण आता शासनाने ही प्रथा बंद केल्यामुळे येथे शांततापूर्णच पूजा केली जाते. ही देवी नवसाला पावते, अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणूनच लोक येथे येऊन देवीला नवस करतात. नवस पूर्ण झाल्यावरती देवीला पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे.
मांढरदेवीचे स्थान विशेषतः धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. पौष महिन्यात येथे मोठी यात्रा भरते, ज्यात लाखो भाविक सहभागी होतात. भक्त देवीला नारळ, फुले आणि इतर नैवेद्य अर्पण करून तिची पूजा करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मांढर देवी ही शक्तीस्वरूपा देवी मानली जाते. स्थानिक पातळीवर तिला काळूबाई देवी म्हणूनही ओळखले जाते आणि ती भक्तांचे रक्षण करणारी जागृत देवी आहे.
Ans: मांढरदेवी मंदिर हे सातारा जिल्ह्यातील वाईजवळ सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.
Ans: पौराणिक कथेनुसार देवीने काळूबाईचे रूप धारण करून राक्षसांचा नाश केला, त्यामुळे तिला काळूबाई असेही नाव मिळाले.






