फोटो सौजन्य- pinterest
सूर्य वृषभ रास सोडून मिथुन राशीमध्ये रविवार, 15 जून रोजी प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाला मिथुन संक्रांती असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये या घटनेला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा आत्मविश्वास, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि उर्जेचे प्रतीक मानला जातो. जेव्हा तो आपली राशी बदलतो तेव्हा त्या बदलाचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होतो. मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध मानला जातो. सूर्य आणि बुध ग्रह यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे मानले जाते. अशावेळी सूर्य तुलनेने शक्तिशाली असल्याने याचा सर्व राशीच्या लोकांवर वेगवेगळा परिणाम झालेला जाणवतो. सूर्याच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल, जाणून घ्या.
वृषभ राशीच्या लोकांना या संक्रमणादरम्यान मानसिक ताण येऊ शकतो. या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित निकाल मिळतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना यश मिळेल. मात्र या लोकांनी घाईघाईमध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. वृषभ राशीच्या लोकांनी रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा. तसेच ‘ॐ घृणी सूर्याय नमः’ या मंत्रांचा 11 वेळा जप करा. त्यासोबतच गरजू मुलांना पुस्तक किंवा स्टेशनरीचे सामान दान करा. हे उपाय केल्याने तुम्हाला जीवनात कोणतीही अडचण येणार नाही.
सूर्याच्या संक्रमणाचा परिणाम तूळ राशीच्या लोकांच्या वैयक्तिक संबंधावर होऊ शकतो. या लोकांना तणावाला सामोरे जावे लागू शकते. या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज वाढू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी अन्यथा यांची फसवणूक होऊ शकते. तसेच तुम्ही व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला पारदर्शकता दाखवणे फार महत्त्वाचे आहे. तुमचे कोणतेही न्यायालयीन कामकाज सुरु असल्यास त्यात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तूळ राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे नियमितपणे पठण केल्यास तुम्हाला अनेक लाभ होतील. त्याचबरोबर शुक्रवारी गरीब महिलांना लाल रंगांच्या बांगड्या, टिकलीचे पाकीट आणि सौभाग्याच्या वस्तूचे दान करणे. हे उपाय केल्याने घरात सकारात्मकता राहील.
सूर्याचा संक्रमणाचा परिणाम म्हणून मकर राशीच्या लोकांच्या परिवारामध्ये तणावाची शक्यता निर्माण होऊ शकते. वडील किंवा वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायामध्ये अस्थिरता तुम्हाला जाणवू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या राशीच्या लोकांनी रोज सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. हे उपाय केल्याने वडील किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीकडून आशीर्वाद मिळेल. तसेच रविवारच्या दिवशी गहू, गूळ आणि लाल कपडे दान करा. हे उपाय केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.
कुंभ राशीच्या संक्रमणाचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांना जाणवू शकतो. या संक्रमणाच्या परिणामामुळे थकवा, डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या समस्या यासारख्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या संक्रमणामुळे तुमचा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची कामेदेखील अडकू शकतात. जर तुम्ही एखाद्याशी बोलताना राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हाला नातेसंबंधात कटुता येऊ शकते. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल अर्पण करावे. त्यासोबतच शनिवारी गरिबांमध्ये काळे चणे, ब्लॅकेट या गोष्टींचे दान करणे फायदेशीर ठरेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)