फोटो सौजन्य- pinterest
धार्मिक श्रद्धेनुसार प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे. गुरुवारचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. यावेळी व्यक्तीने श्रद्धेने पूजा आणि दिवसानुसार काही उपाय केल्यास त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. या सर्वामधील एक उपाय म्हणजे गुरुवारी घराच्या दाराजवळ हळद ठेवा. हळद ठेवणे हे धार्मिकदृष्ट्या फायदेशीर आहे. परंतु यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते अशी मान्यता आहे.
गुरुवारचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या कमी होतात. तसेच काहींजण बऱ्याच वेळेपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यास त्या व्यक्तींनी दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करुन भगवान विष्णूंची पूजा करावी. याशिवाय भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि पिवळी मिठाई अर्पण करणे देखील फायदेशीर ठरते. तसेच गुरुवारी उपवास केल्यास अनेक फायदे होतात, अशी मान्यता आहे.
हळदीकडे एक मसाल्याचा प्रकार म्हणून पाहिले जाते. मात्र, ती एक पवित्र अशी वस्तू मानली जाते. या हळदीला आयुर्वेदातही महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास हळद हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. हळद ही शुद्धतेसाठी आणि रोगनाशक गुणधर्मांसाठी विशेष ओळख आहे.
गुरुवारी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून आवरुन घेऊन स्वच्छ कपडे परिधान करावे. नंतर मुख्य दवरवाजाच्या उंबरठ्यावर चिमूटभर हळद ठेवावी किंवा हळदीचे पाणी शिंपडून घ्यावे. हा उपाय केल्याने घरामधील नकारात्मकता दूर होते. तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते, असे मानले जाते.
असे मानले जाते की, देवी लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे. एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीमध्ये किंवा व्यक्तीला सतत कर्ज आणि खर्चाचा त्रास होत असल्यास त्या व्यक्तीने हळदीचा हा छोटासा उपाय दर गुरुवारी करावा. घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्याजवळ हळद ठेवल्याने घरात सुख समृद्धीचे आगमन तर होतेच सकारात्मकता ही राहते त्याचबरोबर घरातीस सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि सुसंवादही टिकून राहतो.
घरामधील एखादा कोपरा किंवा असा दरवाजा जिथे तुम्हाला वारंवार नकारात्मकता जाणवते. काहीवेळा वारंवार भांडण होणे किंवा सतत संघर्ष होत असल्याचे जाणवले तर मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याजवळ हळदीची पेस्ट किंवा पाणी शिंपडणे हा खूप प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय केल्याने घरातील वातावरण हळूहळू बदलण्यास मदत होते आणि वास्तूदोष देखील दूर होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)