फोटो सौजन्य- pinterest
आपण बऱ्याचदा ऐकले आहे की स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नही काही गोष्टींचे संकेत देते. आपल्याला काही स्वप्न खू श करतात तर काही स्वप्न घाबरवणारी असतात. लोक नेहमी आपली स्वप्न एकमेकांसोबत शेअर करतात. मात्र अशी काही स्वप्न आहेत ती कोणाबरोबरही शेअर करू नयेत. स्वप्नशास्त्रानुसार अशी काही स्वप्न आहेत की तुम्ही कोणालाही सांगितल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी स्वप्न नेहमी गुपित ठेवावे. कोणत्याही ती स्वप्न जाणून घ्या
स्वप्नामध्ये धार्मिक स्थळाला जाणे आणि देवी देवतांचे दर्शन करण्यासारखे अध्यात्मिक अनुभवाचे स्वप्न आली तर ती गुपित ठेवावीत. जर तुम्ही हे शेअर केल्यास तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. स्वप्नशास्त्रानुसार, अशी स्वप्ने तुमची प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती दर्शवतात. अशी स्वप्ने इतरांना सांगितल्यास त्यांचा सकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो, म्हणून ती स्वतःपुरतीच ठेवणे उत्तम.
तुम्ही डोंगर, नदी, बगिचा किंवा निसर्गाशी संबंधित स्वप्न दिसण्याचा अर्थ भविष्यामध्ये शुभ घटना घडण्याचे संकेत आहे. ही स्वप्ने जीवनातील शांती, यश आणि सुखद बदलांचे संकेत देतात. मात्र हे स्वप्न दुसऱ्यासोबत शेअर करू नये. हे स्वप्न तुम्ही इतरांना सांगितल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.
बहुतेकदा लोक मृत्यूची स्वप्ने बघतात. स्वप्नामध्ये इतरांचा मृत्यू बघणे समस्यांचा संकेत असू शकते. हे जुन्या दुःखांचा अंत आणि एका नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. असे स्वप्न शुभ मानले जाते पण हे स्वप्न तुम्ही इतर कोणाला सांगितल्यास ते अशुभ ठरू शकते. त्यामुळे कुटुंबात समस्या येऊ शकतात.
तुम्हाला स्वप्नामध्ये स्वतःला आर्थिक लाभ होताना दिसणे. स्वतःला मालमत्ता खरेदी करताना बघणे शुभ मानले जाते. माझंही स्वप्न कोणाबरोबरही शेअर करू नका. पैशाची संबंधित स्वप्ने कोणासोबत शेअर केल्यास आर्थिक प्रगती थांबू शकते. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्ने केवळ कल्पना नसून ती आपल्या जीवनातील संकेतही असू शकतात. त्यामुळे, काही स्वप्ने स्वतःपुरतीच मर्यादित ठेवणे उत्तम ठरते, जेणेकरून त्यांचा सकारात्मक प्रभाव टिकून राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: स्वप्न शास्त्र हे स्वप्नांचे अर्थ, संकेत आणि त्यांचे शुभ-अशुभ परिणाम सांगणारे प्राचीन शास्त्र आहे.
Ans: काही स्वप्ने अत्यंत शुभ किंवा शक्तिशाली संकेत देणारी असतात. अशी स्वप्ने इतरांना सांगितल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम कमी होतो, अशी श्रद्धा आहे.
Ans: देव-देवतांचे दर्शन होणे, खूप पैसा किंवा सोने मिळाल्याचे स्वप्न, स्वतःला उंचावर जाताना पाहणे, पाण्यात पोहताना किंवा स्वच्छ पाणी पाहणे






