Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐकावं ते विशेष; देशातील एकमेव मंदिर जिथे होते शस्त्रांची होते पूजा, काय आहे याचं रहस्य

सर्वसाधारण कुठल्याही देवळता गेल्यावर त्या त्या गाभाऱ्यात एखाद्या देवतेची मूर्ती पुजेसाठी असते आणि भाविक त्या देवदेवतेच्या मूर्तीला मनोभावे पुजतात. मात्र देशात असं एकमेव मंदिर आहे जिथे शस्त्राची पूजा केली जाते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 14, 2025 | 05:40 PM
ऐकावं ते विशेष; देशातील एकमेव मंदिर जिथे होते शस्त्रांची होते पूजा, काय आहे याचं रहस्य
Follow Us
Close
Follow Us:
  • देशातील एकमेव मंदिर जिथे होते शस्त्रांची होते पूजा
  • काय आहे याचं रहस्य
सर्वसाधारण कुठल्याही देवळता गेल्यावर त्या त्या गाभाऱ्यात एखाद्या देवतेची मूर्ती पुजेसाठी असते आणि भाविक त्या देवदेवतेच्या मूर्तीला मनोभावे पुजतात. मात्र देशात असं एकमेव मंदिर आहे जिथे शस्त्राची पूजा केली जाते. कोणतं आहे मंदिर जाणून घेऊयात.

हिंदू धर्मातील पुरणानुसार असं म्हटलं जातं की, ब्रम्ह विष्णू आणि महेश हे तीन देव सृष्टीचे निर्माते आणि पालनहार आहेत.या तीन देवांना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. देशात भगवान विष्णूंना समर्पित अनेक मंदिरे आहेत जिथे भक्त पूजा करतात,मात्र असं एक आश्चर्यकारक मंदिर आहे जिथे भगवान विष्णूंचीच नाही तर त्यांच्या शस्त्रांची देखील पूजा केली जाते.

भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनहार आहे. या सृष्टीचं चक्र सुरळीत चालावं यासाठी आपल्या सुरदर्शन चक्राने त्यांनी अनेक असुरांचा वध केला अशी आख्यायिका देखील सांगितली जाते. जसं भगवान शिवाचं त्रिशूल हे शस्त्र आहे तसंच विष्णूंचं सुदर्शन चक्र. याच त्यांच्या सुदर्शन चक्राची पूजा तामिळनाडूतील एका मंदिरात केली जाते. हे देशातील एकमेव असं मंदिर आहे जिथे सुदर्शन चक्राची पूजा केली जाते.

त्राहिमाम! ‘या’ मंदिरातून निघणार भयावह चित्कार कलियुगाचा अंत, आवाजाने मरतील असंख्य लोक; ‘या’ राज्यात आहे दैवीस्थान

चक्रपाणी स्वामी मंदिर हे तामिळनाडूतील प्रसिद्ध असं मंदिर आहे. विष्णूच्या सुदर्शन चक्राची पूजा होत असल्याने या मंदिराचं हे वैशिष्ट्यं दिसून येतं. चक्रपाणी स्वामी मंदिराबद्दल अशी श्रद्धा आहे की येथे दर्शन घेतल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात.यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या कुंडलीतून ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात. हे मंदिर धर्म आणि पृथ्वीचे संतुलन राखणारे मानले जाते. चक्रपाणी स्वामी मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

नीतिमत्ता आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या सुदर्शन चक्राची पूजा केली जाते. देशाच्या दक्षिण भागात, तामिळनाडूतील कुंभकोणम येथे कावेरी नदीच्या काठावर असलेले चक्रपाणी स्वामी मंदिर अनेकांना रहस्यमय वाटतं. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या मंदिरात, धर्म आणि न्यायाचे प्रतीक असलेले शस्त्र सुदर्शन चक्राची पूजा केली जाते.येथे आठ हात असलेल्या भगवान विष्णूच्या भयंकर रूपाची पूजा केली जाते. ते त्यांच्या सर्व हातांवर शस्त्रे धारण करतात आणि त्यांचा तिसरा डोळा देखील दर्शविला आहे.

Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या

सुदर्शन चक्राची दंतकथा

अशी आख्यायिका सांगितली जाते की, जेव्हा राक्षस राजा जालंधरसुर पृथ्वीवर हाहाकार माजवत होता तेव्हा भगवान विष्णूने आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी जालंधरसुराचा वध केला.या राक्षसाचा वध करण्यासाठी, भगवानांनी पाताळातून सुदर्शन चक्र बोलावले. त्याचे तेज सूर्यदेवापेक्षाही जास्त होते.ब्रह्मा कावेरी नदीच्या काठावर ध्यान करत असताना त्यांना चक्राची शक्ती दिसली आणि त्यांनी एक मंदिर स्थापन केले. आज हे मंदिर चक्रपाणी स्वामी नावाने ओळखलं जाते. जिथे सुदर्शन चक्राची पूजा केली जाते.या मंदिरात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुदर्शन यज्ञ केला जातो. पूजेदरम्यान, भगवान विष्णूंना तुळशी, हार आणि पीठाची खीर अर्पण केली जाते. या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी देखील पाहायला मिळते.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: हे भारतामधील एकमेव मंदिर आहे जिथे भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राची स्वतंत्र पूजा केली जाते.

  • Que: सुदर्शन चक्र म्हणजे काय?

    Ans: सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूंचे दिव्य शस्त्र असून ते धर्म, नीतिमत्ता आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. अधर्माचा नाश करण्यासाठी विष्णूंनी याचा उपयोग केला असल्याचे पुराणांमध्ये सांगितले जाते.

  • Que: मंदिरात भगवान विष्णूंचे कोणते रूप पूजले जाते?

    Ans: या मंदिरात आठ हातांचे, भयंकर आणि तेजस्वी रूपातील भगवान विष्णू पूजले जातात. त्यांच्या सर्व हातांत शस्त्रे आहेत आणि तिसरा डोळा देखील दर्शविला आहे.

Web Title: The only temple in the world where weapons were worshipped what is the secret of arulmigu chakrapani swami temple in tamil nadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Vishnu
  • Temple Darshan

संबंधित बातम्या

Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या
1

Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या

त्राहिमाम! ‘या’ मंदिरातून निघणार भयावह चित्कार कलियुगाचा अंत, आवाजाने मरतील असंख्य लोक; ‘या’ राज्यात आहे दैवीस्थान
2

त्राहिमाम! ‘या’ मंदिरातून निघणार भयावह चित्कार कलियुगाचा अंत, आवाजाने मरतील असंख्य लोक; ‘या’ राज्यात आहे दैवीस्थान

Paush Amavasya: पौष अमावस्येला नकारात्मक शक्तींचा बोलबाला! 6 राशीच्या व्यक्तींसाठी धोक्याचा इशारा, सावध रहा अन्यथा…
3

Paush Amavasya: पौष अमावस्येला नकारात्मक शक्तींचा बोलबाला! 6 राशीच्या व्यक्तींसाठी धोक्याचा इशारा, सावध रहा अन्यथा…

कपाळावर तीळ असणे शुभ की अशुभ? धनसंपत्तीशी काय आहे संबंध; योग्य आणि सटीक अर्थ
4

कपाळावर तीळ असणे शुभ की अशुभ? धनसंपत्तीशी काय आहे संबंध; योग्य आणि सटीक अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.