प्रेम ही सर्वात सुंदर भानना आहे मात्र जर ते चुकीच्या व्यक्तीवर झालं की प्रेमात फसवणूक मिळाली तर मनाला चटका लागतो. या त्रासामुळे अनेकदा आपण स्वत:ला चुकीचं ठरवतो. ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा याला ग्रहस्थिती जबाबदार असते. याबाबत ज्योतिषाचार्य ज्य़ोती जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र, राहू आणि चंद्र यांच्या पत्रिकेतील स्थिती कशी आहे त्यावरुन प्रेमजीवन कसं असू शकतं याबाबात काही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा प्रेम, मोह आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. पत्रिकेतील शुक्राची स्थिती खराब असेल किंवा शुक्र कमकुवत असेल तर आपल्याला आकर्षण तर जाणवतं पण समज हरवते. त्यामुळे अनेकदा प्रेमात धोका मिळतो किंवा ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती चुकीची असल्याचं कळतं.
दर शुक्रवारी सुगंधितस वस्तूंचं दान करावं आणि महालक्ष्मीची उपासना करावी. यामुळे पत्रिकेतील शुक्र ग्रह मजबूत होण्यास फायदा होतो.
शुक्र जसा प्रेमाचा कारक मानला जातो त्याचप्रमाणे चंद्र देखील भावनेचा कारक आहे. चंद्राचा प्रभाव असलेला व्यक्ती संवेदनशील असतो. हाच चंद्र जर पत्रिकेत कमजोर असेल तर सतत मानसिक नैराश्य आणि अतिभावनाशील व्यक्ती असते. चंद्राचा अशुभ प्रभाव असल्यास व्यक्ती भावनेच्या आहारी जाते. काय चांगलं काय वाईट याचं भान राहत नाही. अशी व्यक्ती बऱ्याचदा सेल्फ रिस्पेक्ट प्रेमासाठी गमावून बसतात. जर सतत मानसिक नैराश्य येत असेल तर हे कमजोर चंद्रामुळे होतं.
दर सोमवारी महादेवांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करावा. ओम चंद्राय नम: या मंत्राचा जप करावा.
राहू हा छाया ग्रह मानला जातो. राहूची अशुभ स्थिती प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम करतं. राहु नातेसंबंधात गैरसमज निर्माण करतो. नात्यात भांडणं आणि संशय तयार करतो त्यामुळे अनेक नातेसंबंध खराब होतात. यावर उपाय म्हणजे, दर शनीवारी काळ्या तीळाचं दान करा आणि ओम राहवे नम: या मंत्राचा जप करा.
कलियुगात प्रेम आणि विश्वास ठेवावा अशी माणसं दुर्मिळ होत आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात स्थान देताना सारासार विचार आणि संयम असणं आवश्यक आहे.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.
Ans: प्रेम आणि नातेसंबंधांवर प्रामुख्याने शुक्र, चंद्र आणि राहू या ग्रहांचा प्रभाव मानला जातो.
Ans: शुक्र कमजोर असल्यास व्यक्तीला आकर्षण तर जाणवतं, पण योग्य-अयोग्य याचा निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीवर प्रेम, फसवणूक किंवा भावनिक धोका मिळू शकतो.
Ans: चंद्र हा भावनांचा कारक ग्रह आहे. चंद्र कमजोर असल्यास व्यक्ती अतिसंवेदनशील होते, सतत मानसिक नैराश्य, भावनिक अवलंबित्व आणि आत्मसन्मान गमावण्याची शक्यता वाढते.






