फोटो सौजन्य- pinterest
यावेळी शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12.57 वाजता त्रिएकादश योग तयार होणार आहे. ज्याला लाभ दृष्टी असेही म्हणतात. ज्यावेळी कोणतेही दोन ग्रह एकमेकांपासून 60 अंशांच्या कोनामध्ये असतो त्यावेळी हा योग तयार होतो. तसेच सूर्य आणि गुरु एकमेकांपासून 60 अंशांमध्ये स्थित असल्याने त्रिएकादश योग तयार होणार आहे. या काळामध्ये काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी देखील मिळू शकतात. त्यासोबतच करिअरमध्ये प्रगती देखील होऊ शकते आणि वैयक्तिक जीवनात आनंद राहील. ‘त्रियकादश योगाचा परिणाम आरोग्यावर देखील होऊ शकतो. हा योग कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जाणून घ्या
सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या त्रियकादश योगाचा परिणाम मिथुन राशींच्या लोकांवर सर्वाधिक होणार आहे. या काळात तुम्ही बाहेर जाण्याची योजना आखू शकता. त्यासोबतच आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. तसेच गुंतवणुकीच्या देखील नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांची नवीन लोकांसोबत ओळख होईल. करिअरमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. जर कोणत्याही जमिनीबाबत केस सुरू असेल तर प्रकरण संपुष्टात येऊ शकते. त्यासोबतच नात्यामधील जवळीक वाढेल. या काळात तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर राहणार आहे. त्याचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही तुमच्या निर्णयांवर समाधानी असाल आणि तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. याशिवाय, कौटुंबिक नात्यात गोडवा राहील. आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
मिथुन आणि सिंह राशीसोबतच धनु राशीच्या लोकांनाही या योगाचा फायदा होणार आहे. या काळामध्ये विवाहित लोकांमध्ये संबंध चांगले राहतील. पूर्ण आत्मविश्वासाने केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच व्यावसायिकांना देखील अपेक्षित यश मिळेल. जर कोणाचे मन दुखावले असेल तर ते आपला वेळ धार्मिक कार्यामध्ये घालवतील. त्यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. तसेच तुमच्यावरील मानसिक ताण कमी होईल. स्मार्ट निर्णयांमुळे व्यावसायिकांना फायदा होईल. या काळात तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)