Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरातील सदस्य वारंवार आजारी पडत आहे करुन पाहा हे वास्तू उपाय

घरामध्ये वास्तूदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असल्यास व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतो. यावेळी घरातील दिशेकडे लक्ष देणे गरजेचे मानले जाते. जाणून घ्या वास्तू उपाय

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 29, 2025 | 09:08 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

वास्तुशास्त्रानुसार, घराची रचना, दिशा आणि उर्जेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो. जर घरामध्ये वास्तूदोष आणि नकारात्मक ऊर्जा असल्यास व्यक्ती सतत आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. वास्तूच्या कोणत्या नियमांचे पालन केल्याने आपले आरोग्य सुधारु शकते, जाणून घ्या

झोपायच्या वेळी दिशेकडे द्या लक्ष

वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोक करुन झोपावे. असे म्हटले जाते की, उत्तर दिशेला डोक करुन झोपल्याने रक्ताभिसरणात अडथळा येतो आणि वारंवार डोकेदुखी, थकवा किंवा निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवतात. झोपताना दिशेची योग्य ती काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहते.

Brihaspati Uday: गुरु ग्रहाच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना मिळेल पदोन्नती आणि संपत्ती

पलंगाखाली जड वस्तू ठेवणे

जर तुमच्या पलंगाखाली रिकामी जागा असेल आणि तुम्ही त्याच्या खाली चप्पल, बूट, जुने कपडे किंवा जुन कागदपत्रे, रद्दी यांसारख्या काही गोष्टी ठेवत असल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे मानसिक ताण, थकवा आणि झोपेचा अभाव यांसारख्या समस्या येतात.

बेडरुममधील आरसा

जर आपण झोपलेल्या ठिकाणी समोर आरसा असल्यास आपले शरीर त्यामधून प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी मानसिक शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तुमच्या समोर आरसा असल्यास तो झोपण्याआधी कपड्याने झाकून ठेवा.

घरात सूर्यप्रकाश येणे

जर तुमच्या घरात सकाळी सूर्यप्रकाश येत असल्यास ते चांगले आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच तुम्हाला रोगांचा सामना करण्यासाठी शक्ती वाढते. सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी देखील आपल्या शरीराला मिळते. व्हिटॅमिन डी हे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Shani Sadesati: शनिच्या साडेसातीचा परिणाम कोणावर होतो? जाणून घ्या उपाय

या दिशेकडील जागा स्वच्छ ठेवा

घरामधील ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा. या कोपऱ्याला देवाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी घाण किंवा जड वस्तू ठेवल्याने मानसिक अशांतता, थकवा आणि आजार वाढतात.

पाण्याच्या नळाची जागा

घरामध्ये पाण्याची असलेली टाकी किंवा बोअरिंग या गोष्टी उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला असणे गरजेचे मानले जाते. पाण्याची किंवा बोअरिंग चुकीच्या दिशेला लावल्यास तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा ताण येणे किंवा आजार निर्माण होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्वयंपाकघर आणि बाथरुम एकमेंकासमोर नसणे

तुमच्या घरामधील स्वयंपाकघर आणि बाथरूम एकमेकांसमोर असल्यास ते पाणी आणि अग्नी या घटकांमधील संघर्ष दर्शवते. यामुळे परिवारातील सदस्यांमध्ये आजार आणि तणाव येतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips vastu remedies for family members falling ill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: घराच्या खिडक्या बंद ठेवल्याने वाढू शकतात अडचणी? जाणून घ्या वास्तू नियम
1

Vastu Tips: घराच्या खिडक्या बंद ठेवल्याने वाढू शकतात अडचणी? जाणून घ्या वास्तू नियम

Navratri: नवरात्रीत घरात ‘ही’ रोपं लावणे मानले जाते शुभ; देवीच्या आशीर्वादाने अडचणी होतील दूर
2

Navratri: नवरात्रीत घरात ‘ही’ रोपं लावणे मानले जाते शुभ; देवीच्या आशीर्वादाने अडचणी होतील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.