फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये ग्रहांचे वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. या बदलामुळे नक्षत्र बदलात देखील फरक पडताना दिसून येतो. या बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या स्वरुपात पडतो. जेव्हा गुरु देव मिथुन राशीत अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु देव 9 जुलै रोजी मिथुन राशीमध्ये अस्त होत आहे. 9 जुलैला 10.50 वाजता गुरुचा उदय होईल. 27 दिवस अस्त झाल्यामुळे त्याचा उदय काही राशीच्या लोकांना भरपूर लाभ देऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक लाभही होऊ शकतो. जाणून घ्या त्या भाग्यवान राशींबद्दल
गुरुचा उदय मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणारा असू शकतो. या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये या लोकांची वाढ होऊ शकते. मात्र या लोकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नात्यामध्ये असलेले मतभेद दूर होतील. संघर्ष संपतील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणाशीही वाद घालू नका.
गुरुच्या उदयामुळे वृषभ राशीच्या लोकांना हा काळ शुभ राहणार आहे. या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. हे लोक धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकतात. तुम्ही जोडीदारासोबत धार्मिक कार्यक्रमाला जाऊ शकता. या लोकांच्या जीवनात सुरु असलेल्या समस्या संपतील. सूर्याच्या कृपेने तुमच्या जीवनात असलेले सर्व दोष दूर होतील. तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुचा उदय शुभ आणि अनुकूल परिणाम देणारा राहील. तुमचे दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता. पूजा, हवन, इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन घरी करता येतील. वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील.
देव गुरु उदयाचा कन्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. या लोकांच्या करिअरमध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी या लोकांची पदोन्नती होईल. जे लोक नवीन नोकरी शोधत त्यांना यश मिळू शकते. न्यायालयामध्ये एखादे प्रकरण सुरु असल्यास त्यात तुम्हाला यश मिळेल. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच मालमत्ता, जमीन किंवा वाहन खरेदी करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)