Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: ऑफिस टेबलवर बांबू प्लांटसोबत ठेवा या गोष्टी, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार बांबू प्लांट हा सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अनेक जण आपल्या ऑफिस टेबलवर बांबू प्लांट ठेवतात. मात्र केवळ बांबू प्लांट ठेवणे पुरेसे नसून त्यासोबत काही शुभ वस्तू ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम अधिक वाढू शकतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 01, 2026 | 02:10 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ऑफिस टेबलवर बांबू प्लांटसोबत आवर्जून ठेवा या गोष्टी
  • वास्तुशास्त्र काय सांगते
  • कोणत्या गोष्टी ठेवू नये
 

वास्तूशास्त्रानुसार, आपण जिथे बसून काम करतो किंवा व्यवसाय सांभाळतो, त्या जागेची ऊर्जा आपल्या निर्णयक्षमतेवर आणि प्रगतीवर थेट परिणाम करते. बऱ्याचदा रात्री-अपरात्री कठोर परिश्रम करूनही नोकरीत बढती मिळत नाही किंवा व्यवसायात अपेक्षित नफा होत नाही. वास्तुशास्त्रानुसार केवळ बांबू प्लांट ठेवणे पुरेसे नसून त्यासोबत काही शुभ वस्तू ठेवल्यास त्याचे लाभ अधिक वाढू शकतात. यामुळे कामातील अडथळे दूर होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते. आपल्या ऑफिसच्या टेबलवर कोणत्या गोष्टी असू नयेत आणि प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी तिथे काय ठेवले पाहिजे, याचे सविस्तर वास्तू नियम खालीलप्रमाणे आहेत.

‘या’ गोष्टी आवर्जून ठेवा

बांबूचे रोप

टेबलच्या पूर्व किंवा उत्तर कोपऱ्यात लहान बांबूचे रौप किंवा मनी प्लांट ठेवावे. हे झाड जसे वाढते, तशी तुमच्या करिअरची आणि पैशांची आवक वाढते.

क्रिस्टल ग्लोब किंवा पिरामिड

टेबलवर एक छोटा क्रिस्टल ग्लोब किंवा तांब्याचा पिरामिड ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि नवीन व्यावसायिक ओळखी मजबूत होतात.

१२ वर्षांनी गुरुचे होत आहे महागोचर, या राशींच्या लोकांना होणार सर्वात मोठा फायदा

लाफिंग बुद्धा किंवा गणपतीची मूर्ती

कामाची सुरुवात नेहमी सकारात्मक ऊर्जेने व्हावी म्हणून टेबलवर विघ्नहर्ता गणपतीची किंवा लाफिंग बुद्धाची छोटी प्रसन्न मूर्ती ठेवू शकता.

पाण्याने भरलेली लहान बाटली किंवा जार

टेबलच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपऱ्यात पाण्याचा ग्लास किंवा छोटी बाटली ठेवावी.

Vastu Tips: बाल्कनीची योग्य दिशेमुळे करिअरला मिळू शकते गती, ‘ही’ झाडे चुकीच्या ठिकाणी लावणे पडू शकते महागात

‘या’ गोष्टी कधीही ठेवू नका

अस्वच्छता आणि जुन्या फाईल्सचा ढीग

टेबलवर विनाकारण जुनी कागदपत्रे, कचरा, रिकामे पेन किवा न चालणारे गॅजेट्स ठेवणं टाळा. वास्तू शास्त्रानुसार, अस्वच्छ टेबल मनात नकारात्मक विचार वाढवते आणि कामातील एकाग्रता भंग करते.

तुटलेल्या किंवा धारदार वस्तू

टेबलवर तुटलेली काच, उघडी कात्री, कटर किंवा टोकदार वस्तू समोर दिसतील अशा ठेवू नका. या गोष्टींमुळे कार्यक्षेत्रात विनाकारण वाद निर्माण होतात आणि ताणतणाव वाढतो.

खरकटी भांडी आणि रिकाम्या बाटल्या

अनेकदा काम करत असताना टेबलवर चहाचे रिकामे कप, पाण्याचा रिकामा तांब्या किंवा जेवणाचा डबा तसाच पडून राहतो. टेबलवर खरकटी भांडी राहिल्याने राहु-शनीचे दोष वाढतात, ज्यामुळे कामात सतत अडथळे येतात.

नकारात्मक चित्रे किंवा शो-पीस

ऑफिसच्या टेबलवर काटेरी झाडे (जसे की कॅक्टस), रडणाऱ्या व्यक्तींचे किंवा बुडणाऱ्या जहाजाचे चित्र कधीही ठेवू नका.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑफिस टेबलवर बांबू प्लांट ठेवणे शुभ मानले जाते का?

    Ans: होय. वास्तुशास्त्रानुसार बांबू प्लांट सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे तो ऑफिसमध्ये ठेवणे शुभ मानले जाते.

  • Que: बांबू प्लांट ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावा?

    Ans: वास्तुनुसार ऑफिसच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला बांबू प्लांट ठेवणे लाभदायक मानले जाते.

  • Que: बांबू प्लांट ठेवताना कोणती काळजी घ्यावी

    Ans: प्लांट नियमित स्वच्छ ठेवावा, त्यातील पाणी वेळोवेळी बदलावे आणि त्याच्या आसपास स्वच्छता राखावी. यामुळे तो आकर्षक आणि ताजातवाना राहतो

Web Title: Vastu tips what things should be placed with a bamboo plant on the office table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम
1

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
2

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम
3

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.