फोटो सौजन्य- istock
जुलै महिन्याचा तिसरा आठवडा ( 14 जुलै ते 20 जुलै) अनेक राशीच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये वाढ आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. यावेळी शनि देव मीन राशीमध्ये वक्री होत असल्याने ज्या लोकांची कामे अपूर्ण राहिलेली आहेत ती पूर्ण होण्यास मदत होईल. 16 जुलै रोजी सूर्याचा कर्क राशीत प्रवेश तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढवेल.
त्यासोबतच शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत, बुध कर्क राशीत, केतू आणि मंगळ सिंह राशीत आणि राहू कुंभ राशीत असतील या सर्वांच्या एकत्रितकरणामुळे काही राशीच्या लोकांसाठी अनुकूल योग तयार होतील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा तिसरा हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. या लोकांना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि नातेसंबंधांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जुन्या आजाराच्या पुनरावृत्तीमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. नोकरी आणि व्यावसायिकांच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते किंवा इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात अधिक रस असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप रस असेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरुपाचा राहील. तुमची प्रलंबित राहिलेली कामे या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कोणतेही काम स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यावर सोपवण्याची चूक करू नका. या लोकांना लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही सहकार्य मिळत राहील. विद्यार्थ्यांना शिक्षण-स्पर्धा इत्यादींमध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्ही एखादे प्रलंबित काम पूर्ण करू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा अनुकूल राहील.
सिंह राशीच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात खूप काळजीपूर्वक पुढे जावे लागेल, अन्यथा तुम्हाला नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या येऊ शकतात. तसेच या लोकांना काही आव्हांनाना देखील तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या लोकांनी नातेवाईकांशी वाद घालणे टाळावे. आत्मविश्वासाने काही काम हाती घ्यावे, अन्यथा वेळेवर मदत न मिळाल्यास वैयक्तिक संबंधांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा आठवडा चांगला राहणार आहे. या लोकांना करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश आणि प्रगती मिळेल. तुमचे कोणतेही प्रकरण न्यायालयात सुरू असेल तर ते या आठवड्यात सोडवले जाईल. परदेशात करिअर आणि व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअर, व्यवसाय, संपत्तीसाठी अनुकूल राहील. तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही मोठ्या चांगल्या बातम्या मिळू शकतात, ज्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. कोणताही करार किंवा योजना करताना कागदपत्रांमध्ये निष्काळजीपणा बाळगू नका. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. करिअर किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जास्त धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. तुमची अडकलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी मित्र आणि सहकाऱ्यांचे वर्तन तुम्हाला आश्वासक वाटेल. व्यावसायिकांचे प्रवास यशस्वी होतील.
कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना, तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्या. कामात आळस किंवा निष्काळजीपणा टाळा. अचानक उद्भवणाऱ्या समस्या तुमचे मन अस्वस्थ करू शकतात. तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ शकता.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. मात्र या लोकांवर भरपूर जबाबदाऱ्या येतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा खूप अनुकूल आहे. नातेसंबंध अनुकूल राहतील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)