फोटो सौजन्य- istock
जुलै महिन्यातील पंचकाची सुरुवात आज रविवार, 13 जुलैपासून सुरु होत आहे. यावेळी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचक हे 5 दिवस असते. जाणून घ्या जुलै महिन्यात पंचक कधी पासून सुरु होते आणि यावेळी कोणत्या गोष्टी करु नये.
जुलै महिन्यातील पंचकाची सुरुवात आज रविवार, 13 जुलैपासून सुरु होत आहे. पंचकाच्या सुरुवातीला रविवार असल्यामुळे याला रोग पंचक म्हणून ओळखले जाते. ज्योतिषशास्त्रात, पंचक हे ग्रह आणि नक्षत्रांमुळे तयार होतो. हिंदू धर्मामध्ये पंचकाला अशुभ मानले जाते. या काळात कोणतीही शुभ कार्ये केली जात नाही. पंचक म्हणजे पाच असे मानले जाते. चंद्राच्या स्थितीवर आधारित ही एक खगोलीय घटना आहे. ज्योतिषशास्त्रात पंचक नक्षत्रांवर आधारित आहे, या काळात शुभ कार्ये करण्यास मनाई आहे.
पंचांगानुसार, जुलै महिन्यातील पंचांगाची सुरुवार आज रविवार, 13 जुलै रोजी संध्याकाळी 6.53 वाजता सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती शुक्रवार, 18 जुलै रोजी दुपारी 3.39 वाजता होईल. या कालावधीमध्ये कोणतीही शुभ कार्ये करु नये. यादरम्यान कर्क संक्रांती, कालष्टमी हे व्रत येत आहे. मात्र, पंचकामध्ये कोणतेही शुभ कार्य करता येत नसले तरी पूजा पाठ करणे, व्रत करणे, उपवास करणे योग्य मानले जाते याचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होत नाही. तसेच उपवासांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय पूजा करता येते.
पंचकामध्ये घराचे बांधकाम सुरू करू नये. याशिवाय घराचे छप्पर टाकणे देखील अशुभ मानले जाते.
पंचकाच्या पाच दिवसांमध्ये सुनेला सासरकडून माहेरी आणि मुलीला माहेरुन सासरी पाठवू नये.
पंचकाच्या या दिवसात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करु नये. असे करणे अशुभ मानले जाते. अन्यथा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
पंचक काळामध्ये मृतदेहावर अत्यसंस्कार करणे टाळावे. असे केल्याने नकारात्मक परिणाम होतो. पंचक काळात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाच्या पाच मूर्ती पिठापासून किंवा कुशापासून बनवून पातशाहीसोबत ठेवाव्यात आणि नंतर विधीनुसार अंत्यसंस्कार करावेत.
पंचकाच्या दिवशी चुकूनही दक्षिण दिशेला प्रवास करू नये, असे केल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
हिंदू धर्मामध्ये पंचकाचे पाच प्रकार आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना राज पंचक, मंगळवार आणि गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना अग्नि पंचक, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना चोर पंचक, शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना मृत्यु पंचक आणि रविवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना रोग पंचक म्हणतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)