फोटो सौजन्य- pinterest
मार्च महिन्याचा शेवटचा आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी ग्रहांची स्थितींचा काही राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम करेल. या आठवड्यात धार्मिक व्रत येत आहे त्यामुळे हा आठवडा धार्मिकरित्या खूप महत्वाचा आहे. या आठवड्यात प्रदोष व्रत, महावीर जयंत, हनुमान जयंती येत आहे. यावेळी तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घ्या.
मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. अचानक येणाऱ्या आवाहनांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदार्या येऊ शकतात. आरोग्यासाठी हा आठवडा प्रतिकूल होईल. नातेसंबंध चांगले राहतील. वाहन चालवताना काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रीत राहील. या आठवड्यात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही प्रवास करू शकता. जमीन मालमत्तेची संबंधित कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. वादविवादापासून दूर राहा. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.
मिथुन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा प्रतिकूल राहील. करियर आणि व्यवसायात प्रगती कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कोर्टाशी संबंधित समस्या दूर होतील. आरोग्याच्या समस्या दूर होतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. काम पूर्ण करण्यासाठी आठवडा चांगला राहील. कुटुंबातील समस्या दूर होतील. या आठवड्यात अचानक खर्च वाढू शकतात. व्यवसायामध्ये चढ-उतार जाणवू शकतो. अपघात होण्याची शक्यता. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी गुंतवणूक करणे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. करियर व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. एखादी मोठी समस्या तणावाचे कारण बनू शकते. नातेसंबंध चांगले राहतील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या संबंधित समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आठवड्यात तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. करिअर व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. या आठवड्यात गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. दीर्घकाळापासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.
कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा मिश्रीत राहील. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. जमीन मालमत्तेशी संबंधित वादविवाद दूर होतील. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. जमीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत हा आठवडा चांगला राहील. कुटुंबामध्ये वादविवाद झाल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






