Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avidhwa Navami: अविधवा नवमी म्हणजे काय? या दिवशी कसे केले जाते पूर्वजांचे स्मरण, जाणून घ्या

Avidhwa Navami:  पितृपक्षातील नवमी तिथीला अविधवा नवमी किंवा मातृ नवमी असेही म्हटले जाते. या दिवशी दिवंगत महिला पूर्वजांचे स्मरण करून श्राद्ध, तर्पण आणि दान करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया अविधवा नवमीचे धार्मिक महत्त्व आणि या दिवशी केले जाणारे विधी.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 04, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अविधवा नवमी म्हणजे काय
  • अविधवा नवमीचा पितृपक्षाशी काय संबंध आहे
  • अविधवा नवमीला विवाहित स्त्रीची ओटी का भरली जाते
 

अविधवा नवमी ज्याला मातृ नवमी किंवा अहेर नवमी असेही म्हणतात. ही पितृपक्षातील म्हणजे श्राद्धाच्या दिवसातील नवमी तिथी आहे. जी पती ह्यात असताना मृत्यू पावलेल्या स्त्रियांच्या श्राद्ध आणि स्मरणार्थ समर्पित आहे. अविधवा नवमी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची धार्मिक तिथी मानली जाते. अविधवा नवमी म्हणजे काय ? या दिवशी पूर्वजांचे स्मरण कसे केले जाते ते जाणून घेऊया

अविधवा नवमीचे धार्मिक महत्त्व

ही तिथी विशेषतः पती ह्यात असलेल्या विवाहित स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सौभाग्यासाठी केली जाणारी धार्मिक परंपरा म्हणून ओळखली जाते. काही भागांत तिला अविधवा नवमी, नवमी श्राद्ध किंवा मातृ नवमी यासंदर्भातही पाहिलं जातं. मात्र या नावांचा आणि विधींचा अर्थ प्रदेश आणि परंपरेनुसार वेगवेगळा असू शकतो. अविधवा म्हणजे जिचा पती ह्यात आहे अशी स्त्री. त्यामुळे अविधवा नवमीच्या दिवशी विवाहित स्त्रीला सौभाग्याचं प्रतीक मानून तिचा सन्मान करण्याची प्रथा काही कुटुंबामध्ये आढळते.

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

या दिवशी काय केले जाते

कुटुंबाच्या परंपरेनुसार, विवाहित स्त्रीला घरी बोलवून तिची ओटी भरली जाते तिला हळदीकुंकू लावलं जातं आणि फळ, वस्त्र किंवा सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात. काही परंपरेमध्ये या दिवशी पूर्वजांचे निधन झालेल्यांचे स्मरण करून त्यांच्यासाठी श्राद्ध किंवा तर्पण केलं जातं त्यामुळे अविधवा नवमीचा संबंध हा केवळ सौभाग्याशी नसून कुटुंबातील दिवंगत माता, आजी, पत्नी किंवा इतर विवाहित स्त्रीयांच्या स्मरणाशी जोडला जातो.

दिवंगत महिला पूर्वजांचे स्मरण

या परंपरेमागे कुटुंबातील स्त्रीयांचा सन्मान, पूर्वजांचे स्मरण आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना हा भाग आहे. विवाहित स्त्रीला हळदीकुंकू लावणं, ओटी भरणं किंवा सौभाग्य वस्तू देणं हे तिच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देण्याचं प्रतीक मानलं जातं.

Avidhava Navami 2026: अविधवा नवमी म्हणजेच मातृ नवमी का? ‘या’महिला पूर्वजांचे केले जाते श्राद्ध; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

विधींमध्ये असू शकतो फरक

मात्र अविधवा नवमीची पूजा आणि सगळेच विधी एकसारखे नसतात. काही ठिकाणी ते पितृपक्षातील नवमी तिथीशी संबंधित मानले जाते. तर काही कुटुंबामध्ये ती वेगळ्या पद्धतीने पाळली जाते त्यामुळे नेमकी तिथी आणि विधी ठरवताना आपल्या कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक पंचांग काय सांगत ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: What is avidhwa navami how do we remember our ancestors on this day pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Mumbai News: ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना
1

Mumbai News: ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना

Mahalaxmi Rajyog: चंद्र-मंगळाच्या युतीने तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींना करिअर आणि व्यवसायात मिळणार अपेक्षित यश
2

Mahalaxmi Rajyog: चंद्र-मंगळाच्या युतीने तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींना करिअर आणि व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी
3

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Numberlogy:  मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy:  मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.