
वृंदावनचे प्रेमानंद जी महाराज भक्तांना केवळ धर्मच नव्हे तर जगण्याची आणि योग्य मार्गाचे अनुसरण करण्याची कला देखील शिकवतात. ते म्हणतात की देवाशी जोडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे नाव सतत स्मरण करणे.
प्रेमानंद महाराजांनी मंदिरात आणि घरी पूजा करण्यामध्ये काय फरक आहे हे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी, एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारले की घरी पूजा करणे आणि मंदिरात पूजा करणे यात काय फरक आहे.प्रेमानंद महाराज भक्ताला उत्तर देत म्हणाले की, तुम्ही घरी पूजा करा, मंदिरात पूजा करा, तीर्थस्थळी किंवा पवित्र स्थळी पूजा करा. तुमचं अंत:करण शुद्ध असायला हवं. तुम्ही जर घरी1000 माळांचं जप करणे हे गोशाळेत 100 माळा जप करण्या इतकं आहे, असं महाराजांनी सांगितलं.
एखाद्या तीर्थस्थळी एक माळ जप केल्याने तुम्हाला1000 माळा जप करण्यासारखेच फायदे मिळतात. दरम्यान, वृंदावनात एक माळ जप केल्याने एक लाख वेळा जप करण्यासारखेच फायदे मिळतात. म्हणूनच लोक मंदिरात जातात, तीर्थस्थळांना भेट देतात,ऋषी संतांना भेट देतात आणि मोठ्या मंदिरांना भेट देतात कारण त्यांना शांती आणि मोठे फायदे मिळतात. महाराज पुढे असंही म्हणतात की,गृहपूजा आणि मंदिरपूजा यात फरक आहे. घरी पूजा करण्यापेक्षा मंदिरात पूजा करण्याचे जास्त फायदे मिळतात. गंगेच्या काठावर पूजा केल्याने किंवा माळ जप केल्याने सकारात्मक ऊर्जा जास्त मिळते. गंगेच्या पाण्यात उभे राहून माळ जप केल्याने आत्मा शुद्ध होतो.
जर तुम्ही गंगाजलात उभे राहून माळेचा जप केला तर त्याचे परिणामही वेगळे असतील.वेगवेगळ्या प्रकारे भजन करण्याच्या या पद्धती आहेत. गंगा, यमुना, सरस्वती आणि नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांचे दर्शन घेणे, गोठ्यात किंवा मंदिरात जाणे आणि तेथे पूजा करणे. यामुळे तुम्ही सृष्टीत असलेल्या विविध रुपातील देवाच्या अंश अनुभवता. तहान भागवणाऱ्या नदीला कृतज्ञता व्यक्त करणं, गोशाळेतील गायींची सेवा करणं, यामुळे तुम्ही देवाच्या आणखी जवळ जाता आणि तुमच्याही नकळत तुमच्यातील अध्यात्मिक ऊर्जा वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)