प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात एका व्यक्तीने महाराजांना प्रश्न केला की कंपनीतील कर्माचाऱ्यांना काढलं तर बॉसला याची शिक्षा होते का ? प्रेमानंद महाराजांनी यावर खूप परखडपणे उत्तर दिलं. प्रेमानंद महाराज म्हणतात की, नोकरी प्रत्येकासाठी महत्वाची असते कारण त्या नोकरीवर प्रत्येकाचं कुटुंब अवलंबून असतं. मात्र काही कारणांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात येतं. मुळात नोकरीवरुन काढून टाकणं अत्यंत वाईट असलं तरी बॉस कोणत्या कारणामुळे कर्माचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करतो त्या कारणावरुन ठरतं बॉसला पाप लागतं की नाही.
प्रेमानंद महाराज म्हणाले की, एखादा कर्मचारी जर कंपनीच्या नियमांना धाब्यावर बसवत असेल किंवा कंपनीत गैरप्रकार करताना आढळलं तर अशा कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढताना बॉसला कोणत्याही प्रकारतं पाप लागत नाही. उलट बॉसची ही नैतिक जबाबदारी आहे की, कंपनीत शिस्तीचं पालन होतं की नाही हे पाहणं आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीला योग्य ती शिक्षा देणं. जर असं काही गैरवर्तन झालं आणि कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तर बॉस चुकीचा नसतो.
अनेकदा असं होतं की, कंपनीच्या काही समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांना नियमीत पगार देणं शक्य होत नाही अशावेळी कंपनी काही कर्माचाऱ्यांना कामावरुन काढून टाकते. जसं की, कंपनीकडे 500 कर्मचारी आहेत आणि कंपनीला 200 कर्मचाऱ्यांना पगार देणं शक्य आहे, अशा वेळी मॅनेजमेंट किंवा बॉसने मिळून कर्मचाऱ्यांना कमी करण्य़ाचा घेतलेला निर्णय हा चुकीचा नसतो तर कंपनीच्या भल्यासाठी तसं करणं योग्य ठरतं.
चुकीच्या पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरुन कमी करणं. जसं की, एका प्रमाणिक कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकणं त्याने कोणतीही चूक केली नसताना. ऑफिसमधील राजकारण होत असल्याने जर प्रमाणिक कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा आली तर त्या कर्मचाऱ्य़ाला कुटुंबाचे श्राप बॉसला लागतात. त्यामुळे एकट कृती पण त्यामागचा हेतू कोणता आहे यावर त्या कर्माची शिक्षा आणि फळ अवलंबून असतं असं प्रेमानंद महाराजांनी सांगितलं.
Ans:
Ans:
Ans:






