Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chathushringi Devi: चतुःश्रृंगी देवीचा काय आहे महिमा आणि तिची कथा जाणून घ्या

पुण्यातील चतुःश्रृंगी देवी ही महाराष्ट्रातील जागृत आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शक्तीपीठांपैकी एक आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते, विशेषतः नवरात्रोत्सवात येथे भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. चतुःश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 05, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील सेनापती बापट रस्त्याजवळ टेकडीवर वसलेले चतुःश्रृंगी देवी मंदिर
  • चतुःश्रृंगी देवीला आंबेश्वरी नावाने ओळखले जाते
  • पुण्यातील अनेक कुटुंबाची कुलस्वामिनी
 

महाराष्ट्रातील पुणे शहर हे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी चतुःश्रृंगी देवी मंदिर हे एक अत्यंत पवित्र आणि जागृत शक्तीस्थान मानले जाते. पुण्यातील सेनापती बापट रस्त्याजवळ टेकडीवर वसलेले हे मंदिर लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे भक्तांची विशेष गर्दी पाहायला मिळते. देवीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

देवी दुर्गेचं शक्तीपीठ असलेली आणि देवीला आंबेश्वरी नावाने ओळख

चतुःश्रृंगी देवी मंदिर हे पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानलं जातं. सेनापती बापट मार्गावरती टेकडी वरती बसलेले हे मंदिर पुणेकरांच्या श्रद्धेच महत्त्वाचं केद्र आहे. देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते. मूर्तीमध्ये देवीचे तेजस्वी रुप मानले पाहायला मिळते. चतुःश्रृंगी या नावाचा अर्थ चार शिखरे असलेली असा होतो. मंदिराभोवती चार टेकड्या असल्यामुळे देवीला हे नाव पडल्याचं मानलं जातं. हे मंदिर देवी दुर्गेचं शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं. चतुःश्रृंगी देवीला आंबेश्वरी असंही म्हणतात.

मंदिरापर्यंत जाण्यासाठी १५० हून अधिक पायऱ्या

या देवीची मूर्ती स्वयंभू आणि सिंदुर लेपित आहे. हे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती याचं एकत्रित रुप मानलं जातं. मुख्य मंदिरात जाण्यासाठी सुमारे 150 हून अधिक पायऱ्या चढायला लागतात.

Kali Jogeshwari devi: काळी जोगेश्वरी देवी कोण आहे? काय आहे या देवीचा महिमा, जाणून घ्या

चतुःश्रृंगी देवीची कथा

लोककथेनुसार प्राचीन काळात पुण्याजवळील परिसरात दाट असं जंगल होतं. त्या काळात दुर्लभ पितांबरदास नावाचा एक व्यापारी भक्त होता. असं सांगितलं जातं, त्याला देवीने स्वप्नात दर्शन दिलं आणि टेकडीवरती स्वतःची मूर्ती असल्याचं सांगितलं. यानंतर त्याने या ठिकाणी शोध घेतला असता टेकडीमध्येच स्वयंभू मूर्ती सापडली. त्यानंतर येथे मंदिराची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून चतुःश्रृंगी देवी पुण्याची जागृत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाऊ लागली. मुख्य मंदिराच्या परिसरात देवी दुर्गा आणि पार्वतीनंदन गणेशाचेही मंदिर आहे.

Koradi Mahalakshmi Temple: काय आहे विदर्भातील कोराडी देवी मंदिराचा इतिहास, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

पुण्यातील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी

पुण्यातील धार्मिक स्थळांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. विशेषतः नवरात्रीत येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनेक जण देवीचा आशीर्वाद घेतात. शिवाय पुण्यातील अनेक कुटुंबाची ही कुलस्वामिनी देखील आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चतुःश्रृंगी या नावाचा अर्थ काय आहे?

    Ans: चतुः" म्हणजे चार आणि "श्रृंग" म्हणजे शिखरे. मंदिराभोवती चार टेकड्या असल्यामुळे देवीला चतुःश्रृंगी असे नाव पडले.

  • Que: चतुःश्रृंगी देवी कोणत्या देवीचे रूप मानले जाते?

    Ans: चतुःश्रृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे एकत्रित स्वरूप मानले जाते.

  • Que: मंदिर स्थापनेची कथा काय आहे?

    Ans: लोककथेनुसार दुर्लभ पितांबरदास नावाच्या भक्ताला देवीने स्वप्नात दर्शन दिले आणि टेकडीवर स्वतःची मूर्ती असल्याचे सांगितले. त्यानंतर मूर्ती सापडून मंदिराची स्थापना झाली

Web Title: What is the glory and story of chatushrungi devi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
1

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
2

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
3

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश
4

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.