Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljabhavani Devi: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तुळजाभवानी देवी, काय आहे इतिहास आणि महिमा

छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापन्यासाठी जिने आशिर्वाद दिले. असंख्य घराण्यांची कुलस्वामिनी असलेली, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेली तुळजापूरच्या तुळजा भवानीबद्दल आज विशेष काही माहिती घेऊ य

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 08, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तुळजाभवानी देवी
  • काय आहे तुळजाभवानी देवीचा महिमा
  • काय आहे तुळजाभवानी देवीचा इतिहास
 

 

तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे. धाराशिव जिल्ह्यातील या तीर्थक्षेत्री भवानीमाता महिषासुरमर्दिनी रूपात विराजमान असून, ती छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्यदेवता (कुलदेवता) आहे. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी आणि भोसले घराण्याची कुलदेवता म्हणून या मंदिराला अनन्यसाधारण ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे.

महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील ‘बाळाघाट’ पर्वताच्या डोंगरमाथ्यावर हे मंदिर वसलेले आहे. देवीची मूर्ती स्वयंभू असून ती शाळीग्राम शिळेपासून बनलेली आहे. देवी अष्टभुजा असून, महिषासुराचा वध करणाऱ्या रूपात आहे. भोसले घराण्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार या देवीने प्रदान केली होती, अशी आख्यायिका आहे. तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्राच्या क्षात्रतेजाची आणि भक्तीची प्रेरणाशक्ती मानली जाते, जिच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात.

Astro Tips: घराच्या उंबरठ्यावर उभे असताना करू नका या चुका, जीवनात येऊ शकतात समस्या

आख्यायिका

कृतयुगाच्या वेळी ‘कर्दम’ ऋषींची पत्‍नी ‘अनुभूती’ हिच्याबद्दल ‘कुंकुर’ नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्‍न करताच देवी पार्वती ही धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा भवानी असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती.

या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. भक्ती आणि शक्तीचा अविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरीपर्यंत चालतो.

तुळजाभवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा १४ नोव्हेंबर इ.स. १३९८चा शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे 1600 वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली, तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे.

मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे, असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे. तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप तरीही विलोभनीय आहे.

Mahabharata: महाभारतात युद्धापूर्वी शंखनाद का केला जात होता? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारणे

मंचकी निद्रा

देवी वर्षातून सुमारे २१ दिवसांसाठी निद्रावस्थेत जाते. ज्याला मंचकी निद्रा असे म्हणतात.. याकाळात देवीला पलंगावर विश्रांतीसाठी ठेवले जाते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुळजाभवानी देवीला साडेतीन शक्तीपीठांपैकी एक का मानले जाते?

    Ans: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये तुळजाभवानी मंदिर हे पूर्ण शक्तीपीठ मानले जाते. देवीची शक्ती आणि धार्मिक महत्त्वामुळे या मंदिराला विशेष स्थान आहे.

  • Que: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुळजाभवानी देवीचा काय संबंध आहे?

    Ans: तुळजाभवानी ही शिवाजी महाराजांची कुलदेवता मानली जाते. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना “भवानी तलवार” प्रदान केली होती.

  • Que: तुळजाभवानी देवीची पौराणिक कथा काय आहे?

    Ans: कथेनुसार “कुंकुर” नावाच्या दैत्याचा नाश करण्यासाठी पार्वती देवी त्वरित प्रकट झाली. त्यामुळे तिला “तुळजा भवानी” असे नाव पडले.

Web Title: What is the history and glory of goddess tulja bhavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Tuljabhavani

संबंधित बातम्या

Friday Rules: शुक्रवारी साखर उसनी का देऊ नये? जाणून घेऊया धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे
1

Friday Rules: शुक्रवारी साखर उसनी का देऊ नये? जाणून घेऊया धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे

Krishna Story: श्रीकृष्णाच्या पुत्राला जन्मानंतर अवघ्या सहाव्या दिवशी माशाने का गिळले? जाणून घ्या द्वारकेतील अद्भुत पौराणिक कथा
2

Krishna Story: श्रीकृष्णाच्या पुत्राला जन्मानंतर अवघ्या सहाव्या दिवशी माशाने का गिळले? जाणून घ्या द्वारकेतील अद्भुत पौराणिक कथा

Vat Purnima 2026: यमराजांकडून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कोण होती? जाणून घ्या वटसावित्री व्रतामागील पौराणिक कथा
3

Vat Purnima 2026: यमराजांकडून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कोण होती? जाणून घ्या वटसावित्री व्रतामागील पौराणिक कथा

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास
4

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.