Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shree Ram Temple: विध्वंस ते पुनर्निर्माणाची प्रेरणादायी कथा, काय आहे श्रीराम मंदिराचा इतिहास

लव-कुशांनी येथे पहिले मंदिर उभारले, परंतु कालांतराने अनेक आक्रमकांनी या मंदिरावर हल्ले करून त्याचे विध्वंस केले. अखेर २०२४ साली असंख्य अडचणी आणि संघर्षाचा शेवट झाला आणि भव्य राममंदिर उभारले गेले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 23, 2026 | 01:51 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीराम मंदिराचा काय आहे इतिहास
  • विध्वंस ते पुनर्निर्माणाची प्रेरणादायी कथा
  • २०२४ साली उभारण्यात आले मंदिर
 

महाराज कुश आणि लव यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे पहिले मंदिर बांधले. त्यानंतर अनेक वर्षांनंतर ग्रीक राजा मीनांडर या यवन राजाने आक्रमण करून ते मंदिर पाडून टाकले. येथून अयोध्येतील मंदिरावर आक्रमणांची मालिका सुरू झाली. आक्रमकांनी मंदिर पाडायचे आणि हिंदू राजाने त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करायचा हे सुरूच होते.

ग्रीकांच्या आक्रमानंतर सम्राट विक्रमादित्य महाराजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर आक्रमणे झाली, पण आपल्या हिंदू राजांनी मंदिराचे संरक्षण केले. पुढे 150 ते 200 वर्षे मंदिर दिमाखात उभे राहिले. पण आक्रमणांची मालिका संपलीच नाही. हिंदूची अस्मिता असलेल्या राम मंदिरावर मुस्लीम आक्रमकांनी स्वाऱ्या केल्या. बाबर, मीर बाकी यांच्या आक्रमणापासून हिंदू समाजाने लढा दिला. लाखो हिंदूचे बलिदान झाले. याबाबतच थोडक्यात..

पृथ्वीराजाची ती चूक

अकराव्या शतकाच्या शेवटी प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर गौर, गुलाम, खिलजी आणि तुघलक यांच्या वंशातील आक्रमकांची मालिका सुरूच झाली. महंमद घोरीचे भारतावर आक्रमण झाले. त्याला योग्य न समजण्याची चूक पृथ्वीराजाकडून झाली नसती, तर कदाचित प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीचा विध्वंस झाला नसता.

Ramayana: आजही जिवंत आहेत श्रीरामांच्या आठवणी, वनवासातील श्रीरामांचा अद्भुत प्रवास जाणून घेऊया

श्यामानंद महाराज यांच्याकडे योगसाधना शिकण्याची ख्वाजा आब्बास मुसा अशिकान या नावाच्या एक मुस्लीम फकिराने प्रार्थना केली. पण त्यांनी त्याला सांगितले की, तू जरी किती हिंदू धर्मात प्रवेश केला तरी ती योगसिद्धी प्राप्त होणार नाही. त्यामुळे तू मला एलाह एल्लीलाहफ याचाच नियमपूर्वक जप कर. मी योगसाधनेच्या सामर्थ्याने तुला मदत करीन, त्याच्यासारखा दुसरा फकीर जलालशाह महाराजांकडे आला. त्याने महाराजांचे शिष्यत्व मिळवले. ते दोघे आश्रमात राहू लागले. पण महाराज त्यांना ओळखू शकले नाहीत. महाराजांची शक्ती आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर ते दोघे रामजन्मभूमीलाच मक्का आणि पैगंबराचे स्थान बनवण्याचे कारस्थान करू लागले. यातूनच त्यांची बाबरशी भेट झाली आणि बाबराकडून मंदिराच्या जागी मशीद बनवण्याचे आश्वासन घेऊन त्याला आपले आशीर्वाद दिले.

अस्मितेचा लढा

सन 1527 साली बाबराने आपला मंत्री मीर बाकी याच्यावर हे काम सोपवून दिले. आपल्या मुस्लीम शिष्यांच्या कृत्याची बाबराला फूस असल्याचे श्यामानंद महाराजांच्या लक्षात आले.

Pradosh Vrat 2026: मार्च महिन्यामधील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

1528 साली मीर बाकीने स्वारी केली, पण असंख्य हिंदूच्या लढवय्येपणापुढे तो मंदिराला स्पर्शही करू शकला नाही. बाबराच्या आदेशामुळे त्याला शांत बसता येत नव्हते. त्याने पुन्हा आक्रमणाची नियोजनबद्ध तयारी सुरू केली. दुसरीकडे 80 हजार सशस्त्र सेना त्याचा प्रतिकार करण्यास तयार होती. 17 दिवस घनघोर युद्ध झाले. मीर बाकीला मंदिर उद्ध्वस्त करण्यात यश आले. पण यामध्ये दीड लाखांच्या आसपास त्याचे सैन्य मारले गेले. यानंतर मंदिराच्या जागी मीर बाकीने मशीद उभारण्याचे काम सुरू केले. त्याला आव्हान देण्यासाठी एक युवक योद्धा देवीदीन पांडे पुढे आला, त्यांच्यासोबत अनेक हिंदूची फौज, आशीर्वाद होते. त्याने कडवी झुंज दिली. लढाईत त्याचा एवढा उग्र अवतार होता की, तीन तासांत 700 लोकांना कापून काढले होते. पण दुर्दैवाने मीर बाकीच्या अंगरक्षकाने फेकलेल्या विटेने देवीदीनचे डोके फुटले, जखमी अवस्थेतही तो लढत राहिला. देवीदीन पांडे या लढाईत हुतात्मा झाला. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला.

मीर बाकीचे मोठ्या प्रमाणात सैन्य मारले गेले. पुढे अयोध्येपासून काही मैलावर असलेल्या कोशल येथील महाराजा रणविजयसिंह आणि महाराणी जयराजकुमारी यांनी मीर बाकीचा प्रतिकार केला. महाराजा रणविजयसिंह यांच्या सैन्याने मीर बाकीच्या सैन्यावर अचानक हल्ला केला. देवीदीन पांडेच्या हल्ल्यातून ते सैन्य सावरले नसल्याने या हल्ल्याला प्रतिकार करू शकले नाही. काही दिवसांत मीर बाकी भूमिगत झाला. एका अर्थी हा पराजयच होता. त्यामुळे रणविजयसिंह यांनी प्रभू श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विचार करू लागले. तोच मीर बाकी आपले सैन्य घेऊन आला आणि रणविजयसिंह यांच्या सैन्यावर आक्रमण केले. त्यामध्ये ते हुतात्मा झाले. महाराजांच्या निधनाची बातमी समजली, पण त्यांची पत्नी डगमगली नाही. महाराणी जयराजकुमारी यांनी हा लढा पुढे चालू ठेवण्याचा शंखनाद केला.

हिंदूच्या अस्मिता केंद्रांवर आक्रमण

बाबराने हिंदूच्या श्रद्धास्थानांचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली, याचे खरे कारण म्हणजे हिंदुस्थानावर आपले राज्य करायचे असेल तर हिंदूच्या अस्मिता केंद्रांवर आक्रमण केले पाहिजे. यातूनच श्रीराम जन्मभूमीवर आक्रमण केले. या लढ्यात जवळपास पावणेदोन लाखांच्या आसपास हिंदू वीरांनी बलिदान दिले.

प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी असंख्य राजा, महाराजा, साधू, संत, महात्मा व सामान्य जनता यांनी लढा दिला. तरीसुद्धा अयोध्येत श्रीरामाचे मंदिर जीर्णोद्धार होऊ शकले नव्हते. स्वातंत्र्यानंतर ही जागा न्यायालयीन लढ्यात अडकली. अखेर २०२४ साली श्रीरामाचे मंदिर उभारले गेले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राम मंदिर अयोध्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: हे मंदिर भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान मानले जाते आणि हिंदूंसाठी अत्यंत पवित्र श्रद्धास्थान आहे.

  • Que: राम मंदिराचा इतिहास कसा आहे?

    Ans: पौराणिक मान्यतेनुसार, लव-कुशांनी येथे पहिले मंदिर बांधले. त्यानंतर अनेक आक्रमणांमुळे मंदिराचे विध्वंस झाले आणि पुन्हा पुनर्निर्माण होत राहिले.

  • Que: राम मंदिराचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हे मंदिर श्रद्धा, विश्वास आणि धर्माचे प्रतीक असून कोट्यवधी भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे.

Web Title: What is the history of shree ram temple ayodhya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • ayodhya
  • Ram Temple in Ayodhya
  • shree Ram

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.