Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skanda Sashti 2026: फेब्रुवारी महिन्यात स्कंद षष्ठी कधी आहे, जाणून घ्या पूजा पद्धत आणि नियम

स्कंद षष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान कार्तिकेयाचा आशीर्वाद राहील. कार्तिकेयाच्या आशीर्वादाने आरोग्याच्या संबंधित समस्या, जीवनामध्ये येणारी संकटे दूर होतात. स्कंद षष्ठी कधी आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 22, 2026 | 09:35 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्कंद षष्ठी कधी आहे
  • स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त
  • स्कंद षष्ठी पूजा पद्धत आणि नियम
 

सनातन धर्मामध्ये  स्कंद षष्ठीला विशेष महत्त्व आहे. हे व्रत देवतांचे सेनापती आणि भगवान शिवांचे मोठे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. भगवान कार्तिकेयांना मुरूगम आणि सुब्रमण्यम  देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठीचे व्रत पाळले जाते. षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयची विधिवत पूजा करावी.

स्कंद षष्ठीला भगवान कार्तिकेयाची पूजा केल्याने आशीर्वादाने आरोग्याच्या समस्या, शत्रू, जीवनाशी संबंधित समस्या दूर होतात. याव्यतिरिक्त मुलांना दिर्घायुष्य, चांगले आरोग्य आणि प्रगती होते. ज्या महिलांना अपत्यप्राप्ती हवी आहे त्यांनी हे व्रत करण्याचा सल्ला दिला जातो. फेब्रुवारी महिन्यातील स्कंद षष्ठी कधी आहे, महत्त्व आणि नियम जाणून घ्या

कधी आहे स्कंद षष्ठी

पंचांगानुसार, यावेळी फाल्गुन महिन्यातील शुल्क पक्षातील षष्ठी तिथिची सुरुवात रविवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.9 मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.9 मिनिटांनी होणार आहे. अशा वेळी रविवार, 22 फेब्रुवारी रोजी स्कंद षष्ठीचे व्रत पाळले जाणार आहे.

zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

स्कंद षष्ठी मुहूर्त

स्कंद षष्ठीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त 5.12 वाजल्यापासून 6.3 पर्यंत असेल. तर अभिजित मुहूर्त दुपारी 12.12 वाजल्यापासून 12. 58 मिनिटांपर्यंत असेल. गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6.14 ते 6.39 पर्यंत असेल. अमृत काळ सकाळी 11.4 ते दुपारी 12.35 पर्यंत असेल. निशिता मुहूर्त रात्री 12.9 ते 12.59 पर्यंत असेल.

स्कंद षष्ठी पूजा पद्धत

स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर देव्हारा साफ करून घ्या. नंतर भगवान कार्तिकेयाच्या मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. त्याची विधीपूर्वक पूजा करा. त्यांना फळ, फूल, मिठाई आणि हंगामी फळांचा नैवेद्य दाखवा. या व्रताची कथा वाचा. कार्तिकेयाच्या मंत्रांचा जप करा. शेवटी आरती करा.

Numberlogy: स्कंद षष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

स्कंद षष्ठी व्रताचे नियम

स्कंद षष्ठी व्रताची दिवसभर ब्रम्हचर्याचे पालन करावे. सूर्योदयाच्या वेळी व्रताची पूजा करावी. व्रताचे पालन भगवान सूर्याला पाणी देऊन करावे. वाईट विचार करण्याचे टाळा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. केस धुण्याचे टाळा.

आरती आणि प्रार्थना

पूजेनंतर कापूरचा वापर करून भगवान कार्तिकेयाची आरती करावी. आरतीनंतर नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा. संध्याकाळी मंदिरात दिवा दान करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्कंद षष्ठी कधी आहे?

    Ans: फेब्रुवारी महिन्यातील स्कंद षष्ठी रविवार, 22 फेब्रुवारी रोजी आहे

  • Que: स्कंद षष्ठीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: स्कंद षष्ठी हा दिवस भगवान कार्तिकेय (मुरुगन/स्कंद) यांना समर्पित आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्यास शत्रूंवर विजय, धैर्य, आरोग्य आणि संततीसुख मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: स्कंद षष्ठीला कोणते विशेष उपाय करावेत?

    Ans: लाल किंवा पिवळी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते, मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणात प्रगतीसाठी प्रार्थना करावी, गरजूंना अन्नदान करणे पुण्यकारक मानले जाते.

Web Title: When is the muhurat for skanda shashthi in the month of february puja method and rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
1

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
3

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.