
त्यांच्या अंगावर सतत दिसणारी भस्म ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती जीवनाचे गूढ सत्य सांगणारी आहे. भस्म म्हणजे जळाल्यानंतर उरलेली राख. याचाच अर्थ सगळं काही नाशवंत आहे पण सत्य हे अंतिम आहे. म्हणूनच शंकर आपल्या अंगाला भस्म लावून मोह माया यापासून लांब राहण्याची शिकवण देतात.
पौराणिक कथेनुसार, असं म्हटलं जातं की, देवी सतीच्या वडीलांनी महादेवांचा भर सभेत अपमान केला त्यामुळे क्रोधीत झालेल्या सतीने स्वत: ची अग्नीकुंडात आहुती दिली. त्यावेळी तिची झालेली राख महादेवांनी अंगाला फासली. तर काही दंतकथेनुसार असं देखील सांगितलं जातं की, एकदा भगवान शंकर स्मशानभूमीत ध्यानस्थ होते. पंचमहाभूतांचे संतुलन टिकवण्यासाठी ते लीन झाले होते. त्या वेळी देवता, ऋषी-मुनी आणि गण त्यांच्या दर्शनासाठी तेथे आले.
देवतांनी पाहिले की भगवान शंकर अंगाला भस्म लावून स्मशानात राहत आहेत. तेव्हा त्यांनी शंकरांना विचारले, “हे महादेवा, आपण वैभव, सुवर्ण, रत्ने सोडून भस्म का धारण करता?” त्यावर भगवान शंकर म्हणाले, “हे भस्म म्हणजेच अंतिम सत्य. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट नष्ट होते, पण भस्म उरते. जो या सत्याला ओळखतो, तोच मुक्तीच्या मार्गावर जातो.”अशी मान्यता आहे की, त्या वेळी देवतांनी स्मशानातील चिताभस्म गोळा करून मंत्रोच्चार करत भगवान शंकरांची आरती केली. हीच पहिली भस्म आरती मानली जाते. त्या आरतीत भस्म अर्पण करून देवतांनी अहंकाराचा त्याग आणि वैराग्य स्वीकारण्याची प्रतिज्ञा केली.
आणखी एका आख्यायिकेनुसार, त्रिपुरासुराच्या वधानंतर त्या राक्षसांच्या तीन नगऱ्या जळून भस्म झाल्या. त्या भस्माने भगवान शंकरांनी अंग लेपले, ज्यातून त्यांनी दाखवून दिले की अधर्माचा अंत आणि धर्माचा विजय शेवटी भस्मातच विलीन होतो.
भस्म आरतीची कथा देखील अत्यंत भावपूर्ण आहे. मान्यता अशी आहे की एकदा भगवान शंकर स्मशानभूमीत ध्यानस्थ होते. तेथे उपस्थित असलेल्या ऋषी-मुनींनी आणि भक्तांनी भस्म गोळा करून त्यांची आरती केली. त्या वेळी शंकरांनी प्रसन्न होऊन सांगितले की, जो भक्त श्रद्धेने भस्म लावतो आणि त्याचा अहंकार त्यागतो, त्याच्यावर माझी कृपा सदैव राहील. त्या दिवसापासून भस्म आरतीची परंपरा सुरू झाली.काशी विश्वनाथ मंदिरातील भस्म आरती विशेष प्रसिद्ध आहे. पहाटेच्या वेळी, मंत्रोच्चार, घंटानाद आणि भस्माच्या लेपनासह होणारी ही आरती भक्तांना आध्यात्मिक अनुभूती देते. भस्म आरतीचा अर्थ केवळ पूजा नसून, जीवन-मरणाच्या सत्याची जाणीव करून देणे हा आहे.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.
Ans: भस्म हे नश्वरतेचे प्रतीक आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट शेवटी नष्ट होते आणि भस्मात विलीन होते, हे सत्य भक्तांना सतत स्मरणात राहावे म्हणून भगवान शंकर भस्म धारण करतात.
Ans: भगवान शंकरांची विशेष आरती म्हणजे भस्म आरती. या आरतीत भस्म अर्पण करून मंत्रोच्चार, शंख-घंटानाद केला जातो. ती वैराग्य आणि आत्मज्ञानाचे प्रतीक मानली जाते.
Ans: पौराणिक आख्यायिकेनुसार, देवता व ऋषी-मुनींनी स्मशानात ध्यानस्थ असलेल्या भगवान शंकरांची चिताभस्म अर्पण करून आरती केली. तेव्हापासून भस्म आरतीची परंपरा सुरू झाली.