हिंदू धर्मातील पुरणानुसार असं म्हटलं जातं की, ब्रम्ह विष्णू आणि महेश हे तीन देव सृष्टीचे निर्माते आणि पालनहार आहेत.या तीन देवांना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. देशात भगवान विष्णूंना समर्पित अनेक मंदिरे आहेत जिथे भक्त पूजा करतात,मात्र असं एक आश्चर्यकारक मंदिर आहे जिथे भगवान विष्णूंचीच नाही तर त्यांच्या शस्त्रांची देखील पूजा केली जाते.
भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनहार आहे. या सृष्टीचं चक्र सुरळीत चालावं यासाठी आपल्या सुरदर्शन चक्राने त्यांनी अनेक असुरांचा वध केला अशी आख्यायिका देखील सांगितली जाते. जसं भगवान शिवाचं त्रिशूल हे शस्त्र आहे तसंच विष्णूंचं सुदर्शन चक्र. याच त्यांच्या सुदर्शन चक्राची पूजा तामिळनाडूतील एका मंदिरात केली जाते. हे देशातील एकमेव असं मंदिर आहे जिथे सुदर्शन चक्राची पूजा केली जाते.
चक्रपाणी स्वामी मंदिर हे तामिळनाडूतील प्रसिद्ध असं मंदिर आहे. विष्णूच्या सुदर्शन चक्राची पूजा होत असल्याने या मंदिराचं हे वैशिष्ट्यं दिसून येतं. चक्रपाणी स्वामी मंदिराबद्दल अशी श्रद्धा आहे की येथे दर्शन घेतल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात.यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या कुंडलीतून ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात. हे मंदिर धर्म आणि पृथ्वीचे संतुलन राखणारे मानले जाते. चक्रपाणी स्वामी मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
नीतिमत्ता आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या सुदर्शन चक्राची पूजा केली जाते. देशाच्या दक्षिण भागात, तामिळनाडूतील कुंभकोणम येथे कावेरी नदीच्या काठावर असलेले चक्रपाणी स्वामी मंदिर अनेकांना रहस्यमय वाटतं. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या मंदिरात, धर्म आणि न्यायाचे प्रतीक असलेले शस्त्र सुदर्शन चक्राची पूजा केली जाते.येथे आठ हात असलेल्या भगवान विष्णूच्या भयंकर रूपाची पूजा केली जाते. ते त्यांच्या सर्व हातांवर शस्त्रे धारण करतात आणि त्यांचा तिसरा डोळा देखील दर्शविला आहे.
अशी आख्यायिका सांगितली जाते की, जेव्हा राक्षस राजा जालंधरसुर पृथ्वीवर हाहाकार माजवत होता तेव्हा भगवान विष्णूने आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी जालंधरसुराचा वध केला.या राक्षसाचा वध करण्यासाठी, भगवानांनी पाताळातून सुदर्शन चक्र बोलावले. त्याचे तेज सूर्यदेवापेक्षाही जास्त होते.ब्रह्मा कावेरी नदीच्या काठावर ध्यान करत असताना त्यांना चक्राची शक्ती दिसली आणि त्यांनी एक मंदिर स्थापन केले. आज हे मंदिर चक्रपाणी स्वामी नावाने ओळखलं जाते. जिथे सुदर्शन चक्राची पूजा केली जाते.या मंदिरात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुदर्शन यज्ञ केला जातो. पूजेदरम्यान, भगवान विष्णूंना तुळशी, हार आणि पीठाची खीर अर्पण केली जाते. या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी देखील पाहायला मिळते.
Ans: हे भारतामधील एकमेव मंदिर आहे जिथे भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राची स्वतंत्र पूजा केली जाते.
Ans: सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूंचे दिव्य शस्त्र असून ते धर्म, नीतिमत्ता आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. अधर्माचा नाश करण्यासाठी विष्णूंनी याचा उपयोग केला असल्याचे पुराणांमध्ये सांगितले जाते.
Ans: या मंदिरात आठ हातांचे, भयंकर आणि तेजस्वी रूपातील भगवान विष्णू पूजले जातात. त्यांच्या सर्व हातांत शस्त्रे आहेत आणि तिसरा डोळा देखील दर्शविला आहे.






