
Marathwada Mukti Din
Marathwada Mukti Din : मराठवाडा मुक्ती दिन हा 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस मराठवाड्यातील लोकांसाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, परंतु हैदराबाद संस्थानाचे निजाम यांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार दिला. मराठवाडा हा त्या संस्थानाचा भाग होता. निजामाच्या राजवटीत मराठवाड्याच्या जनतेवर अनेक अत्याचार झाले. तेथील लोकांना स्वातंत्र्याची ओढ होती. भारतीय सैन्याने “ऑपरेशन पोलो” ही सैनिकी कारवाई राबवली, ज्याद्वारे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र भारतात सामील होण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.