Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

28 July History: डॉ. वर्गीस कुरियन यांना ‘पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार’ प्रदान; जाणून घ्या २८ जुलैचा इतिहास..

28 July History: भारतीय धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांना 'पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार' कधी प्रदान करण्यात आला? चौधरी चरण सिंग भारताचे ५ वे पंतप्रधान कधी बनले? २८ जुलै रोजी देश-विदेशात घडलेल्या प्रमुख ऐतिहासिक घटना, जन्म आणि मृत्यू दिनविशेष जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 29, 2026 | 09:38 AM
kurian

kurian

Follow Us
Follow Us:

28 July History:  भारतात ‘धवल क्रांती’ घडवून आणून दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देणारे डॉ. वर्गीस कुरियन हे अमूल (Amul) ब्रँडचे मुख्य शिल्पकार मानले जातात. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील उत्तुंग योगदानाची दखल घेऊन त्यांना आजच्या दिवशी प्रतिष्ठित ‘पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सेंट मार थॉमस चर्चतर्फे सामाजिक सेवा, मानवी कल्याण आणि राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. डॉ. कुरियन यांनी अमूल मॉडेलच्या माध्यमातून देशातील लाखो लहान-मोठ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. हा सन्मान केवळ डॉ. कुरियन यांच्या कर्तृत्वाचा नसून, त्यांनी संघटित केलेल्या कोट्यवधी भारतीय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव आहे. त्यांचे हे महान कार्य आणि मिळालेले पुरस्कार आजही भारतातील तरुण पिढीला समाजसेवेची आणि उद्योजकतेची प्रेरणा देतात.

27 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1821 : पेरूला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले
  • 1933 : सोव्हिएत युनियन आणि स्पेन यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1933 : अंडोराचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1934 : पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
  • 1943 : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने हॅम्बर्ग, जर्मनीवर बॉम्बहल्ला केला आणि 42,000 नागरिक मारले.
  • 1976 : चीनच्या तांगशान प्रांतात 7.8 ते 8.2 तीव्रतेचा भूकंप. अनेक ठार आणि जखमी.
  • 1979 : भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंग यांची नियुक्ती.
  • 1984 : लॉस एंजेलिसमध्ये 23व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1998 : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना.
  • 1999 : भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.
  • 2001 : इयान थॉर्प जागतिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारा पहिला जलतरणपटू ठरला.
  • 2001 : आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2017 : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवले.
Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास

27 जुलै रोजी जन्म दिनविशेष 

  • 907 : ‘अर्ल टपर’ – टपर वेअरचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑक्टोबर 1983)
  • 1925 : ‘बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग’ – हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 5 एप्रिल 2011)
  • 1929 : ‘जॅकलिन केनेडी’ – जॉन एफ. केनेडी यांची पत्नी यांचा जन्म.
  • 1936 : ‘सरगॅरी सोबर्स’ – वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज यांचा जन्म.
  • 1945 : ‘जिम डेव्हिस’ – अमेरिकन व्यंगचित्रकार यांचा जन्म.
  • 1954 : ‘ह्युगो चावेझ’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 5 मार्च 2013)
  • 1970 : ‘पॉल स्ट्रँग’ – झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

27 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 450 : 450ई.पुर्व  : ‘थियोडॉसियस दुसरा’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 10 एप्रिल 401)
  • 1794 : ‘मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे’ – फ्रेंच क्रांतिकारी यांचे निधन.
  • 1844 : ‘जोसेफ बोनापार्ते’ – नेपोलियनचा फ्रेंच भाऊ यांचे निधन. (जन्म : 7 जानेवारी 1768)
  • 1934 : ‘लुइस टँक्रेड’ – दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू यांचे निधन.
  • 1968 : ‘ऑटो हान’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 8 मार्च 1879)
  • 1975 : ‘राजाराम दत्तात्रय ठाकूर’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1923)
  • 1977 : ‘पंडित राव नगरकर’ – गायक आणि अभिनेते यांचे निधन.
  • 1981 : ‘बाबूराव गोखले’ – नाटककार यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1925)
  • 1988 : ‘सैद मोदी’ – राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग 8 वेळा विजेतेपद मिळवणारे यांचे निधन.
  • 2016 : ‘महाश्वेता देवी’ –  बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
July 27 History: आज सीआरपीएफ स्थापना दिवस; जाणून घ्या २७ जुलैचा इतिहास..

Web Title: 28 july history today in history dr verghese kurien palos mar gregorios award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Amul Milk
  • day history

संबंधित बातम्या

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..
1

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..

5 ऑक्टोबरला का साजरा केला जातो World Teachers Day? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि डिजिटल युगातील शिक्षकांचे स्थान
2

5 ऑक्टोबरला का साजरा केला जातो World Teachers Day? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि डिजिटल युगातील शिक्षकांचे स्थान

No Disposable Cup Day : कॅफे आणि टी-स्टॉलवर स्वतःचा कप वापरल्यास काय होतात फायदे? वाचा ‘हा’ विशेष लेख
3

No Disposable Cup Day : कॅफे आणि टी-स्टॉलवर स्वतःचा कप वापरल्यास काय होतात फायदे? वाचा ‘हा’ विशेष लेख

World Animal Day : ‘हेनरिक झिमरमन ते संत फ्रान्सिस…’ जाणून घ्या कसा सुरू झाला जागतिक प्राणी दिनाचा रंजक प्रवास?
4

World Animal Day : ‘हेनरिक झिमरमन ते संत फ्रान्सिस…’ जाणून घ्या कसा सुरू झाला जागतिक प्राणी दिनाचा रंजक प्रवास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.