Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपाची मुस्लिमांना भेट मस्त, ‘सौगात-ए-मोदी’ हे नाव दिले भारदस्त !

भाजपाने मुस्लिम समाजासाठी खास भेटवस्तू देण्याची घोषणा केली असून, या भेटीला ‘सौगात-ए-मोदी’ असे भारदस्त नाव देण्यात आले आहे. हा उर्दू शब्दप्रयोग वापरल्याने मुस्लिम समाजाच्या मनात एक वेगळा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 31, 2025 | 02:59 PM
Ahead of Bihar elections BJP presents Saugat-e-Modi for Muslims

Ahead of Bihar elections BJP presents Saugat-e-Modi for Muslims

Follow Us
Close
Follow Us:

तानाजी म्हणाला, नेताजी, उर्दू भाषेत एक नजाकत आहे, त्याला एक लहेजा आहे, गोष्ट सांगायची एक खास पद्धती आहे. त्यावर नेताजी म्हणाले, तानाजी उर्दूबाबत सांगायचे झाले तर भाषेला एक गोडवा आहे, भाषा सौष्ठव आहे आणि उत्कटता आहे. तिची वर्णनशैलीसुद्धा सुंदर आहे. भाषणात किंवा संभाषणात बोलताना उर्दू भाषेतील भारदस्त शब्दांचा वापर आपसूक होतो अन् प्रभाव पाडून जातो. तानाजी म्हणाला, नेताजी उर्दूचा वापर आपण करीत नाही, तर खुद्द भाजपाने केला आहे. बिहारातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना खूश करण्यासाठी त्यांना सौगात-ए-मोदी नावाने भेट दिली आहे. या भेटीत खाण्यापिण्याच्या काही आवश्यक वस्तूंसोबतच मुस्लिम महिलांसाठी खास सलवार सूटचे कापड दिले आहे आणि तेसुद्धा या देशाच्या वजीर-ए-आजम अर्थात पंतप्रधानांमार्फत ही खास भेट दिली जाणार आहे. आपणास तर सौगात-ए-मोदीवरून मुगले आझमची आठवण आली असेल.

हे देखील वाचा : अमेरिकेचे शेती अनुदान आणि भारताची टैरिफ धोरणे यामागचं नेमकं वास्तव काय?

आपणसुद्धा उर्दूची शायरी ऐका. साहिर लुधियानवी, मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या सुमधुर गीतांचा आनंद घ्या. दीवन-ए-गालिब वाचा. त्यावर नेताजी म्हणाले, तानाजी भाषावादाला उगाच वाढवू नकोस. सौगात-ए-मोदी म्हणजेच मोदींकडून सप्रेम भेट ! उगाच वाद वाढविण्याऐवजी मराठीतही बोलत चला… पानी याला जल किंवा पाणी, दलील याला तर्क, मश्वराला सल्ला घेणे, अश्क याला अश्रू, रहमला दया, जुल्म याला अत्याचार, जुल्फें याला केसांची लट किंवा बट, दास्तान याला गोष्ट किंवा कथा, सलीका याला शिष्टाचार, गुनाह याला गुन्हा, वतन याला देश, सुबे याला प्रांत किंवा प्रदेश, सुबह याला सकाळ, शाम याला संध्याकाळ, उजाला याला प्रकाश, दौलत याला संपत्ती, दिल याला मन किंवा हृदय, दिमाग याला डोके किंवा मेंदू, जिगर याला यकृत, बेखौफ याला नीडर, जायकेदार खाना याला स्वादिष्ट भोजन, निवाला याला घास रास्ते याला मार्ग.

हे देखील वाचा :  Supreme Court : महिलांप्रति भेदभाव कधी संपणार? न्यायसंस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

खून याला रक्त, दवाई याला औषधी, कातिल याला खुनी किंवा हत्यारा, मरहूम याला स्वर्गीय, खोजबीन याला शोध किंवा अन्वेषण म्हणत चला. त्यावर तानाजी म्हणाला, नेताजी आपल्याला आता जरुरत याला गरज, तकलीफ याला कष्ट, हमदर्दी जताने याला सांत्वना देना म्हणावे लागेल. उर्दूतील शुक्रियाऐवजी आपण धन्यवादच म्हणू. आपण उर्दूचा वापर करण्याऐवजी मराठीचाच वापर करू. शेवटी आपली मराठी काही कमी नाही, तर माझी मराठी बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके अर्थात मराठी ही अमृतासोबतसुद्धा शर्यत, पैज जिंकू शकणारी भाषा आहे

Web Title: Ahead of bihar elections bjp presents saugat e modi for muslims nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Bihar Politics
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
1

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल
2

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

PM Modi CCS meeting: PM मोदींची दिल्लीमध्ये हाय लेव्हल बैठक! पाकिस्तानची वाढली धास्ती; पुन्हा ऑपरेशन सिंदूर होणार?
4

PM Modi CCS meeting: PM मोदींची दिल्लीमध्ये हाय लेव्हल बैठक! पाकिस्तानची वाढली धास्ती; पुन्हा ऑपरेशन सिंदूर होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.