
Zelensky slams India for double standards noting its concern for Putin's safety while ignoring Russian attacks on Ukraine
Zelensky Criticized India : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine war) धगधगत्या ज्वाळा आता केवळ रणांगणावरच नाही, तर राजनैतिक पातळीवरही पोहोचल्या आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या निवासस्थानावर झालेल्या कथित ड्रोन हल्ल्यावरून आता भारत आणि युक्रेनमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. या कथित हल्ल्याबाबत भारताने चिंता व्यक्त करताच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला असून, भारताच्या भूमिकेला ‘दुटप्पी’ म्हटले आहे. यामुळे भारत आणि युक्रेनमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
मंगळवारी रशियाकडून दावा करण्यात आला की, पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या वृत्तानंतर भारत, युएई आणि पाकिस्तान यांसारख्या देशांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करत शांततेचे आवाहन केले होते. मात्र, झेलेन्स्की यांच्या मते, हा हल्ला युक्रेनने केलेलाच नाही आणि रशिया केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी आणि शांतता चर्चा विस्कळीत करण्यासाठी असे खोटे दावे करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत झेलेन्स्की यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “भारत आणि काही इतर देशांनी पुतिन यांच्या निवासस्थानावरील कथित हल्ल्याचा ज्या वेगाने निषेध केला, ते पाहून आश्चर्य वाटते. मात्र, रशियाने जेव्हा युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागून आमच्या निष्पाप मुलांची आणि नागरिकांची हत्या केली, तेव्हा हे देश का गप्प होते? युक्रेनमधील विनाशावर भारत कधीही स्पष्टपणे का बोलला नाही?” भारताने तथ्यांची शहानिशा न करता केवळ रशियाच्या दाव्यावर विश्वास ठेवून प्रतिक्रिया देणे चुकीचे असल्याचे झेलेन्स्की यांनी नमूद केले.
Zelenskyy fires back at India, UAE & others who condemned Ukraine over a FAKE drone attack on Putin’s dacha that never happened:
“What causes confusion & discomfort? You rush to condemn something that didn’t occur… but where’s your outrage over russia bombing our children &… pic.twitter.com/3ZJFLKTrDw — EMPR.media (@EuromaidanPR) December 30, 2025
credit : social media
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची निराशा केवळ झेलेन्स्कीच नाही, तर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री त्सिबिहा यांनीही भारताच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्सिबिहा म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानच्या या प्रतिक्रियांमुळे कीव्ह (युक्रेनची राजधानी) निराश आणि चिंतित आहे. रशियाकडे अद्याप या हल्ल्याचे कोणतेही विश्वसनीय पुरावे नाहीत, कारण प्रत्यक्षात असा कोणताही हल्ला झालेलाच नाही. अशा निराधार आरोपांना पाठिंबा दिल्याने शांतता चर्चेच्या प्रक्रियेत अडथळे येतात.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
शांतता चर्चेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न? झेलेन्स्की यांचा असा दावा आहे की, रशिया मुद्दाम जगाची दिशाभूल करत आहे. “रशिया शांतता चर्चेत व्यत्यय आणण्यासाठी अशा अफवा पसरवत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाने तथ्यांच्या आधारे प्रतिसाद द्यायला हवा. केवळ एका नेत्याच्या निवासाची काळजी करण्यापेक्षा युद्धातील खऱ्या बळींकडे आणि मानवी हक्कांकडे लक्ष द्यावे,” असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे. सध्या युक्रेन रशियाच्या आत खोलवर हल्ले करत असताना, राजनैतिक स्तरावर भारताची ही भूमिका युक्रेनला अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे.
Ans: झेलेन्स्की यांनी भारतावर 'दुटप्पीपणा'चा आरोप केला असून, रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील मुले मारली गेली तेव्हा भारत का बोलला नाही, असा प्रश्न केला आहे.
Ans: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या कथित ड्रोन हल्ल्याच्या वृत्तावर भारताने चिंता व्यक्त केली होती.
Ans: परराष्ट्र मंत्री आंद्री त्सिबिहा यांनी म्हटले की, हल्ल्याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि भारताची प्रतिक्रिया निराशाजनक आहे.