Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrinathji Temple : राजस्थानातील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन; जाणून घ्या यामागील रंजक लोककथा

Nathdwara Shrinathji Temple : राजस्थानातील नाथद्वारा येथे, भगवान श्रीकृष्णाची त्यांच्या बालरूपात पूजा केली जाते आणि या विशेष मंदिराला श्रीनाथजी मंदिर म्हणतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 22, 2025 | 08:53 AM
Ancient history of Shrinathji Temple in Nathdwara Rajasthan Know the folklore

Ancient history of Shrinathji Temple in Nathdwara Rajasthan Know the folklore

Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीनाथजी मंदिरात भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा होते आणि मंदिराचा इतिहास १७व्या शतकापर्यंत पोहोचतो.
  • औरंगजेबाच्या काळात मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी वृंदावनातून नाथद्वारापर्यंत मूर्ती आणली गेली आणि रथ थांबल्यामुळे मंदिराची स्थापना येथे झाली.
  • छप्पन भोग परंपरा, भव्य उत्सव आणि भक्तांसाठी उपलब्ध सुविधा यामुळे हे मंदिर राजस्थानातील प्रमुख तीर्थस्थान मानले जाते.

Nathdwara Shrinathji Temple : राजस्थान (Rajasthan) म्हणजे किल्ले, राजघराणे आणि इतिहासाची परंपरा पण या भूमीत एक असे स्थान आहे जिथे केवळ दगडी रचना नसून श्रद्धेचा जिवंत श्वास आहे नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिर(Shrinathji Temple). राजसमंद जिल्ह्यात वसलेले हे मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला समर्पित आहे, जिथे ते प्रेमाने आणि आदराने ‘श्रीनाथजी’ म्हणून पूजले जातात. दरवर्षी लाखो श्रद्धाळू येथे दर्शनासाठी येतात आणि भक्तीभावाने नतमस्तक होतात.

 श्रीनाथजी मंदिराचा ऐतिहासिक प्रवास

या मंदिराचा इतिहास केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रद्धेनुसार, श्रीनाथजींची मूर्ती मूळतः वृंदावनातील गोवर्धन पर्वतावर प्रकट झाली होती. नंतर औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदू मंदिरांवर होणाऱ्या अत्याचारांपासून बचाव करण्यासाठी मूर्ती गुप्तपणे वृंदावनातून राजस्थानात आणली गेली. प्रवासादरम्यान एक अद्भुत घटना घडली नाथद्वाराजवळील सिंगार गावात श्रीनाथजींच्या रथाचे चाक अचानक थांबले आणि हलवूनही पुढे गेले नाही. हे दैवी संकेत मानून येथेच मंदिर बांधले गेले. आजही स्थानिक लोक आणि पुरोहित या घटनेला दिव्य आज्ञा म्हणतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश

 छप्पन भोग परंपरा आणि उत्सव

नाथद्वारातील सर्वात प्रसिद्ध परंपरा म्हणजे छप्पन भोग. पुराणकथेनुसार, कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सात दिवस इंद्राच्या कोपापासून गावकऱ्यांचे संरक्षण केले. सात दिवस उपाशी राहिलेल्या कृष्णासाठी यशोदामाईने ५६ पदार्थ बनवले. हाच वारसा आजही मंदिरात प्रेम आणि भक्तीने साजरा केला जातो. जनमाष्टमी, नंद महोत्सव आणि अन्नकूट येथे अत्यंत भव्य पद्धतीने साजरे केले जातात.

भक्तांसाठी व्यवस्था आणि सुविधा

नाथद्वारात अनेक धर्मशाळा, लॉज आणि आधुनिक हॉटेल्स आहेत. बजेटनुसार ₹४० ते ₹४०० पर्यंत धर्मशाळेत तर प्रीमियम हॉटेल्सही उपलब्ध आहेत. मंदिर व्यवस्थापनाकडून ऑनलाईन बुकिंगची सुविधाही दिली जाते. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च असा मानला जातो, कारण या काळात हवामान आनंददायी आणि पर्यटनास अनुकूल असते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Tunnel : शब्दांत न सांगता येणारी युद्धरचना! इस्रायलला गाझामध्ये सापडला रहस्यमय बोगदा, VIDEO VIRAL

 श्रीनाथजी मंदिर कसे गाठाल?

  • रेल्वे मार्ग: मारवाड जंक्शन हे सर्वात जवळचे केंद्र असून ते अहमदाबाद–दिल्ली मार्गावर आहे.
  • येथून मावलीसाठी ट्रेन उपलब्ध असून नाथद्वारा सुमारे १५ किमी अंतरावर आहे.
  • बस सुविधा: कांक्रोली स्टेशन आणि उदयपूरहून नियमित बस आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.

नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास, आध्यात्म आणि परंपरांचा जिवंत वारसा आहे. श्रीकृष्णाच्या बालरूपातील निरागसता आणि श्रद्धेची ताकद येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रीनाथजी मंदिरात काय विशेष आहे?

    Ans: येथे कृष्णाचे बालरूप विराजमान आहे आणि छप्पन भोग परंपरा प्रसिद्ध आहे.

  • Que: प्रवासाचा सर्वोत्तम काळ कोणता?

    Ans: ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम मानला जातो.

  • Que: मंदिर कुठे आहे?

    Ans: राजस्थानातील नाथद्वारा, राजसमंद जिल्ह्यात.

Web Title: Ancient history of shrinathji temple in nathdwara rajasthan know the folklore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • Lord Vishnu
  • navarashtra special story
  • rajasthan
  • Shri Krishna
  • temple

संबंधित बातम्या

World Television Day 2025: दूरदर्शन दिन का साजरा करतात? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि भारतातील टीव्हीचा प्रवास
1

World Television Day 2025: दूरदर्शन दिन का साजरा करतात? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि भारतातील टीव्हीचा प्रवास

Children’s Day 2025: 14 आणि 20 नोव्हेंबर बालदिनमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या दोन्ही दिवसांचा इतिहास आणि अर्थ
2

Children’s Day 2025: 14 आणि 20 नोव्हेंबर बालदिनमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या दोन्ही दिवसांचा इतिहास आणि अर्थ

International Men’s Day 2025: पुरूषांच्या अव्यक्त मानसिकतेचा भावनिक विस्फोट..
3

International Men’s Day 2025: पुरूषांच्या अव्यक्त मानसिकतेचा भावनिक विस्फोट..

International Mens Day : प्लेगनंतर उभी राहिली हाफकिन इन्स्टिट्यूट; देशहित जपणारा पोलादी पुरुष जमशेटजी टाटा
4

International Mens Day : प्लेगनंतर उभी राहिली हाफकिन इन्स्टिट्यूट; देशहित जपणारा पोलादी पुरुष जमशेटजी टाटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.