
Bangarwadi writer Venkatesh Madgulkar birthday 06 July History Marathi dinvishesh
मराठी साहित्याला अनेक लेखकांनी आपल्या लेखनाने समृद्ध केले. सरस्वतीचा आशिर्वाद लाभलेले आणि भाषेची देणगी लाभलेले असेच एक लेखक म्हणजे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर. मूळचे माडगूळमधील असणारे व्यंकटेश माडगूळकर यांचा आज जन्मदिन. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन लिहून अनेक अफाट साहित्य निर्माण केले. त्यांची बनगरवाडी, जंगलातील दिवस, वावटळ अशी अनेक पुस्तके लिहिली. लेखनासह व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या लेखनाने मराठी भाषेमध्ये मोठे योगदान दिले.
राजकीय बातन्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा