Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ; विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप

International Day of Women and Girls in Science 2026 : आज अनेक महिला-मुली संशोधन, तंत्रज्ञान, अंतराळ यांसारख्या अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. ज्यामुळे एक समतावादी आणि प्रगतीशील जगाची निर्मिती होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 08:34 AM
International Day of Women and Girls in Science

International Day of Women and Girls in Science

Follow Us
Close
Follow Us:

सुनयना सोनवणे : कुतूहल, जिद्द आणि नवकल्पनांची ओढ यांच्या जोरावर महिलांनी विज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकेकाळी पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात आज महिला संशोधक, अभियंते आणि शास्त्रज्ञ महत्त्वपूर्ण शोध लावत मानवजातीच्या प्रगतीला नवे आयाम देत आहेत. या योगदानाचा सन्मान आणि अधिकाधिक मुलींना विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी दरवर्षी ११ फेब्रुवारीला ‘विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्र महासभेने २०१५ मध्ये या दिवसाची घोषणा करत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात लिंगसमतेचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञानातील विविधता वाढल्यास संशोधन अधिक प्रभावी आणि व्यापक होते, असा जागतिक स्तरावरील अनुभव आहे. त्यामुळे महिलांचा सहभाग वाढवणे हे केवळ समानतेचे प्रतीक नसून विकासासाठी आवश्यक पाऊल मानले जाते.

जागतिक स्तरावर मेरी क्युरीपासून ते आजच्या आधुनिक संशोधकांपर्यंत अनेक महिलांनी विज्ञानाचा इतिहास घडवला आहे. भारतातही महिला शास्त्रज्ञांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांमध्ये महिलांची भूमिका ठळकपणे दिसून येते. चांद्रयान आणि मंगळयान प्रकल्पांच्या यशामागे महिला वैज्ञानिकांचे योगदान मोठे आहे. तसेच वैद्यकीय संशोधन, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरण विज्ञान या क्षेत्रांतही भारतीय महिला आघाडीवर आहेत.

“विज्ञान म्हणजे केवळ सूत्रे आणि प्रयोग नाहीत; ते भविष्यातील जग घडवण्याची ताकद आहे, आणि त्या घडवण्यात महिलांचा सहभाग अधिकाधिक निर्णायक ठरत आहे,” असे मत अनेक तज्ञ व्यक्त करतात. असे असले तरी विज्ञान क्षेत्रातील महिलांचे प्रमाण अजूनही अपेक्षेइतके नाही. उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्या मुलींची संख्या वाढत असली, तरी संशोधन आणि नेतृत्वाच्या पदांवर त्यांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे. सामाजिक रूढी, करिअर आणि कुटुंब यांचा समतोल राखण्याचे आव्हान, तसेच संधींचा अभाव या कारणांमुळे अनेक प्रतिभावान मुली मागे राहतात. त्यामुळे लहान वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि प्रयोगशील शिक्षणाला प्रोत्साहन देणे गरजेचे ठरते.

“जिज्ञासा ही प्रत्येक वैज्ञानिकाची पहिली पायरी असते. मुलींना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयोग करण्याची संधी दिली, तर त्या विज्ञानाचा चेहरामोहराच बदलू शकतात,” असे शिक्षणतज्ञांचे मत आहे. भारत सरकार तसेच विविध शैक्षणिक संस्था एसटीइएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी शिष्यवृत्ती, मार्गदर्शन कार्यक्रम आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. एकूणच, प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत महिलांची झेप ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नसून समाजाच्या प्रगतीची प्रेरणादायी कहाणी आहे. विज्ञानाच्या या प्रवासात महिलांचा वाढता सहभाग नव्या शक्यतांचे दार उघडत असून, येणारे दशक विज्ञानविश्वात महिलांच्या नेतृत्वाचे ठरणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संशोधक प्रा.पूजा अशोक सोनसाळे म्हणतात “प्रयोगशाळेत होणारा प्रत्येक छोटा शोध हा फक्त विज्ञानाच्या प्रगतीचा भाग नसतो, तर तो महिलांच्या जिद्द, मेहनत आणि क्षमतेचा ठोस पुरावा असतो. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून आम्ही ज्या ‘अदृश्य’ जगाचा अभ्यास करतो, ते विज्ञानातील महिलांच्या योगदानासारखेच आहे – पहिल्या नजरेत कदाचित दिसत नाही, पण संपूर्ण पर्यावरणाच्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आज ज्या मुली प्रयोगशाळेत नवे प्रयोग करत आहेत, त्या उद्या मानवजातीचे भविष्य घडवणार आहेत. त्यामुळे त्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

संशोधक, विद्यार्थिनी अदिती देशपांडे म्हणतात “संशोधन म्हणजे सतत शिकण्याची आणि नव्या गोष्टी शोधण्याची एक रोमांचक प्रक्रिया आहे. या प्रवासात आव्हाने असली तरी प्रत्येक यश आत्मविश्वास वाढवते. मुलींनी विज्ञानाकडे केवळ विषय म्हणून नाही, तर बदल घडवण्याची संधी म्हणून पाहावे. जिज्ञासा आणि मेहनत यांच्या जोरावर आपण समाजासाठी उपयुक्त असे नवे शोध लावू शकतो.”

Web Title: Women and girls in science day 2026 from laboratories to space womens powerful rise in world of science

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • Dinvishesh news
  • science news

संबंधित बातम्या

Dr. Anandibai Joshi : भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी जयंती; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास
1

Dr. Anandibai Joshi : भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी जयंती; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास

स्वातंत्र्यसाठी प्राणांची आहुती देणारे मुरारजी देशपांडे पुण्यतिथी; जाणून घ्या 30 मार्चचा इतिहास
2

स्वातंत्र्यसाठी प्राणांची आहुती देणारे मुरारजी देशपांडे पुण्यतिथी; जाणून घ्या 30 मार्चचा इतिहास

लेखक, समीक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ नागनाथ कोतापल्ले यांचा जन्मदिन; जाणून घ्या 29 मार्चचा इतिहास
3

लेखक, समीक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ नागनाथ कोतापल्ले यांचा जन्मदिन; जाणून घ्या 29 मार्चचा इतिहास

बॉलीवूडचा ‘GOAT परफॉर्मर’ अक्षय खन्नाचा ५१ वा वाढदिवस; जाणून घ्या २८ मार्चचा इतिहास
4

बॉलीवूडचा ‘GOAT परफॉर्मर’ अक्षय खन्नाचा ५१ वा वाढदिवस; जाणून घ्या २८ मार्चचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.