
celebration of life day 22nd january importance history how to celebrate 2026
Celebration of Life Day 22 January Marathi : आपल्याला मिळालेले हे मानवी जीवन ही निसर्गाची सर्वात मोठी देणगी आहे. पण आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात आपण ‘जगणे’ सोडून केवळ ‘धावणे’ पसंत करतोय. ध्येय गाठण्याच्या नादात आपण आयुष्यातील सुंदर क्षण गमावून बसतो. याच आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी २२ जानेवारी रोजी ‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ डे’ (Celebration of Life Day) साजरा केला जातो.
या दिवसाची पार्श्वभूमी रंजक आहे. १९८४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ‘नॅशनल सँक्टिटी ऑफ ह्युमन लाईफ डे’ म्हणून याची घोषणा केली होती. सुरुवातीला या दिवसाचा उद्देश मुलांच्या जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता. मात्र, काळाच्या ओघात याचे स्वरूप बदलले. आता हा दिवस केवळ मुलांसाठीच नाही, तर जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी ‘जगण्याचा आनंद’ साजरा करण्याचा दिवस बनला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा
आपण अनेकदा यशालाच जीवन समजतो. मात्र, ‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ डे’ आपल्याला शिकवतो की जीवन म्हणजे केवळ टार्गेट्स पूर्ण करणे किंवा बँक बॅलन्स वाढवणे नाही. जीवन म्हणजे सकाळी घेतलेला चहाचा पहिला घोट, जुन्या मित्राशी मारलेली गप्पांची मैफल, आईच्या हाताचे जेवण आणि स्वतःच्या छोट्याशा प्रगतीवर स्वतःला दिलेली शाबासकी आहे. हा दिवस आपल्याला कृतज्ञता (Gratitude) व्यक्त करायला शिकवतो.
Life is the greatest experiment – full of questions, discoveries, resilience, and hope.#CelebrationofLifeDay on 22nd January honors the children and grandchildren who fill our lives with #wonder, #laughter, and #hope. It reminds us that every child – and every #life – is a… pic.twitter.com/aupo4UnYe3 — Narottam Sahoo (@narottamsahoo) January 22, 2026
credit – social media and Twitter
आजच्या काळात डिप्रेशन (Depression) आणि अँक्झायटी (Anxiety) या समस्या वाढत आहेत. मानसशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये ‘हॅपी हार्मोन्स’ (Endorphins) तयार होतात. २२ जानेवारी हा दिवस स्वतःला वेळ देण्याचा आहे. स्वतःच्या चुकांना माफ करणे आणि आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी देवाला किंवा नशिबाला ‘थँक्यू’ म्हणणे, यामुळे मनाला अफाट शांती मिळते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chabahar Port : ‘कोणीही आमची मैत्री तोडू शकत नाही’, चाबहार बंदरावरून इराणने अमेरिकेला दिला रोखठोक संदेश; India-Iran संबंध अतूट
१. कृतज्ञता व्यक्त करा: सकाळी उठल्यावर अशा ५ गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. २. मुलांसोबत वेळ घालवा: मुलांच्या निष्पापपणात जीवनाचा खरा अर्थ दडलेला असतो. त्यांच्यासोबत खेळा, गप्पा मारा. ३. सोशल मीडियापासून ब्रेक: दिवसाचा काही वेळ फोन बाजूला ठेवा आणि निसर्गाशी किंवा स्वतःशी संवाद साधा. ४. प्रियजनांना फोन करा: ज्यांच्याशी तुमचे नाते घट्ट आहे, अशा व्यक्तींना कॉल करून तुमचे त्यांच्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगा. ५. स्वतःला ट्रीट द्या: एखादा छंद जोपासा, आवडीचे गाणे ऐका किंवा छान जेवण करा.
Ans: हा दिवस दरवर्षी २२ जानेवारी रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
Ans: जीवनातील प्रत्येक क्षणाची कदर करणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि विशेषतः मुलांच्या जीवनाचा गौरव करणे हा याचा उद्देश आहे.
Ans: या दिवसाची संकल्पना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८४ मध्ये मांडली होती.