'टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!' कॅनडाच्या पंतप्रधानांचा दावोसमध्ये 'या' महासत्तांना इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Mark Carney WEF Davos 2026 speech : स्वित्झर्लंडमधील दावोस( येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum) वार्षिक परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी एका अत्यंत प्रखर आणि वास्तववादी भाषणाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. “आम्ही एखाद्या संक्रमणातून (Transition) नाही, तर एका मोठ्या विघटनातून (Rupture) जात आहोत,” असे सांगत त्यांनी जुन्या जागतिक व्यवस्थेच्या अंताची अधिकृत घोषणाच जणू केली आहे.
कार्नी यांनी त्यांच्या भाषणात एक अत्यंत वादग्रस्त पण सत्य विधान केले. ते म्हणाले, “मध्यम शक्ती असलेल्या देशांसाठी आता एकच नियम उरला आहे – जर तुम्ही निर्णय घेण्याच्या टेबलावर (At the table) नसाल, तर तुम्ही मेनूवर (On the menu) असाल.” याचा सोपा अर्थ असा की, जर कॅनडा, भारत किंवा इतर मध्यम अर्थव्यवस्थांनी एकत्र येऊन स्वतःची ताकद सिद्ध केली नाही, तर अमेरिका आणि चीनसारख्या महासत्ता आपल्या हितासाठी या देशांचा वापर करतील. “सशक्त देश जे करू शकतात ते करतात आणि कमकुवत देशांना ते सहन करावे लागते,” असेही त्यांनी थुसीडाइड्सच्या प्रसिद्ध उक्तीचा दाखला देत स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Mr President, F*** Off…’ युरोपियन संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! डॅनिश खासदाराने Trumpची काढली खरडपट्टी; पहा VIDEO
कार्नी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दशकांपासून आपण ज्या जागतिक एकात्मतेचा अभिमान बाळगत होतो, तीच आता आपली कमजोरी बनली आहे. “प्रमुख शक्ती आता टॅरिफना (आयात शुल्क) शस्त्र म्हणून वापरत आहेत. पुरवठा साखळी आणि वित्तीय व्यवस्थेचा वापर दबावासाठी केला जात आहे,” असे कार्नी म्हणाले. अमेरिकेने कॅनडाच्या वस्तूंवर ३५% कर लावून कॅनडाला एका प्रकारे आर्थिक कोंडीत पकडले आहे, ज्याचा संदर्भ कार्नी यांच्या बोलण्यात स्पष्टपणे जाणवत होता.
🚨BREAKING! TRUMP’S SELF CREATED MESS EXPLODING! “This bargain no longer works.” Canadian Prime Minister Mark Carney’s major address at the World Economic Forum in Davos, Switzerland, is causing SHOCKWAVES worldwide. “Friends, it is time for companies and countries to take… pic.twitter.com/I7q1WC6Nrj — CALL TO ACTIVISM (@CalltoActivism) January 21, 2026
credit – social media and Twitter
अनेक देश आजही जुनी ‘नियमांवर आधारित जागतिक व्यवस्था’ (Rules-based order) परत येईल या आशेवर आहेत. कार्नी यांनी ही आशा फोल असल्याचे सांगितले. “जुनी व्यवस्था परत येणार नाही, ती मोडीत निघाली आहे. केवळ जुन्या दिवसांच्या आठवणीत रमणे (Nostalgia) ही काही रणनीती असू शकत नाही. आपल्याला आजच्या क्रूर वास्तवाचा स्वीकार करून नवीन युती आणि भागीदारी करावी लागेल,” असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chabahar Port : ‘कोणीही आमची मैत्री तोडू शकत नाही’, चाबहार बंदरावरून इराणने अमेरिकेला दिला रोखठोक संदेश; India-Iran संबंध अतूट
जगातील वाढत्या तणावामुळे आता अनेक देश स्वतःला सुरक्षित करण्यासाठी ‘किल्ल्यांमध्ये’ (Fortresses) बंदिस्त करत आहेत. म्हणजे अन्न, ऊर्जा आणि संरक्षणासाठी स्वतःवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्नी यांनी इशारा दिला की, जरी हे संरक्षणासाठी गरजेचे वाटत असले, तरी यामुळे जग अधिक गरीब, अस्थिर आणि कमकुवत होईल. कॅनडा आता अमेरिकेवरील आपले ७५% अवलंबित्व कमी करून नवीन व्यापार मार्ग शोधत असल्याचेही त्यांनी सूचित केले.
Ans: याचा अर्थ असा की, जर लहान किंवा मध्यम देश जागतिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय राहिले नाहीत, तर मोठे देश स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे नुकसान करतील.
Ans: कार्नी यांच्या मते, गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेले 'आरामदायी जागतिकीकरण' आता संपले असून आर्थिक संबंधांचा वापर आता युद्धाच्या शस्त्रासारखा केला जात आहे.
Ans: अमेरिकेने कॅनेडियन उत्पादनांवर ३५% आयात शुल्क (Tariff) लादल्यामुळे आणि कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला लक्ष्य केल्यामुळे कॅनडाने आक्रमक भूमिका घेतली आहे.






