Shivaji Maharaj Punyatithi
महाराष्ट्रामध्ये जनतेचे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आजही जगभरामध्ये गायली जाते. जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरुपाचे आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी आहे. 03 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. त्यांच्या जाण्याने फक्त संपूर्ण राज्य पोरके झाले. रयतेच्या डोक्यावरील मायेचा हात हरपला होता. छत्रपती शिवरायांनी आजन्म स्वराज्यनिर्मितीचा ध्यास हाती घेत आपले आयुष्य खर्ची केले. त्यांच्या शौर्याने आणि गनीमा काव्याने दिल्लीच्या तख्यताला देखील हादरवून टाकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त जगभरातून आदरांजली वाहिली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा