Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास

बालपणात प्रचंड हालअपेष्टा सहन करत मोठे झालेल्या चार्ली चॅपलिन यांनी आपल्या कलेतून जीवनातील कटू सत्य मांडले. त्यांचे मूकपट आजही प्रेक्षकांना भावतात.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 11:00 AM
comedian Charlie Chaplin achieved live performance from silent films April 16th History

comedian Charlie Chaplin achieved live performance from silent films April 16th History

Follow Us
Follow Us:

जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांचे नाटक शब्द नसले तरी मनाला भावते. मूकपटांच्या काळात त्यांनी केवळ हास्य निर्माण केले नाही, तर समाजातील विषमता, गरिबी आणि मानवी वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. ‘ट्रॅम्प’ या त्यांच्या व्यक्तिरेखेतून त्यांनी सामान्य माणसाचे दुःख आणि संघर्ष जिवंत केले.

बालपणात प्रचंड हालअपेष्टा सहन करत मोठे झालेल्या चॅपलिन यांनी आपल्या कलेतून जीवनातील कटू सत्य मांडले. City Lights, Modern Times आणि The Kid सारख्या चित्रपटांतून त्यांनी हास्य आणि अश्रू यांचे अनोखे मिश्रण साकारले. त्यांच्या अभिनयात शब्द नव्हते, पण भावना बोलक्या होत्या. प्रत्येक हालचालीतून त्यांनी माणुसकीचा संदेश दिला. त्यामुळेच चॅपलिन हे केवळ कलाकार नव्हते, तर मानवतेचे दूत ठरले. आजही त्यांचे चित्रपट पाहताना डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू येते हेच त्यांच्या कलेचे खरे यश आहे. (Dinvishesh)

 

16 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1853 : बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली प्रवासी रेल्वे सेवा भारतात सुरू झाली.
  • 1910 : 21 व्या शतकात खेळासाठी वापरला जाणारा सर्वात जुना विद्यमान इनडोअर आइस हॉकी रिंगण, बोस्टन अरेना, प्रथमच उघडला.
  • 1912 : हॅरिएट क्विम्बी इंग्रजी चॅनेल ओलांडून विमान उडवणारी पहिली महिला ठरली.
  • 1922 : मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
  • 1948 : राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
  • 1972 : अपोलो 16 केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित झाले.
  • 1995 : निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1999 : चालकरहित ‘निशांत’ विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चांदीपूर येथे चाचणी करण्यात आली.
  • 2003 : वयाच्या 40 व्या वर्षी, बास्केटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकेल जॉर्डनने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये शेवटचा खेळ खेळला.
  • 2013 : इराणच्या सिस्तान आणि बलुचेस्तान प्रांतात 7.8 तीव्रतेच्या भूकंपात किमान 35 लोक ठार आणि 117 जण जखमी झाले.
  • 2016 : इक्वाडोरच्या 40 वर्षांतील सर्वात भीषण भूकंपात 676 ठार आणि 6,274 जखमी झाले.
हे देखील वाचा : केवळ संवाद नाही तर संगीताचा अमूल्य ठेवा! तुमचा आवाज जपण्यासाठी बदला ‘या’ सवयी

16 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1867 : ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1912)
  • 1889 : विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म. (मृत्यू: 25 डिसेंबर 1977)
  • 1896 : मद्रास विद्यापीठातील पुरातत्व शास्त्राचे माजी प्राध्यापक विष्णमपेट आर. रामचंद्र दीक्षित यांचा जन्मदिन.
  • 1924 : भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.
  • 1934 : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.
  • 1942 : विल्यम्स एफ-1 रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.
  • 1961 : भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.
  • 1963 : पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म.
  • 1972 : स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ यांचा जन्म.
  • 1978 : मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म.
  • 1991 : चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे यांचा जन्म.
हे देखील वाचा : अमेरिका-इराणमधील चर्चा ठरल्या निष्फळ, तणाव वाढला; होर्मुझ नाकेबंदीचा सर्वांना बसणार फटका

16 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1753 : फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1677)
  • 1850 : मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन. (जन्म: 1 डिसेंबर 1761)
  • 1966 : शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन. (जन्म: 3 डिसेंबर 1882)
  • 1995 : अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर यांचे निधन.
  • 2000 : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.

Web Title: Comedian charlie chaplin achieved live performance from silent films april 16th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
1

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…
2

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.