Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chemical Warfare Remembrance Day : विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हावा याची आठवण करून देणारा ‘हा’ दिवस

Day of Remembrance for Victims of Chemical Warfare : रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृतिदिन हा 2005 पासून दरवर्षी 30 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 30, 2025 | 10:22 AM
Day of Remembrance for Victims of Chemical Warfare

Day of Remembrance for Victims of Chemical Warfare

Follow Us
Close
Follow Us:
  • रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृतिदिन ३० नोव्हेंबर रोजी जगभर साजरा केला जातो आणि तो २००५ पासून अधिकृतपणे मान्य करण्यात आला आहे.
  • या दिवसामागील उद्देश म्हणजे रासायनिक शस्त्रांच्या विनाशकारी परिणामांची आठवण करून देणे आणि भविष्यात अशा शस्त्रांच्या वापराला आळा घालणे.
  • रासायनिक शस्त्र प्रतिबंधक संघटना (OPCW) आणि संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक नि:शस्त्रीकरणासाठी या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करतात.

Day of Remembrance for Victims of Chemical Warfare : ३० नोव्हेंबर हा दिवस जगाच्या इतिहासातील एका अत्यंत वेदनादायी आणि भीषण वास्तवाची आठवण करून देतो. ‘रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृतिदिन’ (Nuclear Politics) म्हणून ओळखला जाणारा हा दिवस २००५ पासून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसामागील मुख्य उद्देश म्हणजे जगभरात झालेल्या रासायनिक हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लाखो निष्पाप लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि भविष्यात अशा अमानवी शस्त्रांच्या वापराला कायमस्वरूपी आळा घालण्याची जाणीव निर्माण करणे.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रासायनिक शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. क्लोरीन, मस्टर्ड गॅस, सरीन, फॉसजीन यांसारख्या विषारी वायूंमुळे सैनिकच नाही, तर सामान्य नागरिक, स्त्रिया आणि बालकेही मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. दहशत, वेदना आणि मृत्यू यांचे भयावह दर्शन जगाने पाहिले. या प्राणघातक शस्त्रांचे परिणाम इतके गंभीर होते की काही लोक कायमचे आंधळे झाले, काहींची त्वचा जळून गेली, तर अनेक जण श्वास घेण्यास असमर्थ झाले. या भीषणतेतून मानवजात सावध झाली आणि रासायनिक शस्त्रांचे पूर्ण उच्चाटन करण्याची गरज ओळखण्यात आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जागतिक चर्चेचा मध्यवर्ती चेहरा असलेले रशियन राष्ट्राध्यक्ष ‘Vladimir Putin’ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट; आता कसे करणार भारत दौरा?

याच पार्श्वभूमीवर १९९७ मध्ये ‘रासायनिक शस्त्रे करार’ म्हणजेच केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन अंमलात आले. या करारामुळे रासायनिक शस्त्रांचा विकास, उत्पादन, साठा आणि वापर यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात आली. या कराराचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नेदरलँड्समधील द हेग शहरात रासायनिक शस्त्रे प्रतिबंधक संघटना अर्थात OPCW ची स्थापना करण्यात आली. ही संघटना जागतिक पातळीवर रासायनिक शस्त्रांचे नष्टीकरण करण्यासाठी काम करते आणि देशांना त्यांचा साठा नष्ट करण्यास मदत करते.

संयुक्त राष्ट्रांच्या दहाव्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सदस्य राष्ट्रांनी ३० नोव्हेंबर हा ‘रासायनिक युद्धातील बळींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस’ म्हणून अधिकृत मान्यता दिली. हा प्रस्ताव OPCW चे तत्कालीन महासंचालक रोगेलियो फर्टर यांनी मांडला होता. तसेच २९ एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय रासायनिक शस्त्र प्रतिबंध दिन’ म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी रासायनिक शस्त्रे करार अंमलात आला होता.

#OnThisDay: On November 30, the Day of Remembrance for Victims of Chemical Warfare is observed to pay tribute to those affected by chemical weapons. #MIG @OPCW pic.twitter.com/ETNKhAxmAX — MEDIA INDIA GROUP (@mediaindiagroup) November 30, 2025

credit : social media and Twitter 

जरी अनेक देशांनी आपले रासायनिक आणि अण्वस्त्रांचे साठे नष्ट केले असले, तरीही काही देशांकडे अजूनही ही घातक शस्त्रे उपलब्ध आहेत, ही गोष्ट जागतिक सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि मानवाधिकार संघटना सातत्याने नि:शस्त्रीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे “भविष्यातील पिढ्यांना युद्धाच्या संकटापासून वाचवणे” आणि एक शांततामय, सुरक्षित जग निर्माण करणे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elite Forces : भारताचे NSG ‘ब्लॅक कॅट्स’ की US चे ‘National Guard’? क्षमता, प्रशिक्षण आणि ताकदीमध्ये कोण सर्वात शक्तिशाली

‘रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृतिदिन’ हा केवळ भूतकाळातील वेदनांची आठवण नाही, तर मानवतेला दिलेला एक इशारा आहे की विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हायला हवा. या दिवशी जगभरात शांती सभांचे आयोजन, श्रद्धांजली कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम राबवले जातात. याद्वारे मानवतेचा संदेश दिला जातो आणि युद्धमुक्त भविष्यासाठी नव्याने संकल्प केला जातो. जर जगाला खऱ्या अर्थाने सुरक्षित बनवायचे असेल, तर रासायनिक शस्त्रांचा संपूर्ण नायनाट आणि जागतिक सहकार्य हाच एकमेव मार्ग आहे हेच या दिवसाचे मूळ आणि खरे संदेश आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृतिदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी ३० नोव्हेंबर रोजी हा दिवस पाळला जातो आणि २००५ पासून तो अधिकृतरित्या मान्य आहे.

  • Que: हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश?

    Ans: रासायनिक शस्त्रांच्या वापरामुळे मृत्युमुखी पडलेल्या निर्दोष लोकांना श्रद्धांजली देणे आणि भविष्यात अशा शस्त्रांचा वापर होऊ नये यासाठी जागरूकता निर्माण करणे.

  • Que: रासायनिक शस्त्रांवर नियंत्रण ठेवणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था कुठे आहे?

    Ans: ‘रासायनिक शस्त्रे प्रतिबंधक संघटना’ म्हणजेच OPCW असून तिचे मुख्यालय नेदरलँड्सच्या द हेग येथे आहे.

Web Title: Day of remembrance for victims of chemical warfare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

AIDS Vaccine Day: एका रोग आणि विज्ञानाचे महायुद्ध! का साजरा केला जातो ‘जागतिक एड्स लस दिन’? वाचा यामागचा रंजक इतिहास
1

AIDS Vaccine Day: एका रोग आणि विज्ञानाचे महायुद्ध! का साजरा केला जातो ‘जागतिक एड्स लस दिन’? वाचा यामागचा रंजक इतिहास

International Museum Day: सण संस्कृतीचा, उत्सव इतिहासाचा! आजच्या ‘या’ खास दिनी  चला करूया आपल्या सुवर्ण वारशाला सलाम
2

International Museum Day: सण संस्कृतीचा, उत्सव इतिहासाचा! आजच्या ‘या’ खास दिनी चला करूया आपल्या सुवर्ण वारशाला सलाम

World Hypertension Day: तुमच्या शरीरात लपून बसलाय ‘हा’ सायलेंट किलर; वेळीच ओळखा, नाहीतर थेट हृदयावर होईल हल्ला
3

World Hypertension Day: तुमच्या शरीरात लपून बसलाय ‘हा’ सायलेंट किलर; वेळीच ओळखा, नाहीतर थेट हृदयावर होईल हल्ला

World Telecommunication Day : इंटरनेटशिवाय जगणं अशक्य! जाणून घ्या १७ मे रोजी का साजरा केला जातो ‘जागतिक दूरसंचार दिन’?
4

World Telecommunication Day : इंटरनेटशिवाय जगणं अशक्य! जाणून घ्या १७ मे रोजी का साजरा केला जातो ‘जागतिक दूरसंचार दिन’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.