Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Special: नातवंडे झाली शिक्षक, आजी-आजोबा विद्यार्थी! घराघरांत रंगतोय स्मार्टफोन शिकण्याचा नवा धडा

Navarashtra Special: पुण्यातील इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर-इंडियाने २०१७ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मोबाईल लिटरसी ट्रेनिंग' उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून महाराष्ट्रातील विविध भागांतील सुमारे एक हजार ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2026 | 02:35 AM
ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट आणि सोशल मीडियाचा वापर शिकण्यावर भर

ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट आणि सोशल मीडियाचा वापर शिकण्यावर भर

Follow Us
Follow Us:
  • घरातील ज्येष्ठ नागरिक बनताहेत नव्या पिढीचे डिजिटल विद्यार्थी
  • ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट आणि सोशल मीडियाचा वापर शिकण्यावर भर
  • स्मार्टफोन प्रशिक्षणातून ज्येष्ठांची डिजिटल साक्षरतेकडे वाटचाल
Navarashtra Special: घरातील नातवंडांना मोबाईल वापरताना पाहणारे आजी-आजोबा आता स्वतःच स्मार्टफोनचे धडे गिरवू लागले आहेत. व्हॉट्सॲपवरून संदेश पाठविणे, व्हिडिओ कॉल करणे, फोटो काढणे, ऑनलाइन बँकिंग, यूपीआयद्वारे पैसे पाठविणे, रेल्वेचे तिकीट काढणे अशा अनेक गोष्टी ज्येष्ठ नागरिक शिकत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना ज्येष्ठ नागरिकांमध्येही डिजिटल साक्षरतेची आवड निर्माण होत असून, घरातील तरुण मंडळी त्यांचे शिक्षक बनत आहेत.

पूर्वी मोबाईलवर आलेला संदेश वाचण्यासाठी किंवा एखादा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मुलांवर अथवा नातवंडांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, आता स्वतः मोबाईल हाताळता यावा, दैनंदिन कामे घरबसल्या करता यावीत आणि कोणावर अवलंबून राहावे लागू नये, या उद्देशाने ते स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.

China : चीनची राजधानी बीजिंग 2035 पर्यंत बनणार ‘अतिवृद्ध’ समाज, काय आहेत यामागील आर्थिक आणि सामाजिक धोके?

पुण्यातील इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर-इंडियाने २०१७ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मोबाईल लिटरसी ट्रेनिंग’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून महाराष्ट्रातील विविध भागांतील सुमारे एक हजार ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन अर्धदिवसीय सत्रांमध्ये मोबाईलची प्राथमिक माहिती, विविध ॲपचा वापर, ऑनलाइन पेमेंट आणि सायबर फसवणुकीपासून बचाव याविषयी मार्गदर्शन केले जाते.

प्रशिक्षणामध्ये व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉल, ई-मेल, सोशल मीडिया, गुगल मॅप, ऑनलाइन खरेदी, वीजबिल भरणे, कॅब बुकिंग आणि डिजिटल पेमेंट यांचा समावेश असतो. त्याचबरोबर ओटीपी, एटीएम पिन, बँक तपशील अनोळखी व्यक्तींना न सांगणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड न करणे अशा सुरक्षिततेच्या गोष्टीही शिकवल्या जातात.

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’

या प्रक्रियेत नातवंडे आणि तरुण पिढीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. आजी-आजोबांना एकाच वेळी सर्व गोष्टी शिकवण्याऐवजी प्रत्येक कृती पुन्हा पुन्हा करून दाखवणे, त्यांच्याकडून स्वतः सराव करून घेणे आणि चुका झाल्यास संयमाने समजावून सांगणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरतेमुळे ज्येष्ठांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच पिढ्यांमधील संवादालाही नवे माध्यम मिळत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्येष्ठ नागरिक स्मार्टफोनवर कोणत्या डिजिटल गोष्टी शिकत आहेत?

    Ans: ज्येष्ठ नागरिक व्हॉट्सॲपवर संदेश पाठवणे, व्हिडिओ कॉल करणे, फोटो काढणे, ऑनलाइन बँकिंग, यूपीआयद्वारे पैसे पाठवणे आणि रेल्वेचे तिकीट बुक करणे अशा डिजिटल गोष्टी शिकत आहेत.

  • Que: ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण कोण देत आहे?

    Ans: घरातील तरुण मंडळी आणि नातवंडे ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक डिजिटल साक्षर होत असून दैनंदिन कामांसाठी इतरांवरील अवलंबित्व कमी होत आहे.

Web Title: Senior citizens grand mother father learn digital smartphone upi literacy navarashtra special tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • digital
  • mobile
  • navarashtra special
  • Senior Citizens

संबंधित बातम्या

Africa Industrialization Day: नैसर्गिक संपत्तीने नटलेला आफ्रिका आता बनणार जागतिक औद्योगिक महासत्ता; वाचा 20 नोव्हेंबरचे महत्त्व
1

Africa Industrialization Day: नैसर्गिक संपत्तीने नटलेला आफ्रिका आता बनणार जागतिक औद्योगिक महासत्ता; वाचा 20 नोव्हेंबरचे महत्त्व

World Children’s Day: ‘माझा दिवस, माझे हक्क, माझे भविष्य’; जाणून घ्या काय आहे जागतिक बालदिनाचा इतिहास आणि उद्देश?
2

World Children’s Day: ‘माझा दिवस, माझे हक्क, माझे भविष्य’; जाणून घ्या काय आहे जागतिक बालदिनाचा इतिहास आणि उद्देश?

How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क
3

How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

International Men’s Day: ‘त्यांनाही मन असतं अन् वेदनाही होतात’; आज आहे कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या पुरुषांच्या सन्मानाचा दिवस
4

International Men’s Day: ‘त्यांनाही मन असतं अन् वेदनाही होतात’; आज आहे कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या पुरुषांच्या सन्मानाचा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.