Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाचनाला ‘DIGITAL’ पाठबळ: पुण्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन

Pune Public Libraries: सार्वजनिक ग्रंथालयांचे हे डिजिटल रूपांतर केवळ तांत्रिक प्रगती नसून, समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2025 | 07:47 AM
वाचनाला ‘DIGITAL’ पाठबळ: पुण्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/प्रगती करंबळेकर:  अवांतर वाचन हे आता केवळ छंद म्हणून न राहता, तर नव्या युगातील विचारप्रवृत्ती घडवणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन शेअर बाजार, करिअर, कथा, कादंबऱ्या, जीवनशैली अशा विविध विषयांवरील पुस्तकांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या वाचनसंस्कृतीला डिजिटल तंत्रज्ञानाचे मजबूत पाठबळ मिळू लागले सार्वजनिक ग्रंथालयांनी केलेल्या डिजिटलायझेशनमुळे वाचन अधिक सुलभ, सुसंगत आणि व्यापक झाले आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे हे डिजिटल रूपांतर केवळ तांत्रिक प्रगती नसून, समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. अवांतर वाचन आणि डिजिटल माध्यमांची सांगड लावून नव्या पिढीला सशक्त विचारांची दिशा देण्याचे काम या ग्रंथालयांमार्फत घडते आहे.

तरुणांच्या विचारप्रकियेवर सकारात्मक परिणाम

डिजिटायझेशनमुळे केवळ सुविधा वाढल्या नाहीत, तर शतकांपूर्वीच्या दुर्मीळ, ऐतिहासिक ग्रंथसंपदाही स्कॅन करून डिजिटल स्वरूपात जतन करण्यात आली आहे. हे साहित्य अभ्यासक, विद्यार्थी आणि वाचनप्रेमीसाठी अमूल्य ठरत आहे. पुणे वाचन मंदिराचे सहाय्यक ग्रंथपाल आदित्य साबणे यांनी सांगितले की, सध्या तरुणाई ‘गोष्ट पैशा पाण्याची’ या शेअर बाजार विषयावरील पुस्तकाला विशेष पसंती देते आहे. हे पुस्तक आर्थिक साक्षरतेसाठी उपयुक्त ठरते, तरुण वर्गाच्या विचारप्रक्रियेवर त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.

वाचनाला चालना

ग्रंथपाल साबणे पुढे सांगतात की. बाहेरील वाचकांकडून ९९% वेळा पुस्तके परत केली जात नाहीत. त्यामुळे केवळ पुण्यातील रहिवाशांनाच पुस्तके उधार देण्याचे धोरण ठेवण्यात आले आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचनकट्टा’, कथा स्पर्धा, चर्चासत्रेसारखे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे वाचन ही केवळ सवय न राहता, ती एक सशक्त सांस्कृतिक चळवळ विकसित होत आहे.

वाचन प्रक्रिया सोपी

पुण्यातील नाना वाचन मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर, टिळक स्मारक मंदिरातील ग्रंथालय, महात्मा फुले वाचनालय यांसारख्या संस्थांनी आपली सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. या ग्रंथालयांत डिजिटल किऑस्क, संगणक, इंटरनेट सेवा व स्वयंचलित नोंदणी यंत्रणा बसवण्यात आल्या असून, पुस्तक शोध, नोंदणी आणि परतावा या प्रक्रिया आता जलद आणि सोप्या झाल्या आहेत.

एका क्लिकवर लाखो पुस्तके

‘मीडिया कॉमन्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक पुस्तके एका क्लिकवर कवर उपलब्ध असून, सुमारे १ ते १.५ हजार सक्रिय सदस्य आणि पुण्यातील ११ शाखांच्या माध्यमातून ही सेवा वाढवण्यात आली आहे. केवळ ३० रुपयांच्या मासिक वर्गणीमध्ये ही सुविधा मिळत असून, कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय ही सेवा चालवली जाते.

Web Title: Digitalization by public libraries reading more accessible consistent and widespread navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 07:47 AM

Topics:  

  • book reading
  • Digital news
  • navarashtra special
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Today: बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स–निफ्टी लाल, मिडकॅप्स तेजीत
1

Stock Market Today: बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स–निफ्टी लाल, मिडकॅप्स तेजीत

Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी
2

Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
3

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य
4

Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.