Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keshavrao Bhosale Jayanti: आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती; जाणून घ्या ४ ऑक्टोबरचा इतिहास..

Keshavrao Bhosale Jayanti: आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. मराठी रंगभूमीवर सर्वप्रथम मखमलीचा पडदा आणणे आणि ठरलेल्या वेळेवर नाटकाची सुरुवात करण्याची अनुशासनप्रिय परंपरा त्यांनी सुरू केली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 04, 2026 | 09:32 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Keshavrao Bhosale Jayanti: आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. ते मराठी संगीत रंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान गायकनट म्हणून ओळखले जातात. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी आपल्या भावासह ‘ललितकलादर्श नाटक मंडळी’ या प्रसिद्ध नाटक कंपनीची स्थापना केली. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘शारदा’ नाटकातील त्यांची भूमिका आणि तुफान गायकी पाहून पत्रकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी त्यांना ‘संगीतसूर्य’ ही मानद उपाधी प्रदान केली.

‘संगीत मानापमान’मधील धैर्यधर, ‘शहाशिवाजी’मधील छत्रपती शिवाजी महाराज तसेच विविध नाटकातील स्त्री-पुरुष भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मराठी रंगभूमीवर सर्वप्रथम मखमलीचा पडदा आणणे आणि ठरलेल्या वेळेवर नाटकाची सुरुवात करण्याची अनुशासनप्रिय परंपरा त्यांनी सुरू केली.

४ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1824 : मेक्सिकोने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले.
  • 1927 : गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
  • 1940 : ब्रेनर पास येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
  • 1943 : दुसरे महायुद्ध – युनायटेड स्टेट्सने सॉलोमन बेटांवर कब्जा केला.
  • 1957 : स्पुतनिक 1 पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह बनला
  • 1959 : सोव्हिएत रशियाच्या लुनिक-3 अंतराळयानाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली आणि चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची छायाचित्रे घेतली.
  • 1966 : युनायटेड किंगडमपासून बासुटोलँडचे स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो
  • 1983 : नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – 2 ही गाडी ताशी 1019 किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • 1992 : मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.
  • 2006 : ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.
Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

४ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1822 : ‘रुदरफोर्ड हेस’ – अमेरिकेचे 19 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 जानेवारी 1893)
  • 1884 : ‘रामचंद्र शुक्ला’ – भारतीय इतिहासकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 2 फेब्रुवारी 1941)
  • 1913 : ‘सरस्वतीबाई राणे’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑक्टोबर 2006)
  • 1913 : ‘मार्टिअल सेलेस्टीन’ – हैती देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 2011)
  • 1914 : ‘म. वा. धोंड’ – मराठी समीक्षक यांचा जन्म.
  • 1916 : ‘धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला’ – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक यांचा जन्म.
  • 1928 : ‘ऑल्विन टॉफलर’ – अमेरिकन पत्रकार व लेखक यांचा जन्म.
  • 1935 : ‘अरुण सरनाईक’ – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 1984)
  • 1937 : ‘जॅकी कॉलिन्स’ – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1997 : ‘ऋषभ पंत’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

४ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1669 : ‘रेंब्राँ’ – डच चित्रकार यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1606)
  • 1847 : ‘राजे प्रतापसिंह भोसले’ – महाराष्ट्रातील प्रजाहितदक्ष राजे यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1793)
  • 1904 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1834)
  • 1921 : ‘केशवराव भोसले’ – गायक, नट यांचे निधन. (जन्म : 9 ऑगस्ट 1890)
  • 1947 : ‘मॅक्स प्लँक’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1858)
  • 1966 : ‘अनंत अंतरकर’ – सत्यकथा चे संपादक यांचे निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1911)
  • 1982 : ‘सोपानदेव चौधरी’ – मराठी कवी यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1907)
  • 1989 : ‘पं. राम मराठे’ – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण यांचे निधन. (जन्म : 23 ऑक्टोबर 1924)
  • 1993 : ‘जॉन कावस’ – अभिनेते यांचे निधन.
  • 2002 : ‘भाई भगत’ – वृत्तपत्र निवेदक यांचे निधन.
  • 2015 : ‘एडिडा नागेश्वर राव’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 24 एप्रिल 1934)
 

Web Title: Dinvishesh 4 october keshavrao bhosale jayanti history sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

National No Sugar Day : साखरेचा अतिवापर बनतोय आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू; निरोगी आयुष्यासाठी जाणून घ्या ‘हे’ नैसर्गिक पर्याय
1

National No Sugar Day : साखरेचा अतिवापर बनतोय आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू; निरोगी आयुष्यासाठी जाणून घ्या ‘हे’ नैसर्गिक पर्याय

National Techies Day : ‘संगणक कोडिंगपासून AI क्रांतीपर्यंत…’ जाणून घ्या ‘या’ खास दिनानिमित्त डिजिटल युगाच्या शिल्पकारांची गाथा
2

National Techies Day : ‘संगणक कोडिंगपासून AI क्रांतीपर्यंत…’ जाणून घ्या ‘या’ खास दिनानिमित्त डिजिटल युगाच्या शिल्पकारांची गाथा

Swami Ramanand Teerth Jayanti: आज स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती; जाणून घ्या ३ ऑक्टोबरचा इतिहास..
3

Swami Ramanand Teerth Jayanti: आज स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती; जाणून घ्या ३ ऑक्टोबरचा इतिहास..

Mahatma Gandhi Jayanti: ‘पोरबंदर ते साबरमती…’ महात्मा गांधींच्या आयुष्यातील ‘या’ 5 महत्त्वाच्या घटना ज्यांनी इतिहास बदलला
4

Mahatma Gandhi Jayanti: ‘पोरबंदर ते साबरमती…’ महात्मा गांधींच्या आयुष्यातील ‘या’ 5 महत्त्वाच्या घटना ज्यांनी इतिहास बदलला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.