
Heavenly Munsiyari nestled in the lap of the Panchchuli peaks is like a treasure of nature
Uttarakhand hill stations : हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. येथे असंख्य डोंगररांगा, बर्फाच्छादित शिखरे, वाहत्या नद्या, हिरवाईने नटलेली दरी आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. या सर्व ठिकाणांमध्ये पिथोरागढ जिल्ह्यातील मुन्सियारी हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे. याला ‘मिनी काश्मीर’ असेही म्हटले जाते. मुन्सियारी हे शांत, सुंदर आणि साहसी अनुभवांनी परिपूर्ण असे ठिकाण आहे. त्यामुळेच हजारो प्रवासी दरवर्षी येथे भेट देतात. जर तुम्ही मुन्सियारीला जाण्याचा विचार करत असाल, तर नक्कीच प्रश्न पडतो “मुन्सियारीला जाण्यासाठी बस कुठून मिळते?” चला तर मग, मुन्सियारीच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग जाणून घेऊया.
मुन्सियारी म्हणजे बर्फाच्छादित पंचचुली शिखरांचे अप्रतिम दृश्य, शांत दऱ्या आणि साहसप्रेमींसाठी अनेक ट्रेकिंग ट्रेल्स. येथे तुम्हाला निसर्गाची खरी ओळख होते.
या व्यतिरिक्त मुन्सियारीच्या प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवे रूप पाहायला मिळते. येथे राहण्यासाठी साधे हॉटेल्सपासून ते आरामदायी गेस्ट हाऊसेस उपलब्ध आहेत. तसेच छोटे ढाबे आणि स्थानिक खानावळीत मिळणारे स्वादिष्ट जेवण पर्यटकांची भूक आणि मन दोन्ही तृप्त करते.
हे देखील वाचा : Hotel Safety Hack : एकट्या प्रवासातही भीती नको! हॉटेलमध्ये ‘बॉटल ट्रिक’ ठरेल तुमचा सुरक्षा कवच
मुन्सियारीला थेट बसने जाणे थोडे कठीण आहे कारण या मार्गावर थोड्याच थेट बसेस उपलब्ध आहेत. पण योग्य नियोजन केले, तर प्रवास अत्यंत सोपा होतो.
दिल्लीहून मुन्सियारीचा एकूण प्रवास बसने साधारणतः १८ ते २० तासांचा असतो. जर तुम्ही हळद्वानी, अल्मोरा किंवा पिथोरागढ येथे थांबून प्रवास पुढे सुरू केला, तर प्रवास अधिक सोयीस्कर होतो.
मुन्सियारी फक्त पर्यटन स्थळ नाही, तर तो अनुभव आहे –
म्हणूनच, जर तुम्हाला हिमालयाच्या कुशीत शांत, साहसी आणि निसर्गरम्य सुट्टी घालवायची असेल, तर मुन्सियारी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
हे देखील वाचा : Inflation In India : भारतातील ‘या’ 10 राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या सर्वाधिक; आकडे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील
मुन्सियारीला जाण्यासाठी थेट बसेस कमी असल्या, तरी योग्य मार्ग निवडला तर प्रवास अत्यंत सोपा होतो. दिल्लीच्या काश्मिरी गेटहून काठगोदामपर्यंत बस घ्या आणि तिथून पुढे मुन्सियारीकडे जाणारी बस किंवा जीप पकडा. हा प्रवास थोडा वेळखाऊ असला तरी त्यानंतर तुमच्यासमोर उलगडणारे निसर्गाचे स्वर्गीय दृश्य आयुष्यभर विसरता येणार नाही.