Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतामध्ये आणीबाणी कधी लागू करण्यात आली? जाणून घ्या इतिहास

भारतामध्ये 3 वेळा आणीबाणी घोषित करण्यात आली होती. 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमध्ये अनेक राजकीय अधिकाऱ्यांना अटक देखील करण्यात आली. चला तर जाणून घेऊया भारतातील आणीबाणीचा इतिहास.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2024 | 01:15 PM
भारतातील आणीबाणीचा इतिहास

भारतातील आणीबाणीचा इतिहास

Follow Us
Close
Follow Us:

काही वर्षांपूर्वी भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 25 जून 1975 ला भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आणि त्यानंतर भारताची लोकशाही पूर्णपणे बदलून गेली. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेल्या आदेशानंतर देशभरात सगळीकडे आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारतामध्ये जन्म घेतलेल्या तरुणांनी सगळ्यात आधी ब्रिटिश राजवट पहिली. त्यानंतर 25 जून 1975 पूर्वी भारतामध्ये दोनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी देशामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भारतामध्ये 1962  आणि 1971 नंतर 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली होती.त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धामुळे आणीबाणी लागू करण्यात आली. पण तिसऱ्यांदा लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या वेळी युद्ध झाले नव्हते. तर त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजकीय कारणामुळे देशात आणीबाणी लावली.(फोटो सौजन्य-twitter/Research Gate )

आणीबाणी म्हणजे काय?

राज्यघटनेच्या कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, देशाच्या राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यावेळी युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंड होतात, ज्या काळात आणीबाणी जाहीर केली जाते. तसेच युद्धामुळे देशाला धोका निर्माण झाल्यास आणीबाणी जाहीर केली जाते.आणीबाणी लागू करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती आणि अधिकाऱ्याला नाही. या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार तात्पुरते स्थगित केले जातात.

भारतातील आणीबाणीचा इतिहास

भारतामध्ये कधी आणीबाणी लागू करण्यात आली?

देशामध्ये तीनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती. 1962 मध्ये पहिल्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. देशभरात ही आणीबाणी 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1968 पर्यंत लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1971 मध्ये भारत- पाकिस्तनमध्ये युद्ध चालू असताना आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. 3 डिसेंबर 1971 दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या कार्यकाळात तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली. 25 जून 1975 ला तिसरी आणीबाणी लावण्यात आली. त्यावेळी आणीबाणी लागू केल्यानंतर इंदिरा गांधी यांनी आकाशवाणीवरून देशवासियांना आणीबाणीची माहिती दिली. त्यांनी घेतलेला हा निर्णय ऐकून जनतेला आश्चर्य वाटले. त्यानंतर २१ मार्च १९७७ रोजी तिसरी आणीबाणी संपवण्यात आली. आणीबाणीच्या काळात देशामध्ये सगळीकडे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी अनेक राजकीय अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

Web Title: History of emergency in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 01:15 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Fresher साठी आनंदाची बातमी! विमानतळावर काम करण्याची संधी, अर्ज प्रक्रिया आणि पगाराच्या तपशिलांबद्दल जाणून घ्या
1

Fresher साठी आनंदाची बातमी! विमानतळावर काम करण्याची संधी, अर्ज प्रक्रिया आणि पगाराच्या तपशिलांबद्दल जाणून घ्या

Petrol Diesel Rate : पाकिस्तानमध्ये पेट्रोल 458 रुपये, मग भारतातही पेट्रोल-डिझेल खरंच महागलं? तपासा तुमच्या शहरातील आजचे दर
2

Petrol Diesel Rate : पाकिस्तानमध्ये पेट्रोल 458 रुपये, मग भारतातही पेट्रोल-डिझेल खरंच महागलं? तपासा तुमच्या शहरातील आजचे दर

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ
3

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ

आता नो टेन्शन…! जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना, काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स
4

आता नो टेन्शन…! जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना, काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.