Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता नो टेन्शन…! जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना, काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स

जनगणना २०२७ ही भारतातील डिजीटल पध्दतीने राबविण्यात येणारी पहिली जनगणना असून जनगणना प्रक्रियेच्या आधुनिकीकरणाचे हे एक परिवर्तनशील पाऊल आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 04:46 PM
आता नो टेन्शन…! जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना, काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स
Follow Us
Close
Follow Us:
  • जनगणना २०२७ मध्ये ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना,
  • काय आहे याची प्रक्रिया? जाणून घ्या स्टेप्स
नवी मुंबई / सिद्धेश प्रधान : भारत सरकारने जनगणना कार्यक्रम २०२७ जाहीर केला असून जनगणना कार्यक्रमाचा अंतिम कालावधी ३१ मार्च २०२७ रोजीपर्यंत आहे. भारत देशात दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची परंपरा असून पहिली जनगणना १८७२ मध्ये झालेली आहे. २०२७ मधील जनगणना ही १६ वी जनगणना असून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ८ वी जनगणना आहे आणि २१ व्या शतकातील ३ री जनगणना आहे. ही जनगणना दोन स्वतंत्र टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीमध्ये पार पडेल आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी / मार्च २०२७ मध्ये पार पडेल.

जनगणना २०२७ ही भारतातील डिजीटल पध्दतीने राबविण्यात येणारी पहिली जनगणना असून जनगणना प्रक्रियेच्या आधुनिकीकरणाचे हे एक परिवर्तनशील पाऊल आहे. क्षेत्रीय स्तरावरील प्रगणक व पर्यवेक्षक माहिती संकलनासाठी स्वतःचे मोबाईल उपकरण वापरून माहिती संकलन करणार आहेत व ती माहिती सेंट्रल सर्व्हरवर डिजीटल स्वरूपात नोंद करतील.

जनगणना २०२७ साठी महानगरपालिका आयुक्त हे ‘प्रधान जनगणना अधिकारी’ असतील तसेच उपायुक्त (परिमंडळ-२) हे ‘शहर जनगणना अधिकारी’ असतील. सर्व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त हे ‘चार्ज जनगणना अधिकारी’ असतील. त्यांना ‘अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी’ हे जनगणना कामी सहाय्य करतील.

प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी १५ दिवस अगोदर म्हणजेच १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध असेल. स्वगणना हा एक नाविन्यपूर्ण आणि नागरिकांना सुलभ व सोयीस्कर पर्याय आहे. तो आपल्या सोयीनुसार सुरक्षित वेब पोर्टल वापरून नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतःहून ऑनलाईन भरण्याची मुभा देतो. याकरिता नागरिकांनी ऑनलाईन पोर्टल (sc.census.gov.in) ला भेट द्यावी.

“राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर

जनगणना पोर्टलमध्ये प्रश्न आणि पर्याय एचएलओ मोबाईल अ‍ॅप प्रमाणेच असून वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि टूलटीप्सद्वारे उत्तरदात्यांना मदत केली जाते, उपलब्ध पर्यायांपैकी आपला योग्य पर्याय निवडून एकदा कुटुंबाने त्यांची माहिती यशस्वीरित्या सादर केली की, त्यांना एक विशिष्ट स्वगणना आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी दाखवून आपली अचूक व संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. आपली अचूक माहितीच पुढील अनेक वर्षांच्या प्रगतीची दिशा ठरवेल. ही केवळ लोकांची गणना नाही तर हा ‘विकसित भारत २०४७’ चा पाया आहे.

जनगणना अधिनियम १९४८ नुसार प्रत्येक व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाते. नावे आणि ओळख उघड केली जात नाही, या माहितीचा वापर कोणत्याही कर आकारणीसाठी किंवा तपासणीच्या उद्देशासाठी केला जात नाही याची नोंद घेऊन सर्व नागरिकांनी जनगणनेमध्ये स्वगणनेचा पर्याय स्विकारावा आणि नोंदणी करावी अथवा आपल्याकडे जनगणना माहिती संकलनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Raja Ravi Varma Painting : मातृत्वाचे अनोखे रुप; राजा रवि वर्मा यांच्या यशोदा अन् बालकृष्णाच्या ‘या’ चित्राचा महाभारताशी संबंध

 

Web Title: Self enumeration will be done through online portal in census 2027 what is the process know the steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Census Notification
  • digital
  • india

संबंधित बातम्या

Narendra Modi : “भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी…”, युरोप दौऱ्यात पीएम मोदींची मोठी घोषणा
1

Narendra Modi : “भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी…”, युरोप दौऱ्यात पीएम मोदींची मोठी घोषणा

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा
2

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा

IMD Monsoon Update: आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?
3

IMD Monsoon Update: आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?

US vs China vs India: $100 अब्ज क्लबमध्ये अमेरिकेचीच हवा! महासत्तांना टक्कर देण्यासाठी भारत-चीनचा काय आहे तगडा प्लॅन?
4

US vs China vs India: $100 अब्ज क्लबमध्ये अमेरिकेचीच हवा! महासत्तांना टक्कर देण्यासाठी भारत-चीनचा काय आहे तगडा प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.