Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : हिटमॅन रोहित शर्मा साजरा करतोय त्याचा 38 वा वाढदिवस; जाणून घ्या 30 एप्रिलचा इतिहास

क्रिकेट विश्वामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रोहित शर्मा हा त्याचा आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिटमॅन म्हणून चाहत्यांच्या मनामध्ये त्याने घर केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 30, 2025 | 11:01 AM
hitman rohit sharma 38 th birthday history of 30 april dinvishesh

hitman rohit sharma 38 th birthday history of 30 april dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट आहे. भारतीय टीमचा कॅप्टन असलेला रोहित शर्मा देखील जगात प्रसिद्ध आहे. फक्त भारतामध्ये नव्हे तर जगभरामध्ये रोहितचे चाहते आहेत. हिटमॅन म्हणून ओळख मिळवलेल्या रोहित शर्माने आपले नेतृत्व सिद्ध करत भारतीय संघाकडे विजयश्री खेचून आणला आहे. रोहित शर्मा हा जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या नावावर  एकदिवसीय सामन्यात ३ द्विशतके जमा आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम देखील रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. तो भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. आज सर्वांचा लाडका रोहित शर्मा त्याचा  38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

30 एप्रिल रोजी जगाच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1492 : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी नियुक्त केले.
1657 : शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून लुटले.
1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले.
1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी झुरिच विद्यापीठात डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला.
1936 : महात्मा गांधींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
1977 : 9 राज्यांमधील विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, केंद्रीय काँग्रेस आणि भारतीय लोक दल यांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
1982 : कलकत्ता येथे बिजन सेतू हत्याकांड घडले.
1995 : बिल क्लिंटन उत्तर आयर्लंडला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
1996 : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
2009 : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
2013 : विलेम-अलेक्झांडर नेदरलँड्सचा राजा बनल्यानंतर त्याची आई राणी बीट्रिक्सने राजीनामा दिला; ती 33 वर्षांपूर्वी सिंहासनावर आरूढ झाली होती.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

30 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

1777 : ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1855)
1870 : ‘दादासाहेब फाळके’ – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944)
1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968)
1910 : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री राव’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1983)
1921 : ‘रॉजर एल. ईस्टन’ – जीपीएस चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2014)
1926 : ‘श्रीनिवास खळे’ – मराठी संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 2011)
1987 : ‘रोहित शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

30 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

1030 : ‘मोहंमद गझनी’ – तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 971)
1878 : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.
1913 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार आणि निबंधकार यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1868)
1945 : ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ – जर्मनीचे नाझी हुकूमशहा यांनी आत्महत्या केली. (जन्म: 20 एप्रिल 1889)
2001 : ‘श्रीपाद अच्युत दाभोळकर’ – प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1924)
2003 : ‘वसंत पोतदार’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 20 नोव्हेंबर 1939)
2014 : ‘खालिद चौधरी’ – भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1919)
2020 : ‘ऋषि कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचे निधन.

Web Title: Hitman rohit sharma 38 th birthday history of 30 april dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Hitman Rohit Sharma
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
3

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
4

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.