• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • National Honesty Day These Habits Reveal If Your Boyfriend Is Honest

National Honesty Day : ‘नॅशनल ऑनेस्ट डे’ निमित्त ‘या’ सवयींवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेंड प्रामाणिक आहे की नाही

National Honesty Day 2025: प्रामाणिकपणा हा कोणत्याही नात्याचा खरा पाया असतो. एखाद्या व्यक्तीशी प्रेमाचे नाते जोडताना फक्त भावनांनी नव्हे, तर विश्वासाच्या भक्कम आधारावरच नाते टिकते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 30, 2025 | 08:26 AM
National Honesty Day These habits reveal if your boyfriend is honest

National Honesty Day : ‘नॅशनल ऑनेस्ट डे’ निमित्त 'या' सवयींवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेंड प्रामाणिक आहे की नाही ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

National Honesty Day 2025 : प्रामाणिकपणा हा कोणत्याही नात्याचा खरा पाया असतो. एखाद्या व्यक्तीशी प्रेमाचे नाते जोडताना फक्त भावनांनी नव्हे, तर विश्वासाच्या भक्कम आधारावरच नाते टिकते. आज 30 एप्रिल, म्हणजेच ‘नॅशनल ऑनेस्ट डे’. या निमित्ताने आपण जाणून घेऊया, तुमचा बॉयफ्रेंड खरोखरच प्रामाणिक आहे की नाही, हे ओळखण्याचे काही स्पष्ट संकेत. प्रेमाच्या नात्यात फसवणूक किंवा लपवाछपवीसारख्या गोष्टी असतील, तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. जसे शरीराला आरोग्य टिकवण्यासाठी आहार आणि व्यायाम गरजेचा असतो, तसेच नात्याच्या आरोग्यासाठी प्रामाणिकपणा आणि विश्वास अनिवार्य असतो.

प्रामाणिकपणा का महत्त्वाचा आहे?

प्रामाणिकपणा माणसाच्या स्वभावातील एक सर्वोत्तम गुण मानला जातो. तो तुमच्यात आत्मविश्वास, मानसिक शांती आणि स्पष्टता निर्माण करतो. खोटं बोलल्यावर केवळ दुसऱ्याचा नव्हे, तर स्वतःचाच मानसिक त्रास होतो. विशेषतः एखाद्या नात्यात जर कुठल्याही एकाने खोटं बोलण्यास सुरुवात केली, तर हळूहळू ते नातं गळतीला लागते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘मग भारत-पाकिस्तान समस्येवर युद्ध हाच उपाय… ‘ जाणून घ्या असे का म्हटले होते नेहरू?

तुमचा बॉयफ्रेंड प्रामाणिक आहे का? हे ओळखण्याचे काही लक्षणे:

1. तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे

नात्याच्या सुरुवातीला जोडीदार तुमचं प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकतो, पण जर काही काळानंतर त्याचं लक्ष तुमच्याकडे राहिलं नाही, तुमचं बोलणं त्याला कंटाळवाणं वाटू लागलं, तर हे बदल प्रामाणिकतेच्या अभावाचे संकेत असू शकतात.

2. फोन कॉल्सकडे दुर्लक्ष

कधीकधी एखादा कॉल न उचलणे समजण्यासारखे असते, पण जर तुमचा बॉयफ्रेंड वारंवार तुमचे कॉल्स आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करत असेल, आणि तरीही सोशल मीडियावर सक्रिय असेल, तर यामागे काहीतरी दडपण किंवा लपवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

#Nationalhonestyday
The amount of lies we hear in these cases is alarming. How can we trust those who promise 2 protect when they’re the 1s lying! 🙄 Its no wonder trust gets shattered. Its why we continue 2 push for the truth! #NicolaBulley #JaySlater #NoahDonohoe #Justice4All pic.twitter.com/O6bUlky5x9

— Justice 4 Nicola Bulley & Others 💚💙🩷💛 ⚖️ (@chucklechopsx) April 30, 2025

credit : social media

3. दुसऱ्यांच्या नात्यांत जास्त रस

जर तो सतत दुसऱ्यांच्या प्रेमकथांबद्दल बोलत असेल किंवा तुमच्या नात्याची तुलना इतरांच्या नात्याशी करत असेल, तर त्याच्या मानसिकतेत काही बदल घडत आहेत हे तुम्हाला समजून घ्यायला हवे. तो तुम्हाला दुसऱ्या कोणासारखे बनवू इच्छित असल्यास, हे नात्याच्या सुरळीततेसाठी धोकादायक ठरू शकते.

4. ‘तुला आवडत नाही’ असा दृष्टीकोन

जर एखादी गोष्ट तुम्ही सांगितल्यावर त्याची प्रतिक्रिया नेहमी नकारात्मक येत असेल, किंवा तो नेहमी तुमच्या मतांना कमी लेखू लागला असेल, तर त्याच्या भावना तुमच्याविषयी बदलू लागल्या आहेत हे दर्शवते. यामागे दुसऱ्या कोणाविषयी आकर्षण निर्माण झाले असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जलयुद्धानंतर पाकिस्तानला फटका; जर ‘या’ नद्यांचे पाणी सोडले तर बुडू शकतो अर्धा पाकिस्तान

विश्वास आणि प्रामाणिकता

नात्यांमध्ये प्रेम जितकं गरजेचं आहे, तितकंच विश्वास आणि प्रामाणिकता हे नात्याचं खऱ्या अर्थानं बळ असतं. ‘नॅशनल ऑनेस्ट डे’ निमित्ताने आपण स्वतःच्या नात्याकडे प्रामाणिक नजरेने पाहण्याची गरज आहे. जर तुमचा बॉयफ्रेंड या वरील लक्षणांपैकी एकाही सवयींमध्ये बदल दाखवत असेल, तर तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे. प्रेम हे फक्त भावना नसून, एक जबाबदारी, समर्पण आणि विश्वासाचं नातं असतं. हे नातं मजबूत ठेवायचं असेल, तर प्रामाणिक राहणेच हाच एकमेव मार्ग आहे.

Web Title: National honesty day these habits reveal if your boyfriend is honest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • lifestyle news
  • Lifestyles
  • Love Relationship tips

संबंधित बातम्या

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे
1

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य
2

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्तरांनी दिलाय सल्ला
3

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्तरांनी दिलाय सल्ला

World Plant Milk Day 2025 : निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा संदेश देणारा विशेष दिवस
4

World Plant Milk Day 2025 : निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा संदेश देणारा विशेष दिवस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी

सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी

देशात वीज येताच नागिरकांची व्यथा! तो ‘बल्ब’ नाही ‘भुताचा डोळा’ आहे; इंग्रज त्या पोलातून आत्मा…

देशात वीज येताच नागिरकांची व्यथा! तो ‘बल्ब’ नाही ‘भुताचा डोळा’ आहे; इंग्रज त्या पोलातून आत्मा…

प्रेमाला वय नाही…! ‘मी २५ वर्षांची, माझा बॉयफ्रेंड ७६ वर्षांचा…,मी खूप आनंदी आहे!’ प्रेयसीने सांगितली तिची अनोखी कहाणी

प्रेमाला वय नाही…! ‘मी २५ वर्षांची, माझा बॉयफ्रेंड ७६ वर्षांचा…,मी खूप आनंदी आहे!’ प्रेयसीने सांगितली तिची अनोखी कहाणी

Devendra Fadnavis: “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…”; CM फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…”; CM फडणवीसांचे निर्देश

NATO मध्ये पुतिनची दहशत! संघटनेवर लक्ष ठेवण्यासाठी रशियाने उभारले गुप्त केंद्र? सॅटेलाइट्स इमेज मधून खुलासा

NATO मध्ये पुतिनची दहशत! संघटनेवर लक्ष ठेवण्यासाठी रशियाने उभारले गुप्त केंद्र? सॅटेलाइट्स इमेज मधून खुलासा

140 देशात भ्रमण, 400 शहरं आणि 3 वर्षं समुद्रावरील आलिशान व्हिलामध्ये वास्तव्य; काय आहे ‘हि’ गोल्डन पासपोर्ट योजना?

140 देशात भ्रमण, 400 शहरं आणि 3 वर्षं समुद्रावरील आलिशान व्हिलामध्ये वास्तव्य; काय आहे ‘हि’ गोल्डन पासपोर्ट योजना?

461 किमी रेंज, ADAS आणि त्यात सनरूफची मज्जा! भारतात ‘ही’ इलेक्ट्रिक कार धडाधड विकली जातेय

461 किमी रेंज, ADAS आणि त्यात सनरूफची मज्जा! भारतात ‘ही’ इलेक्ट्रिक कार धडाधड विकली जातेय

व्हिडिओ

पुढे बघा
Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.