ncp Chhagan Bhujbal nashik press on india pakistan war
अनिल कदम / उंब्रज : पाकिस्तानने भारतावर केलेल्या आक्रमणाला सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्य दल काय आहे याची झलक या निमित्ताने दिसून आली असून यामध्ये हवाई दलाची कामगिरी मोलाची ठरली आहे. ड्रोनचे हल्ले परतवून लावताना हवेतल्या हवेत क्षेपणास्त्र नष्ट केली जात असल्याने पाकचा तिळपापड झाला असून सीमावर्ती भागात बेछूट गोळीबार सुरू झाला आहे. समोरासमोर युद्धात टिकाव लागत नसल्याने निष्पाप नागरिकांच्या घरादारवर हल्ला करण्याची अमानवी कृती पाक सैनिक अवलंबित आहेत.
हिंदू मुस्लिम शीख इसाई हातात हात घालून युद्धभूमीवर तळ ठोकून बसले आहेत. पाकिस्तानची कोणतीही आगळीक भारतीय सैन्य हाणून पाडत आहेत. सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू हेच उद्दिष्ट घेऊन भारतीय सैन्य मैदानात उतरले आहे. अतिशय दर्जेदार नियोजन करीत सेनेने आपली दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे ड्रोन,क्षेपणास्त्र, फायटर जेट यामधून केलेला हल्ला फोल ठरल्याने पाकिस्तान अवसान गळलेल्या अवस्थेत सीमा भागातील नागरी वस्तीवर आपले तोफगोळे डागत आहे. भारतीय सैन्य याचा जोरदार मुकाबला करीत असल्याने जोरदार फायरिंग सीमा भागात सुरू आहे
भारताची एकजूट
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला सडेतोड उत्तर देत असताना भारतीय सेना जोरदार आक्रमण करीत आहे दिल्लीमध्ये प्रधानमंत्री,गृहमंत्री,संरक्षण मंत्री सतत सुरक्षा दलाच्या संपर्कात असून देशातील सर्वच राजकीय पक्षांनी युद्धजन्य परिस्थितीत केंद्र सरकारच्या हातात हात घालून उभे राहण्याची भूमिका घेतल्याने संपूर्ण देश एकजूट होऊन या लढाईत उभा राहिला
आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
आकाश जमीन समुद्र तिन्ही ठिकाणावरून हल्ले
भारताने आकाश जमीन समुद्र तिन्ही ठिकाणावरून हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. कराची बंदराची मोठी हानी झाल्याची माहिती उपलब्ध होत असून हवाई दल आपली सर्वोत्तम कामगिरी करीत असल्याने पाकिस्तानचा कोणताही उद्देश सफल होताना दिसत नाही. सीमावर्ती भागात बीएसएफ जोरदार मोर्चा सांभाळत असून सर्वच हल्ल्याला जोरदार प्रतिउत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले परतवून लावत असताना शत्रूंची डिफेन्स सिस्टम नेस्तनाबूत केलेली आहे. आयएनएस विक्रांत समुद्रात आक्रमकपणे तैनात असून कोणतेही आक्रमण माघारी फिरवण्यास सक्षम आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तान एकटा पडला
भारतावर भ्याड हल्ला करणारा पाकिस्तानचा बुरखा फाटला असून दशहतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून चीन अमेरिका यांच्या सारखे मित्रही त्यांच्यापासून फोन हात दूर राहू लागले आहे आर्थिक परिस्थिती खराब असल्याने सर्व मित्र राष्ट्रांना आर्थिक भीक मागत पाकिस्तान दारोदार विनंती करू लागला आहे
सातारा जिल्हा सतर्क
सातारा पोलिसांना अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना वरीष्ठ कार्यालयाकडून काय सूचना आहे याबाबत विचारले असता स्टँडबाय अलर्ट राहण्याबाबत सांगितले असून पोलीस दल सकृतदर्शनी फिल्ड वर ठेवा आणि मनुष्यबळ जास्तीत ड्युटीवर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी स्पेशल पथकाची नियुक्ती अगोदरच झालेली असल्याची माहिती उपलब्ध झाली