पाकिस्तान पासून स्वतंत्र बलूचिस्तान करण्याची लेखक मीर यार बलोच यांनी मोठी घोषणा (फोटो - सोशल मीडिया)
कराची : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने देखील उतावळापणा दाखवत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय दलाने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. पाकिस्तानने भारताच्या जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरातमध्ये हल्ले केले. मात्र हे हल्ले परतवून लावल्यानंतर भारताने देखील पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या विरोधात भारतासह बलुचिस्तानने देखील हल्लाबोल केला.
पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद आणि कराची अशी महत्त्वाच्या शहरांवर भारताने हल्ला केला. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. मात्र पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे भारताने देखील आक्रमक भूमिका घेतली. यानंतर पाकिस्तानला त्याची युद्धाची खुमखुमी मोठी महाग पडणार आहे. भारतानंतर बलुचिस्तानने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे बलुच लेखकाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना बलुच लेखक मीर यार बलोच यांनी मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडिया एक्सपोर्ट एक्सवर त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील अनेक शहर आणि परिसरावर कधीचाच ताबा मिळवला आहे. याभागातील शाळा, महाविद्यालये, सरकारी आस्थापनातील पाकिस्तानी झेंडे फेकून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे येथे पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संयुक्त राष्ट्र संघाने बलुचिस्तान स्वातंत्र्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करावा. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावा. संयुक्त राष्ट्राने सर्व सदस्य देशांची एक बैठक बोलावावी आणि बलुचिस्तानाला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर बलुचिस्तानचे नवीन चलन आणि पासपोर्टसाठी सहकार्य करण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये वेगळा दुतवास निर्माण करण्याची देखील विनंती त्यांनी केली आहे.
A possible announcement soon should be done as the collapse of the terrorist Pakistan is near.
We have claimed our independence and we request India to allow Balochistan’s official office, and embassy in Delhi.
We also ask the United Nations to recognise the independence of the…
— Mir Yar Baloch (@miryar_baloch) May 8, 2025
यामध्ये त्यांनी पुढे लिहिले आहे की, लष्कर, सीमावर्ती दल, पोलिस, लष्करी गुप्तचर संस्था, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व गैर-बलूच कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे. बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवले जाईल आणि लवकरच एक संक्रमणकालीन निर्णायक अंतरिम सरकार जाहीर केले जाईल. मंत्रिमंडळात बलुच महिलांचे प्रतिनिधित्व हे आपल्या राष्ट्राप्रती असलेल्या वचनबद्धतेची पूर्तता आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य सरकारचा राज्य समारंभ लवकरच होणार आहे. आम्ही आमच्या मित्र देशांच्या राज्यांच्या प्रमुखांना राष्ट्रीय परेड पाहण्यासाठी आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करतो.