
international day of mathematics 2026 theme mathematics and hope pi day marathi
International Day of Mathematics 2026 : आज १४ मार्च! गणिताशी मैत्री करण्याचा आणि त्यातील सौंदर्याचा शोध घेण्याचा हा जागतिक दिवस. संपूर्ण जग आज ‘आंतरराष्ट्रीय गणित दिन’ (International Day of Mathematics) साजरा करत आहे. अनेक देशांमध्ये हा दिवस ‘पाय दिन’ (Pi Day) म्हणूनही ओळखला जातो. गणिताची भीती बाळगणाऱ्यांपासून ते गणिताच्या आकड्यांत रमणाऱ्या संशोधकांपर्यंत सर्वांसाठीच आजचा दिवस विशेष आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने या दिवसाला अधिकृत मान्यता दिल्यापासून, गणिताची व्याप्ती केवळ वर्गापुरती मर्यादित न राहता ती मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
गणितामध्ये ‘पाय’ (π) या स्थिरांकाचे मूल्य साधारणपणे ३.१४ असे मानले जाते. जर तुम्ही या आकड्याकडे नीट पाहिले, तर ‘३’ म्हणजे तिसरा महिना (मार्च) आणि ‘१४’ म्हणजे तारीख! याच अनोख्या योगायोगामुळे १४ मार्च हा दिवस गणित दिन म्हणून निवडला गेला. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा वाढदिवस असतो आणि याच दिवशी महान गणितज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन झाले होते. त्यामुळे विज्ञानाच्या इतिहासातही या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: अमेरिकेने इराणचा न्यूक्लियर प्रोग्रॅम मुळापासून उपटला? ‘Taleghan-2’ वर महाविनाशक हल्ला; शास्त्रज्ञही संपवले
यावर्षी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय गणिती संघाने (IMU) गणिताकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला आहे. “गणित आणि आशा” ही या वर्षीची थीम आहे. आज जग हवामान बदल, आर्थिक अस्थिरता आणि आरोग्याच्या अनेक समस्यांशी झुंजत आहे. या काळात गणित ही केवळ आकडेमोड नसून एक आशेचा किरण आहे. डेटा अॅनालिसिस, मॉडेलिंग आणि लॉजिकल रिझनिंगच्या माध्यमातून आपण भविष्यातील संकटांचा अंदाज घेऊ शकतो आणि त्यावर उपाय शोधू शकतो. गणित आपल्याला सत्य शोधण्याची आणि पुराव्यावर आधारित निर्णय घेण्याची शिस्त शिकवते.
Tune in to Akashvani Mokokchung, FM 100.9 MHz on March 14, 2026, and listen to a Radio Talk on International Mathematics Day. Date of Broadcast: March 14, 2026
Time of broadcast:
– 09:20 AM – Sentijungla(English)
– 06:20 PM – Bendangwabang(Ao)#AkashvaniMokokchung #NewsOnAir pic.twitter.com/wf6oqNKac7 — Akashvani Mokokchung_official (@Akashvani_Mkg) March 13, 2026
credit – social media and Twitter
आपल्या सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या ऑनलाईन पेमेंटपर्यंत प्रत्येक गोष्टीमागे गणिताचे सूत्र दडलेले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update : इराणचा दावा खरा की खोटा? ‘अब्राहम लिंकन’वर केला विध्वंसक प्रहार; पेंटागॉननेही दिले चकित करणारे प्रत्युत्तर
आंतरराष्ट्रीय गणित दिनानिमित्त जगभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. गणिती कोडी, क्विझ, पाय (π) च्या दशांश किमती पाठ करण्याची स्पर्धा आणि गणितावर आधारित प्रदर्शने भरवली जातात. गणिताचा विषय विद्यार्थ्यांसाठी रंजक आणि भीतीमुक्त बनवण्यासाठी शिक्षक नवनवीन प्रयोग करत आहेत.