Israel Iran War: इराणचा अमेरिकेला मोठा दणका? 'अब्राहम लिंकन' युद्धनौका उद्ध्वस्त केल्याचा दावा; पेंटागॉनने दिले सडेतोड उत्तर! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
USS Abraham Lincoln Attack Iran : मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता जमिनीवरून थेट अथांग समुद्रात पोहोचला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात आता एका अशा घटनेची चर्चा होत आहे, जिने जागतिक महासत्तांच्या गोटात खळबळ माजवली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने असा खळबळजनक दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमानवाहू जहाज ‘USS अब्राहम लिंकन’ (USS Abraham Lincoln) याला क्षेपणास्त्र हल्ल्यात निकामी केले आहे. इराणच्या या दाव्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असली, तरी अमेरिकेने हा दावा साफ फेटाळून लावला आहे.
इराणच्या स्टेट टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ओमानच्या समुद्रात तैनात असलेल्या ‘USS अब्राहम लिंकन’ला इराणने आपल्या हाय-टेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने अचूक लक्ष्य केले. इराणचा असा दावा आहे की, हा हल्ला इतका भीषण होता की अमेरिकन जहाज आता कोणत्याही लष्करी कारवाईसाठी अयोग्य ठरले आहे. “आमच्या सागरी सीमेपासून ३४० किमी अंतरावर आम्ही हे ऑपरेशन फत्ते केले असून, हल्ल्यानंतर अमेरिकन जहाजांचा ताफा रणांगण सोडून पळून जाताना दिसला,” असे इराणी लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Incirlik Air Base : तुर्की थरारलं! इराणच्या क्षेपणास्त्रांनी नाटो तळाला केलं टार्गेट; पहा आकाशातील ‘तो’ थरार, VIDEO VIRAL
इराणच्या दाव्यानंतर काही वेळातच अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) ने अधिकृत फोटो जारी करून या दाव्यातील हवा काढून टाकली. अमेरिकेने म्हटले आहे की, ‘अब्राहम लिंकन’ स्ट्राइक ग्रुप सुरक्षित असून ते ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) अंतर्गत आपले कर्तव्य बजावत आहेत. अमेरिकेच्या मते, इराण केवळ मानसिक युद्ध (Psychological Warfare) खेळत असून त्यांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे एक जहाज अमेरिकन नौकेच्या अत्यंत जवळ आले होते, ज्यावर चेतावणी म्हणून गोळीबार करण्यात आला होता.
Iran’s Islamic Revolutionary Guard Corps says that a missile and drone attack caused significant damage to the USS Abraham Lincoln aircraft carrier • The US military has not released a statement so far on the claim https://t.co/imgV9YvtW9 pic.twitter.com/pctSLcWcuK — Anadolu English (@anadoluagency) March 12, 2026
credit – social media and Twitter
सीबीएस न्यूजच्या अहवालानुसार, ओमानच्या समुद्रात इराण आणि अमेरिकन नौदलामध्ये ‘फेस-ऑफ’ झाला होता. एका इराणी जहाजाने अमेरिकन स्ट्राइक ग्रुपच्या दिशेने वेगाने येण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल अमेरिकन युद्धनौकेने आपल्या ५ इंचाच्या तोफांमधून गोळीबार केला. हे गोळीबार नेमके इराणी जहाजाला लागले की केवळ चेतावणी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर इराणी जहाज त्या ठिकाणाहून गायब झाले आहे. या चकमकीमुळे मध्यपूर्वेतील जलमार्गावरील युद्ध अधिकच हिंसक बनण्याची चिन्हे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: महासत्ता हतबल! इराणने दुबईत शिरून केला धमाका; सायरनच्या आवाजात दडलाय मोठा इशारा, VIDEO VIRAL
जर इराणचा दावा खरा ठरला असता, तर हे अमेरिकेसाठी दशकभरातील सर्वात मोठे नुकसान ठरले असते. मात्र, अमेरिकेच्या सक्रियतेने हे स्पष्ट केले आहे की त्यांचे वर्चस्व अद्याप कायम आहे. पण इराण ज्या प्रकारे थेट अमेरिकन युद्धनौकांना आव्हान देत आहे, त्यावरून हे युद्ध लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानचा समुद्र आता जगासाठी सर्वात धोकादायक रणांगण बनले आहेत.
Ans: इराणच्या IRGC ने दावा केला आहे की त्यांनी क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे हे अमेरिकन विमानवाहू जहाज उद्ध्वस्त केले असून त्याला पळवून लावले आहे.
Ans: अमेरिकेने हा दावा फेटाळला असून त्यांचे जहाज सुरक्षित असल्याचे फोटो जारी केले आहेत आणि ते सध्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी'मध्ये सहभागी असल्याचे सांगितले आहे.
Ans: एक इराणी जहाज अमेरिकन युद्धनौकेच्या धोकादायक पद्धतीने जवळ आल्यामुळे अमेरिकन नौदलाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.






