
Kalpana Chawla
आज, १७ मार्च ‘मी अवकाशासाठीच जन्मली आहे’ असे ठामपणे सांगणाऱ्या आणि आपल्या स्वप्नांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची जयंती. त्यांचा प्रवास आजही तरुणाईला जिद्दीची, कष्टाची जाणीव करुन देतो. एका लहान शहरातल्या या मोंटूने भारताचे नाव अवकाशात सुवर्णअक्षरांनी कोरले, आज आपण त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
Fort Trails : ‘भूपतगड किल्ला’ एक तासाचा सोपा ट्रेक! पर्यटकांसाठी विशेष आकर्षण, जव्हारची ओळख
मोंटू उर्फ कल्पना चावलाचा जन्म १७ मार्च १९६२ मध्ये हरियाणातील कर्नाल बनारसी लाला आणि संज्योती या दांपत्याच्या घरी झाला. घरात त्यांना प्रेमाने मोंटू म्हणायचे. लहानपणी गच्चीवर झोपल्यावर तासनतास ताऱ्यांना न्याहाळत राहणे हा मोंटूचा आवडता छंद होता. तिचे डोळे सतत आकाशात उडणाऱ्या विमानांचा पाठलाग करायचे. तारे किती लांब आहेत, तरीही आपल्याला जवळचे वाटतात याचा तिला सतत विचार पडायचा.
तिने एकदा आईला ठामपणे सांगितले, ‘आई मलाही अशीच भरारी घ्यायची आहे’ विशेष म्हणजे जेव्हा ती शाळेत जाऊ लागली तेव्हा तिने स्वत:साठी कल्पना हे नाव ठेवले. तिने आपल्या बालपणात संपूर्ण वेळ विमानांची पुस्तके वाचली. असे करताना ती आसपासचे जगच विसरुन जायची.
कल्पनाच्या वडिलांना आपल्या मुलीने डॉक्टर किंवा शिक्षिका व्हावं असे वाटायचे. परंतु मोंटूला तर अंतराळाची ओढ लागली होती. यामुळे तिने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. १९८२ मध्ये मोंटूने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेमधून पदवी मिळवली. यांनतर तिने अमेरिकेत जाऊन मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली.
नव्या देशाची भाषा, संस्कृती आणि घराची ओढ अशा अनेक आव्हांनावर कल्पानाने मात केली. १९९१ मध्ये तिने अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले होते. यानंतर १९९४ मध्ये नासासाठी हजारो उमेदवांरामधून कल्पनाची निवड झाली. यावेळी संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली होती.
मोंटूच्या स्वप्नांना पहिली भरारी मिळाली ती १९ नोव्हेंबर १९७७ मध्ये. १९७७ मध्ये कोलंबिया यानातून (STS-87) तिने आपल्या स्वप्नांच्या दिशेने भरारी घेतली आणि मोंटू उर्फ कल्पना अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला ठरली. जवळपास १६ दिवस कल्पनाने अंतराळ घालवले होते.
अंतराळातून संदेश देताना, पृथ्वीकडे पाहत मोंटू म्हणाली होती, “इथून देशांच्या सीमा दिसत नाहीत, दिसतो तो फक्त एक निळा गोळा, एक सुंदर ग्रह, जे आपल्या सर्वांचं घर आहे.” मोंटूची ही दृष्टी जगाला मानवातेचा संदेश देणारी ठरली.
मात्र १६ जानेवारी २००३ रोजी आपली मोहिम यशस्वी करुन परतताना एक मोठा अपघात झाला. कोलंबिया यान पृथ्वीकडे परतत होते. लँडिगसाठी केवळ अवघी १६ मिनिटं उरली असताना यानाच्या डाव्या पंखात तांत्रिक बिघडा झाला आणि भीषण स्फोट झाला. कल्पना आणि तिचे ६ सहकारी अवकाशातच विलिन झाले.