National Vaccination Day २०२६: 'दोन थेंब आयुष्याचे' ते 'कोविड' विजय; भारताच्या आरोग्य क्रांतीचा गौरवशाली 'असा' आहे प्रवास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
National Vaccination Day 2026: आज १६ मार्च! संपूर्ण देशासाठी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. आज आपण ‘राष्ट्रीय लसीकरण दिन'( National Vaccination Day 2026) साजरा करत आहोत. या दिवसाचा इतिहास हा निव्वळ सरकारी आकडेवारीचा नाही, तर तो आहे भारताने पोलिओसारख्या दुर्धर आजारावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा. १९९५ साली याच दिवशी भारतात ‘पल्स पोलिओ’ मोहिमेचा पहिला डोस देण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत आपण लसीकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी जीव वाचवले आहेत.
लसीकरण म्हणजे केवळ एका व्यक्तीला आजारापासून वाचवणे नाही, तर ते संपूर्ण समाजाला सुरक्षित करणे आहे. आपण पाहिलं की कोविड-१९ च्या काळात लसीने कशा प्रकारे जगाला पुन्हा एकदा सावरलं. लस घेतल्यामुळे केवळ आजाराची तीव्रता कमी होत नाही, तर ‘हर्ड इम्युनिटी’ (Herd Immunity) तयार होण्यास मदत होते. यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा बालकांना आणि वृद्धांनाही संरक्षण मिळते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Politics : इराणचा अंतर्गत गृहकलह सुरुच? इराणच्या नवीन राजवटीचा प्रश्न अद्यापही कायम
यंदाच्या लसीकरण दिनाचे घोषवाक्य (Theme) आहे “Immunization for All is Humanly Possible”. याचा अर्थ असा की, तंत्रज्ञान आणि मानवी जिद्दीच्या जोरावर आपण जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवू शकतो. मग तो दुर्गम भागातील एखादा पाडा असो किंवा शहराचे गजबजलेले केंद्र; लसीकरणाचा अधिकार प्रत्येकाला आहे. भारत सरकारने यावर्षी विशेषतः ‘मिशन इंद्रधनुष्य’ अंतर्गत ज्या मुलांचे लसीकरण राहिले आहे, त्यांना शोधून लस देण्याचा संकल्प केला आहे.
Let’s take the shot! Ensure vaccination today, protect tomorrow, one vaccine at a time.#NationalVaccinationDay pic.twitter.com/JsmgqLxr3p — Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 16, 2024
credit – social media and Twitter
यंदाचा लसीकरण दिन अधिक खास आहे कारण भारत सरकारने नुकतीच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी HPV लस (Human Papillomavirus) १४ वर्षांच्या मुलींसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच, डेंग्यूवर मात करण्यासाठी पहिली भारतीय लस लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत येत आहे. पोलिओमुक्त भारत झाल्यानंतर आता कर्करोगमुक्त आणि डेंग्यूमुक्त भारत घडवण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्प आणि अंबानींची जमली जोडी; युद्धपरिस्थितीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची ३०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
अनेकदा अफवा किंवा अर्धवट माहितीमुळे लोक लसीकरण टाळतात. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक लस ही हजारो चाचण्यांनंतरच तुमच्यापर्यंत पोहोचते. आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांना अपंगत्व, मृत्यू यांपासून वाचवण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. चला, आजच्या दिवशी आपण संकल्प करूया की, कोणतंही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही!






